मी कुठलाही धर्म मानत नाही किंवा पाळत नाही, तर मग मी मुस्लिमांच्या वर्तनाचे विवेचन का करावे त्याची अनेक कारणे आहेत. कारण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही. त्यांच्या वर्तनाचा माझ्या जगण्याशी संबंध येतोच येतो. आणि असा मी एकटाच नाही तर जे कोणी मुस्लिम नाहीत त्यांचीही माझ्यासारखीच अवस्था आहे. म्हणूनच मुस्लिम काय करतात, कसे वागतात वा त्याचे इतरांच्या सामुहिक जीवनावर कोणते परिणाम होतात, याची दखल मुस्लिमेतरांना घ्यावीच लागते. अर्थात त्यांच्या वर्तनाचा कुठलाही विपरित परिणाम होणार नसेल तर त्याकडे काणाडोळा करण्याची मोकळीक असते. पण मुकादम यांनी जे सत्य इतक्या उघडपणे कथन केले आहे, त्यानंतर त्याकडे काणाडोळा करणे हा शुद्ध मुर्खपणा ठरेल. हे नुसते हवेतले विधान नाही. हेमंत करकरे किंवा चार वर्षापुर्वी जे अनेक लोक मुंबईत अकारण मारले गेले, त्यांच्याकडे बघा म्हणजे माझे नेमके काय म्हणणे आहे, त्याचा अंदाज येऊ शकेल. कोण हे हेमंत करकरे?
ज्यांची राज्यातील दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली होती. त्यांनी कसाब किंवा त्याच्यासोबत आलेल्यांचे काय घोडे मारले होते? २६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी मुंबईच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसवर जे प्रवासी जमलेले होते, त्यांनी कसाब किंवा त्याच्या सोबत आलेल्या दहा जिहादी फ़िदायिनांचा कोणता अपराध केला होता? नरिमन हाऊस येथे ज्यांची निर्घृण हत्या झाली; त्यापैकी कोणी पाकिस्तानातल्या कोणाचे काय पाप केले होते? अशा शेकडो निरपराधांचे आजपर्यंत बळी पडले आहेत, त्यांना मारणार्यांचे यापैकी कोणी नेमके काय गुन्हे केले होते? उलट जवळपास यातला प्रत्येकजण असाच दिसेल, की त्याने मुस्लिमांच्या वर्तनाकडे साफ़ काणाडोळा केला होता. मुस्लिम आपल्याकडे कोणत्या नजरेने बघतात, त्याचीही त्यातल्या प्रत्येकाने कधीच फ़िकीर केली नव्हती (कसाब किंवा तत्सम हिंसाचार करणारे, असे कृत्य धर्माच्या नावाने करत असतात). आपोआपच यापैकी कोणीही मुस्लिम काय करु शकतील याबद्दल साफ़ गाफ़ील होते ना? आपण मुस्लिम नाही आहोत म्हणून आपल्याबद्दल काही किल्मिष मुस्लिमांच्या मनात असू शकते, याबद्दल त्यातला प्रत्येकजण गाफ़ील नव्हता का? आणि तेवढेच नाही. हे जे अकारण बळी पडले आहेत, ते सगळेच मुस्लिमेतर नाहीत. त्यात अनेक मुस्लिमांचाही समवेश आहे. ज्यांना असेच विनाकारण बळी व्हावे लागले आहे. त्यांचा दोष को्णता होता?
जे मुस्लिम नव्हते त्यांच्यावरच जिहादी किंवा फ़िदायिन यांनी प्राणघातक हल्ले केले, हा विषय जरा बाजूला ठेवा. अशा हल्ल्यात जे मुस्लिम मारले गेलेत त्यांचे काय? ते चुकीच्या समुहात होते, चुकीच्या देशात होते किंवा चुकीच्या जागी चुकीच्या वेळी उपस्थित होते; असा त्यांचा गुन्हा मानायचा काय? समस्या आहे तरी काय? समस्या नुसती मुस्लिम नसण्याची सुद्धा नाही. तर आम्हाला समजलेला वा उमजलेला धर्मच योग्य आणि त्याचे पालन होत नसेल तर त्याला गुन्हा ठरवून स्वत:च शिक्षा देण्याची मानसिकता; ही खरी समस्या आहे. त्यामुळे ज्यांच्याकडून अशी कृत्ये होतात, ते केवळ भारतातले कायदे जुमानत नाहीत किंवा पाकिस्तान वा अमेरिकेतले कायदे जुमानत नाहीत, असाही त्याचा अर्थ होत नाही. त्यांना इस्लामचे सर्वमान्य कायदे व नियमही मान्य नाहीत, असाच त्याचा अर्थ आहे. म्हणजे त्यांची समस्या मुस्लिमेतर लोकांपुरतीच मर्यादित नाही. तर अशा काही आक्रमक वृत्तीच्या मुस्लिमांना अवगत झालेला जो धर्म आहे, त्यानुसार सर्वांनी वागण्याचा व जगण्याचा अट्टाहास ही समस्या आहे. आणि ती एकट्या मला, माझ्या देशाला नव्हेतर अवघ्या जगालाच आज भेडसावते आहे. तीच मग बहुसंख्य मुस्लिम असूनही काश्मिरी लोकसंख्येला भेडसावते आहे, पाकिस्तानला सतावते आहे आणि मुस्लिम अल्पसंख्य असलेल्या अन्य देशांनाही भंडावून सोडते आहे.
म्हणजेच आज ही समस्या केवळ मुस्लिम व मुस्लिमेतर अशी उरलेली नाही तर ती मुस्लिम समाज घटकांच्या अंतर्गतही भीषण समस्या बनलेली आहे. पाकिस्तानच्या कुठल्या प्रांतातील मुलींनी आधुनिक शाळेत शिकावे किंवा नाही; हे तिथले सरकार ठरवू शकत नाही. ते तालिबान म्हणुन ज्यांनी धर्माच्या रक्षणाचा ठेका घेतला आहे, तेच ठरवू बघत आहेत. म्हणजे समस्या मुस्लिम-मुस्लिमेतर अशी नाही, तर तालिबान व तालिबानेतर मुस्लिम अशी सुद्धा आहे. जिथे शिया पंथियांचे वर्चस्व आहे, तिथे सुन्नी मुस्लिमांची मुस्कटदाबी वा अत्याचार होत असतात, तर कुठे अहमदियांना संपवण्याचे प्रकार सुन्नी मुस्लिम करताना दिसतील. गेल्या दोन दशकातील जगभरची आकडेवारी तपासली तर मुस्लिमांकडूनच मुस्लिम जितके मारले गेलेत; तेवढे मुस्लिम अन्य कुणाकडून मारले गेलेले नाहीत. मग ही समस्या सुटायची कशी? आणि म्हणूनच अब्दुल कादर मुकादम ज्या समस्येकडे बोट दाखवतात व प्रश्न विचारतात, तो मुस्लिमेतर जगापुरता खरा असला तरी संपुर्ण जगासाठी वा जगातल्या तमाम लोकसंख्येसाठी परिपुर्ण प्रश्न नाही. मुकादम फ़क्त त्या प्रश्नाची एक बाजू सांगत आहेत. त्यातून मुस्लिमेतरांना बाजूला काढले म्हणून उरवरित जी मुस्लिम लोकसंख्या आहे; ती तरी गुण्यागोविंदाने नांदणार आहे काय? बाकीचे वाद चालू राहतील, पण धर्माच्या बाबतीतले रक्त सांडणे थांबेल काय? तसे असेल तर मग मुस्लिमांच्या विविध पंथातला रक्तपात संपणार आहे काय? इस्लाममधल्या विविध पंथामध्ये तरी एकवाक्यता होऊन सहजीवनाला आरंभ होऊ शकेल काय?
सद्दामने कर्डीश मुस्लिमांवर रासायनिक अस्त्रे सोडून त्यांचे हत्याकांड का केले? दहा वर्षे इराक इराण युद्ध का चालु होते? आजही जागतिक खनिज तेलाच्या बाजारपेठेत सौदी व इराण यांच्यातली जीवघेणी स्पर्धा कशासाठी चालते? ज्या इस्त्रायल विरोधात अवघे मुस्लिम जगत एकसुरात बोलते, त्याच्याशी सौदी अरेबियाचे छूपे संगनमत कोणत्या कारणास्तव असते? सुन्नी सौदी विरुद्ध शिया इराण असे भांडण कशासाठी आहे? तर जगातल्या मुस्लिमेतरांशी वादविवाद करताना सर्व मुस्लिम एक होतात. पण जेव्हा केवळ मुस्लिमांचाच विषय असतो; तेव्हा संघर्ष उफ़ाळून येतोच. माझा इस्लाम तेवढा खरा यातून ही समस्या अधिक फ़ैलावली आहे. आणि म्हणूनच मग मुकादम म्हणतात, तसा हा मर्यादित प्रश्न नाही. तो माझ्यासारख्या मुस्लिमेतरासाठी खरा असेल. पण जगासाठी परिपुर्ण प्रश्न नाही. मग जे मुस्लिम मला इस्लामचा अभ्यास करायला सांगतात किंवा कुराण वा प्रेषिताची शिकवण समजून घ्यायला आग्रहाने सांगतात; ती कुठली शिकवण असा प्रश्न पडतो. कारण ज्या धर्मशिकवणीबद्दल विविध मुस्लिम पंथ व गटातच एकमत नाही, त्याचे ज्ञान मला कसे अवगत व्हावे? हे काम इतके सोपे असते तर आज मलाला युसूफ़जाईला मृत्यूशी झुंज देण्याची वेळ आली असती का? कारण तिला समजलेला धर्म आणि तालिबानांना अवगत झालेला धर्म; यात अशी तफ़ावत राहिली नसती. एकाने दुसर्यावर शाळेत शिकण्याच्या विषयावरून जीवघेणा हल्ला नक्कीच केला नसता. पण तसे झाले आहे. म्हणजेच आपल्याला अवगत झालेला धर्मच खरा आणि त्याच्याशी सम्य नसलेला धर्म किंवा धर्मपालन गुन्हा; अशी मानसिकता हीच खरी समस्या आहे. त्यातून आधी मुस्लिमांनाच स्वत:चा मार्ग शोधणे अगत्याचे आहे. त्यानंतरच एकवाक्यता झालेल्या धर्माबद्दल त्यांनी इतरांना समजून घ्यायला सांगणे इष्ट नाही काय?
मुस्लिमात एकवाक्यता असावी असे मी सांगण्याचे कारण काय? तर त्याचे परिणाम शेवटी संपुर्ण जगाला भोगावे लागत असतात. अगदी मुस्लिमांनाही भोगावे लागतच आहेत की. डारफ़ोरची समस्या काय आहे? वजिरीस्तानची समस्या काय आहे? कुवेतच्या बचावासाठी सौदी सम्राटांनी अमेरिकन सेनेला आमंत्रित केले, कुवेतच्या शेख अमिरांनी त्याला मान्यता दिली. पण ओसामा बिन लादेनला ते धर्मबाह्य वाटले आणि त्याची फ़ळे अलकायदाच्या कारवायांमुळे अवघ्या जगाला भोगावी लागत आहेत. इथे मग कोणाचे धर्मविषयक मत ग्राह्य मानायचे? कार्ण सौदी सम्राट, कुवेतचा अमिर व ओसामा सारखेच मुस्लिम आहेत ना? मग एकाचे मानले तर दुसरा दुष्मनी जाहिर करतो. दुसर्याचे ऐकले तर पहिला शत्रुत्व घेणार. मग इतरांनी करायचे काय? ओसामाचा धर्मोपदेश खरा मानून वागावे की सौदी-कुवेती सत्ताधार्यांचा निर्णय मान्य करायचा? तेव्हा अब्दुल कादर मुकादम म्हणतात तो त्यांच्याही अपेक्षेपेक्षा अधिक गुंतागुंतीचा विषय आहे. मुस्लिमेतरांचे मुस्लिम नसणे मुस्लिमांनी मान्य-अमान्य करणे इतके सोपे नाही. कारण ते मुस्लिम नसणे एकाला मान्य असले आणि दुसर्याला मान्य नसले मग काय होणार? कारण तमाम मुस्लिमांची एकवाक्यता होण्याची शक्यता अजिबात नाही. मग मुस्लिमेतरांनी त्यापैकी कोणाचे धर्ममत ग्राह्य मानायचे? ( क्रमश:)
भाग ( ६७ ) २२/१०/१२
कितीही उहापोह केला तरी अंतिम सत्य हेच आहे कि मुस्लिमांना फक्त ताकदीची भाषा समजते . गुजरातचे उदाहरण समोर आहेच . मुस्लीम बिग्र्मुस्लीमांशी तेंव्हाच स्लोख्यानी राहू शकतात जेंव्हा बिगरमुस्लीम हे सिद्ध करतात कि ते मुस्लिमांपेक्षा ताकदवान आहेत . आणि हे देश , देशांतर्गत समूह , गाव अशा सर्व ठिकाणी लागू होते
उत्तर द्याहटवावैभव यांच्या मताशी सहमत. भाऊ, मुस्लिम लोक तेव्हाच इतर धर्म माननाऱ्यांना त्रास देणार नाहीत, जो पर्यंत तिथे ते अल्पसंख्यांक आहेत. यावर काय उपाय करावा हे आता इतर धर्मियांनी ठरवने आवश्यक आहे.
हटवा