सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१२

तुम इतना क्यु मुस्कुरा रहे हो?


 एक महिन्यापुर्वीची गोष्ट असेल. टीव्हीवर नॅशनल जिओग्राफ़िक ह्या वाहिनीवरचा कार्यक्रम बघायची संधी मिळाली. कारण हल्ली इतक्या वाहिन्या झाल्या आहेत, की कुठल्या वाहिनीवर कोणता चांगला कार्यक्रम आहे ते सतत शोधत रहावे लागते. त्यामुळे जेव्हा आपल्याला मोकळा वेळ असतो, तेव्हा कुठे चांगला कार्यक्रम आहे त्याचा आधी अंदाज नसतो. मग रिमोट कामी येतो. माझी तरी तिच पद्धत आहे. कारण अख्खा वेळ टीव्ही समोर बसायला सवड नसते. कधी कधी मग असे छान कार्यक्रम नशीबाने हाती लागतात, जे खरोखरच आपल्या ज्ञानात भर घालतात. ज्ञानात भर अशासाठी म्हणायचे, की हल्ली बहुतांश वाहिन्या आपले अज्ञान वाढवण्यासाठीच राबत असतात म्हणायला हरकत नाही. शिवाय अज्ञान किंवा ’चुकीची बातमी आणि ठाम मत’ हेच अविष्कार स्वातंत्र्य झाल्यावर काय करायचे?

   परवा निवडणूकीसाठी घेतलेल्या चाचणीचे निष्कर्ष सांगताना ’कायबीइन लोकमत’ वाहिनीवर वागळे-निरगुडकर यांनी असेच अभ्यासपूर्ण अज्ञानाचे प्रदर्शन मांडले होते. शिवसेनेने १९६७ सालात पहिली निवडणूक लढवली ती ठाणे नगरपालिकेची. ती आठवण बाळासाहेबांनी दुसर्‍या एका वाहिनीवर आसबे-खांडेकर यांना अगत्याने सांगितली. मुंबईतल्या सेनेला ठाणेकारांनी कसा प्रतिसाद सर्वात आधी दिला आणि तिथे वसंतराव मराठे हा सेनेच्या इतिहासात पहिला नगराध्यक्ष कसा झाला तेही सांगितले. पण इकडे ’कायबीइन लोकमत’वर त्या इतिहासाचे वागळे व उदय निरगुडकर मिळून मुडदा पाडत होते. लागोपाठ दोन दिवसाच्या चाचणीत, वागळे यांनी मात्र आपल्या ठाण्यातल्या शाळकरी आठवणी सांगताना सतिश प्रधान यांना सेनेचे ठाण्यातील पहिले नगरध्यक्ष बनवून टाकले होते.

   वागळे आपल्याच दुनीयेत नेहमी वावरत असतात. त्यांना खर्‍या जगात काय घडते याची पर्वा नसते. आणि पत्रकारिता म्हणजे तर त्यांना ’वागळे’ इस्टेटच वाटते. मग काय त्यांनी सतिश प्रधान यांना ठाण्यातले सेनेचे पहिले नगराद्यक्ष करावे किंवा टोनी ब्लेअरला अमेरिकेचा पहिला राष्ट्राध्यक्ष बनवावे. काय फ़रक पडणार आहे? जोपर्यंत वागळे जवाहरलाल दर्डांना ठाण्याच्या ’वागळे इस्टेट’मध्ये आणून हातगाडीवाला बनवत नाहीत तोवर त्यांना कोणी ’दर्डा’वण्याची शक्यता नाही.

   वागळे यांनी मांडलेल्या अज्ञानाच्या प्रदर्शनाबद्दल माझी काहीही तक्रार नाही. मला अजब वाटले ते उदय निरगुडकर आणि मिलिंद बल्लाळ यांचे. तेही दोघे जुने ठाणेकर आहेत. त्यांनीही वागळ्यांच्या ’अज्ञानप्रधान’ इतिहासाची पालखी निमुट उचलावी याची गम्मत वाटली. ’मला आठवते मी शाळेत होतो तेव्हा’ असे म्हणत निखील जो वागळे इस्टेटमध्ये घुसला त्याने १९६७ सालात आनंद दिघे यांना देखील सेनेचा तात्कालीन नेता करून सोडले, तिथे निरगुडकर, बल्लाळांची काय कथा. वसंतराव मराठे, अशोक शाईवाले, शब्बीर शेख, गणेश नाईक, मारोतराव शिंदे असे कोणी शिवसेनेत तेव्हा नव्हतेच. थेट आनंद दिघे. नशीब तुमचे आमचे निखीलने ओबामा नाहीतर बुश याना ठाण्यातील शिवसेनेचे पहिले नगराध्यक्ष बनवले नाही. काय सांगावे उद्या निखील असेही सांगेल, ’मला आठवते, तेव्हा मी कॉलेजमध्ये होतो आणि भारताचे पहिले राष्ट्रपती झालेल्या गांधीजींनी जवाहरलाल दर्डांना पहिले भारतरत्न प्रदान केले होते.’ चुकीच्या माहितीचा खिळा बनवून अचुक बात ठोकली आणि त्यासाठी खास हातोडे हा्णणारे ’ठोकपाल’ कामाला लावले, मग ठाम मताला कोण प्रश्न विचारू शकतो? अशा ठोकपालांसमोर बल्लाळ-निरगुडकरांची वाचा बसली तर नवल नाही.

   अशा ठाम मतावर जग जिंकायला निघालेल्याबद्दल काय बोलायचे? त्यामुळेच काही गंभीर बघावे, ज्ञानात भर घालावी असे वाटले, मग इतर परदेशी वाहिन्यांकडे वळावे लागते. ज्यांच्याकडे अचुक माहिती आहे, पण ठाम मत नाही. उलट संयम व सौजन्य आहे, अशांकडे वळावे लागते. त्यातूनच मला नॅट जिओ वाहिनीवरील एक अप्रतिम कार्यक्रम बघायचा योग आला. ’देहबोलीची रहस्ये’ Secrets of Body Language  बघता आला. एकमेकांशी माणूस संपर्क साधतो त्यात भाषेला महत्त्व आहे. पण माणूस बोलतो, तेव्हा त्याच्या तोंडातून जे शब्द किंवा आवाज बाहेर पडतो वा आपल्याला ऐकायला मिळतो, त्यातून त्याला सांगयचे आहे ते आपण फ़क्त ऐकत असतो. म्हणून त्याने सांगितलेले सर्व खरे असतेच असे नाही. तो खरे बोलतो की खोटे ते कसे ओळखायचे, त्यासंबंधाने हा कार्यक्रम होता. त्याचा जो शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात आलेला आहे, त्यावर आधारित तो कार्यक्रम होता. त्यात त्यांनी असे संगितले, की बोलले जाणारे शब्द फ़क्त ७ टक्के काम बजावतात. बाकी गोष्टी शारिरीक हावभाव, हालचाली, चेहरा यावर अवलंबून असतात.

   चेहर्‍यावरचे भाव, हालचाली, हातवारे, शरीर, यांचा बोललेल्या शब्दांशी मेळ बसला पाहिजे. नसेल तर माणूस खरे बोलत नसतो. अनेकदा तर न बोलताही त्याच्या मनातला खोटेपणा तुम्हाला फ़क्त त्याच्या शारिरीक हालचाली, चेहरा यातून ओळखता येतात. माणूस खरे बोलत असतो तेव्हा त्याचा देह अगदी निर्धास्त असतो, त्याच्या हालचाली नैसर्गिक असतात. जेव्हा बोलले जाणारे शब्द आणि मनातला हेतू यात तफ़ावत असते, तेव्हा त्यातला मेळ संपून त्यामध्ये फ़ारकत नजरेस येऊ लागते. जेव्हा आपण चुकीचे किंवा धडधडीत खोटे बोलत असतो तेव्हा आपोआपच आपल्या शारिरीक हालचालीची अनैसर्गिक तारांबळ उडत असते. कारण नसताना मुद्दाम हातवारे करणे, आवाज चढवणे, हात एकमेकांशी चोळणे, भुवया उचलल्या जाणे होऊ लागते. हे समजावून सांगताना त्या कार्यक्रमात त्यांनी मोठमोठ्या व्यक्ती, त्यांचे वागणे हालचाली, बोललेले शब्द आणि नंतर उघडकीस आलेल्या गोष्टी यांची छान तुलना करून दाखवली आहे.

   तो कार्यक्रम मुद्दाम शक्य असेल तर वाचकाने बघावा. नॅट जिओ वाहिनीवर तो अधुनमधून दाखवला जात असतो. ज्यांना शक्य असेल त्यांनी तो इंटरनेट माध्यमातून देखील बघायला हरकत नाही. गुगलवर शोध घेतल्यास युट्युबवर बघता येईल. हे शक्य आहे त्यांनी मुद्दाम करावे. असे मी का म्हणतो? ते लक्षात आले तर आपण रोज ज्यांना टिव्हीवर तावातावाने बोलाताना बघतो आणि त्यांचे दावे ऐकतो, ते खरे बोलतात की खोटरडेपणा करतात ते आपण त्यांच्या तेव्हाच्या देहबोलीवरून सहज ओळखू शकू.

   आता एक साधी तुलना करून बघा. झी २४ तास मध्ये मंदार परब किंवा स्टारमाझावर प्रसन्न जोशी रोज दिसतात. त्यांना कधीच हातवारे का करावे लागत नाहीत? त्यांच्या उलट निखीलला प्रत्येक वेळी का ओरडावे लागते? का हातवारे सतत करावे लागतात? अन्य वाहिन्यांचे लोक हात किंवा शरीर फ़ारसे न हलवता बातम्या देऊ शकत असतील, तर लोकमत वाहिनीवरच्यांनाच सगळा देह डोलावत का बातम्या सांगाव्या लागतात? जो निखील ’सवाल’ करताना, बातम्या देताना अखंड हलत हेलकावत असतो, तोच ग्रेटभेट करत असताना एका जागी शांत बसून कसा बोलू, प्रश्न विचारू शकतो? खरे बोलले जाण्याची भिती, सत्य लपवायची धडपड, अशा हालचाली करायला भाग पाडत असते. जेव्हा तशी भिती नसते तेव्हा देह शांत असतो, कारण मन शांत निश्चिंत असते. अर्थात त्यासाठी शास्त्रशुद्ध अभ्यासाचीही गरज नाही, की पुराव्याची आवश्यकता नाही. जगजितसिंग याच्या एक लोकप्रिय गझलेमध्ये तोच मुद्दा सहजगत्या येऊन गेला आहे. ’तुम इतना क्यु मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिसको छुपा रहे हो.’  (क्रमश:)
(भाग-१७८) १५/२/१२

३४ टिप्पण्या:

  1. हि वेब साइट बगून माल कळत नाही हा लेख कुणी लिहला पण हे सगळ वाचन झाल्यवर
    मला अस वाटत जानी कुणी हा लेख लीहला त्याचा मनात निखील वागळे यांचा
    बदल. व त्याचा टीव्ही वाहिनी आयबीन बदल मनात खूप राग आहे.. आणि या रागातून हा लेख
    लीहला अस जाणवत आहे या लेख मध्ये
    तुमची भाषा अतिशय सभ्य आहे...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. santoshji, bhau torsekar yancha ha blog ahe ani ha lekh tyancha ahe. bhau he khup mothe ani jeshtha patrakar ahet. bhauna waglechi purna poti mahit ahe. bhaucha adhikar khup motha ahe. asa manat raag dharun kadhi lihit nahit. tyani je lihile ahe ti vastustithi ahe. hats off... bhau, AMAR

      हटवा
    2. bhau sir, namaskar aplya blog frofile madhil About me madhe aplya baddal thodi mihit lihavi. mhanje lokana, blog vachakana kalel ki apan kon ahat. dhanwad.

      हटवा
    3. निखिल वागळे मध्ये न काही पाह्ण्यासारखं आहे ना ऎकण्या सारखं.

      हटवा
    4. bhuni samany jantecha rag mandala ahe...... Santosji kadachit samany nasatil :-)

      हटवा
    5. निखिल वागळे ची बातमी बघताना खूप चीड येते . ह्या अशा पत्रकारा मुळे मराठी माणूस जास्त मागे राहिला . स्वताची तुंबडी भरण्यासाठी NEWS CHANEL काढले आहेत.

      हटवा
  2. निखिलला अभ्यास करून आजचा सवाल मध्ये येत जा असे मी नेहमी twitter वर सांगितले ....पण त्याने मला block केले.

    उत्तर द्याहटवा
  3. I'm totally agree with you sir , I got the scrap on facebook about it then I'm able to see this blog. Thanks Shantnu and Sir you also.
    Its a true fact about Nikhil W.

    उत्तर द्याहटवा
  4. I am neither against of Nikhil Wagale nor Bhau Torasekar. Pan mhanatat na Patrakarane Nipakhsa asave. Tyala tyachi samajik mate asaveet. Pan tyane kothalyahi pakshiya va samajik sanghataneshi sambandh thevu naye kinva tyacha sabhasad nasava. Nikhilche tase nasave, Karan to Purvashramichya Samajvadi party cha (Nath Pai, Gore, SM Joshi/Dandavate) kinva Samajvadi vicharsaranicha ahe. Tyyamule To tyana mhanaje tya vicharsaranitil lokana kadhi jast prashna vichart nahi. Arthat tyani 20 varshanpurvi suru kelele Mahanagar he duparche Vachaniya Vruttapatra hote. Tyani shivsenaa/ani hindutvavadi na kelela virodh hi changalach gajala. Ani to tya paristhit 1992 Babari/Ram prakarnat Yogya hota. Tyane Congressla specially Shard Pawar na hi virodh kela hota. Pan tyane 5/6 varsha purvi IBN Lokmat suru kele tenvha malahi Ascharya vatale, karan Lokmat Group he Dardanche asalele Congress samarthan karanare ahet. Tenva mala Nikhil vishayi shanka vatu lagali. Karan tenvha Dardancha ha ghotala ughad zala navhata. Pan kadhina kadhi tari Nikhil la adchanit ananarya goshti hotil ase vatale. Ata Nikhil ne ek Nispruha patrkar mhanun IBN-Lokmat Madhun Rajinama tari Dyava, karan To tya Channel varun Dardana Adchanit anannare prashna vicharat nahi. yacha arth ekach tyane Lokamt shi adjustment keli asavi. Hi goshta nischitch chukichi ahe. Tyane Swatahala Nispruha ani Lokshahivadi samjayche asel tar Mahanagar sarakhe swatahche channel suru karave. Ani ugach hatware karun (Siddhu Style)TRP vadhavu naye.

    उत्तर द्याहटवा
  5. आपण नमूद केलेली देहबोली या कार्यक्रमाची लिंक खालील प्रमाणे.
    http://www.youtube.com/watch?v=AQENwD-QlRA

    उत्तर द्याहटवा
  6. भाऊ खूपच चांगले लिहिले आहे.
    मी जर्मनीत राहतो , आमच्या कंपनीत उच्च पदासाठी मुलाखत असेल तर देश बोली विशेषज्ञ हा मुलाखतीच्या पेनेल वर असतो. व त्याचा निर्णय किंवा रिपोर्ट महत्त्वाचा असतो.
    आपण वागले ह्यांच्या वृत्त संपादन कलेविषयी अचूक लिहिले आहे,
    सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हरी तात्याच्या भाषेत तुम्ही पुराव्याने शाबीत होतील अश्या वागळे इस्टेट प्रकारात चुका सांगितल्या आहेत.
    तेव्हा तुमच्या त्यांच्यावर आकस नाही हे सिद्ध होते.
    तुमचा कोणा व्यक्तीशी नाही तर पत्रतारीकेत शिरलेल्या अपप्रवृत्तीवर राग आहे जो साहजिकच आहे.

    उत्तर द्याहटवा
  7. भाऊ, शब्दचातुर्य व चपखल बसणारे संदर्भ हे आपल्या या खुसखुशीत व रेशमी चिमटे काढणाऱ्या लेखाचे वैशिष्ठ्य म्हणता येईल. आपली(खरी?)मते देहबोलीच्या मार्फत 'काय बी इन' वर पहाणाऱ्याला 'समजतात' असे निखिल ना उमगत नाही असे मानणे भाबडेपणाचे ठरेल. तरीही त्यांनी ते चाळे (?)चालू ठेवण्यात त्यांचे खास टीआरपी-तंत्र उदय निरगुडकांराही बाधू नये इतकी माफक अपेक्षा.

    उत्तर द्याहटवा
  8. निखील वागळे किंवा इतर कुठलिही वृत्तवाहिनी असेल, सध्या त्या सर्वांचा आवेश प्रेक्षकांचं एक प्रकारचं मत तयार करण्याच्या उद्देशाने असतो असं मला प्रकर्षाने जाणवतं.वृत्त सादरीकरण या विषयाचे जे काही जगन्मान्य नियम आहेत ते ह्यांना शिकवले जात नाहीत, कि त्याकडे कटाक्षाने दुर्लक्ष्य करायलाच शिकवलं जातं हा संशोधनाचा विषय आहे. आजही BBC वरील बातम्या ऐकल्या तर त्या अतिशय संयमित आवाजात,सुरात,आणि नी:पक्षपातीपणे सादर केल्या जातात हे नक्कीच जाणवेल! वृत्तवाहिन्यांवर येणारे निखील वागळे ह्यांच्यासारखे तथाकथित आणि स्वयंघोषित अभ्यासू पत्रकार खरोखर अभ्यासू आहेत का?, ह्याचा विचार अशा वाहिन्या पाहणारे करतात का हा देखील मला पडलेला एक प्रश्नच आहे! लेख फार छान आहे भाऊ.

    उत्तर द्याहटवा
  9. खरं तर या कायबीएन लोकमत या वाहीला फारसा असा दर्जा नाहीच. पुर्वी महानगर हे मुंबईतलं सायंदैनिक चालवत असतांना उगाच सेनेशी पंगा घेउन मार खाल्लेला हा वागळे. अत्यंतीक शिवसेना विरोध हीच त्याची कायबीएन लोकमत मध्ये सामील होण्याची अर्हता.

    आजचा सवाल असो वा कोणताही राजकीय कार्यक्रम असो, हा वागळे त्याच्या हातवार्‍यांनी आणि उच्च रवाने बोलण्यामुळे अगदी डोक्यात जातो. खोटं बोल पण रेटून बोल या प्रमाणे काय वाट्टेल ते संदर्भ देत ओरडत राहणे हेच या वागळे चे काम.

    निपक्षपाती पणा तर या वागळेच्या दुनियेत कधीच नसतो. याच्या कार्यक्रमात सहसा टीकाकार हे समोर असतात आणि ज्यांच्यावर टीका होत असते ते दुरध्वनीवर. याचा फायदा असा की दुरध्वनी वरचा माणूस सडेतोड पणे बोलायला लागला की "माफ करा त्यांच्याशी संपर्क होत नाहीय़े" असं म्हणून पुन्हा टिकेची झोड उठवणार्‍याला बोलतं करता येतं.

    सेना / भाजपा यांच्या नेत्यांना तर फारसं बोलुच दिलं जात नाही.. सतत हा ओरडत त्यांना थांबवायचा घाट घालत असतो अश्या प्रकारे की त्यांचे मुद्दे अचुक असून सुद्धा इथे टिकाकारच उत्साहीत व्हावेत.

    निखिल वागळे ला हे करावं लागतं कारण त्याला सत्य दडवायचाच पैसा मिळतो. असा हा भाडोत्री पत्रकार काय उच्च दर्जाचे कार्यक्रम देणार ???

    उत्तर द्याहटवा
  10. Vagale saheb may be shighrakopi asavet mhanun te lagech hyper hotat ani te vaad kartana ekdum personally ghetat he kityekada disun aalay. Well, tyanche karyakram he lok rastyavarahci bhandane pahilyasarkhi chavine pahtat. Mage ekda Nitesh Ranena tyani eka charchet call kela tevha te Nitesh Ranenvar prachand ukhadale hote, mhanale tumhi mazyavar halla kela kankavalimadhe... ekdum rastyavr bhandalyasarkha vatat hota te...

    Nikhil Wagale na vinanti ki tyani evadhe hyper hovu naye ugach blood pressure cha tras hoel, Tase te abhyasu aahet pan pakshapati batamya detat. Kolsa ghotalyavar te ekahi shabd bolale nahit yache faarach aashcharya vatate

    उत्तर द्याहटवा
  11. भाऊ तुम्ही खूप छान लिहिता. तुम्हाला अनेक शुभेव्छा. अगदी बरोबर लिहिले आहे तुम्ही. हा वागले स्वतः सर्वश्रेष्ठ असल्यासारखा अणि समोर बसलेला तुच्छ असल्यासारखा अणि त्यातून कोणी हिन्दुत्ववादी किंवा बी.जे.पी.चा प्रतिनिधि समोर असला तर त्याला जास्त चेव चढतो. कांग्रेसी मुल्ला संस्कृतीने त्याला चांगलेच पछाडले आहे.

    उत्तर द्याहटवा
  12. bhau tumchya vicharanshi me purnpane sahamat aahe. Comedy Express madheel dhamal aani vidamban khare aahe ya manasache.

    उत्तर द्याहटवा
  13. samajik prabhodhan and aatmaparikshan donhi sadhya honyasathi ya web sitecha nakki upayog honar aahe ha vishwas.

    उत्तर द्याहटवा
  14. Who feels that Uday Nirgudkar and Milind Ballal are knowledgeable ? They are not even well read"

    उत्तर द्याहटवा
  15. लेख भारी आहे! निखिल वागळे म्हणजे 'चित भी मेरी और पट भी मेरा' आणि 'लोका सांगे ब्रम्हज्ञान!'

    उत्तर द्याहटवा
  16. भाऊ, हा नविन प्रकारचा लेख वाटला. चांगला आहे.
    पण मला नाही वाटत ह्या वागळे प्रकरणाचं थापा मारणं अशा पद्धतीने ओळखता येईल. त्यासाठी माणसाला भान असाव लागतं कि तो चुकीची माहिती देतोय म्हणून.

    उत्तर द्याहटवा
  17. नेट जीओ वरच्या कार्यक्रमाचे काय नाव आहे ?

    उत्तर द्याहटवा