रविवार, १६ सप्टेंबर, २०१२

डॉ. झाकीर नाईकचा बंदोबस्त कोणी करायचा?


   गेला आठवडाभर जगात अनेक देशांमध्ये मुस्लिम रस्त्यावर उतरले आहेत आणि मिळेल तेवढा धुमाकूळ घालत आहेत. लिबियामध्ये मुस्लिम जमावाने अमेरिकन मुत्सद्यासह तीन कर्मचार्‍यांना जाळून टाकले, वकिलात पेटवून दिली. इजिप्तमधल्या अमेरिकन वकिलातीवर हिंसक जमावाने हल्ला चढवला. त्याचीच पुनरावृत्ती येमेनमध्ये झाली. अन्यत्रही अशीच कमीअधिक प्रतिक्रिया उमटलेली आहे. अगदी आपल्या देशात काश्मिरमध्ये शुक्रवारचा नमाज संपल्यावर मुस्लिमांचा जमाव रस्त्यावर येऊन धुमाकुळ घालत होता हे वाहिन्यांच्या बातम्यांमधून जगाने पाहिले आहे. तामीळनाडूत चेन्नई येथे अमेरिकन वकीलातीवर मुस्लिम जमावाने हल्ला केल्याचे वृत्त आहे. त्याचे कारण एव्हाना सर्वश्रुत आहे. अमेरिकेत कोणीतरी एक माहितीपट काढून त्यात इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित महंमद पैगंबर यांची हेटाळणी व अवहेलना केली अशी बातमी आहे. तो नियमित चित्रपट नसून कोणी तरी एक व्हिडीओ तयार करून युट्यूब या इंटरनेट या संकेतस्थळवर टाकला आहे. काही लोकांनी तो बघितला आणि प्रेषिताची बदनामी म्हणून जगभर धुमाकुळ चालू झाला. मुस्लिमांच्या भावना दुखावणार्‍या त्या व्हिडीओचा निर्माता जीवाला घाबरला असून अज्ञातवासात गेला आहे. याबद्दल कोणी तार्किक चर्चा करायला तयार आहे काय? आणि प्रेषितांच्या बदनामीसाठी संपुर्ण अमेरिकेला व अमेरिकन नागरिकांना दोषी धरायचे काय? निदान त्या वर्तनाला कुठल्या मुस्लिम नेते वा संघटनांनी आक्षेप तरी घेतलेला दिसत नाही. म्हणजेच धर्मभावना किंवा आपल्या श्रद्धास्थानाला धक्का देण्याची कोणी हिंमत केली, तरी त्याला गुन्हा ठरवून थेट शिक्षा देण्याचा सामान्य मुस्लिमांना जन्मदत्त अधिकार आहे, अशीच ही भूमिका नाही काय? मग तोच न्याय व निकष उर्वरित कुठल्याही धर्माच्या अनुयायांनी लावायचा काय? समजा कोणी गणपती या हिंदू दैवताची अशीच हेटाळणी व अवहेलना करत असेल तर त्यावर हिंदूंनी काय करायचे? तो कोणी मुस्लिम असेल तर त्याच्या अशा कृत्यासाठी तमाम मुस्लिमांना गुन्हेगार मानून शिक्षा द्यायला सुरूवात करायची काय?

   याच लेखाच्या शेवटी मी मुद्दाम एक इंटरनेट दुवा दिलेला आहे. तो मुस्लिम वाचकांनी मुद्दाम बघावा. प्रामुख्याने ज्यांनी माझ्या लेखमालेबद्दल शंका उपस्थित केल्या व मला मुस्लिमांचे दोष दाखवणारा म्हणुन पक्षपाती ठरवण्याचा प्रयास केला, त्यांनी तो व्हिडीओ मुद्दाम बघावा. कारण ज्या संकेतस्थळा संबंधाने आज जगात एवढी हिंसा माजलेली आहे, त्याच युट्य़ूब या साईटवर मी दिलेला व्हिडीओ आहे आणि तो तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा आहे. आणि असे काही केल्याने हिंदूंच्या भावना दुखावतील असे माहित असूनही तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे. नुसता तो व्हिडीओ हिंदूंच्या भावना दुखावणारा नाही. तर अन्य मुस्लिमांनीही हिंदूंच्या भावना दुखावण्याचे त्यात आग्रहपुर्वक आवाहन करण्यात आलेले आहे. आपल्या कुणा हिंदू मित्र वा ग्राहकाच्या भावना दुखावतील म्हणुन तुम्ही तोंड उघडण्याची हिंमत करत नाही, म्हणजेच मुस्लिम असून तुम्ही अल्लाहवर प्रेम करत नाही; असे त्यात स्पष्ट शब्दात सुचवलेले आहे. म्हणजेच हिंदूंच्या धर्मभावना व श्रद्धा दुखावण्यासाठी प्रोत्साहन नव्हे चिथावणी त्यात दिलेली आहे. आणि ती चिथावणी देणारा माणूस डॉ. झाकीर नाईक नावाचा मुस्लिम विचारवंत आहे. आता त्यातून ज्यांच्या भावना दुखावतील त्या हिंदूंनी काय करावे अशी मुस्लिमांची अपेक्षा आहे? जगभरच्या मुस्लिमांनी प्रेषितांच्या बदनामीच्या व्हिडीओसाठी सर्वच अमेरिकनांना गुन्हेगार ठरवून शिक्षा देण्याचा पवित्रा घेतला, त्याप्रमाणे हिंदूंनी तमाम मुस्लिमांना गुन्हेगार मानायचे काय?

   इथे मी माझा कुठलाही नियम वा निकष लावलेला नाही. जो नियम वा न्याय मुस्लिम सांगतील तो मला मान्य आहे. जर त्यांची जगभरची हिंसा योग्यच असेल तर मग त्याचप्रमाणे जगभरच्या हिंदूंनी वागायचे काय? एका डॉ. झाकीर नाईकसाठी जगभरच्या मुस्लिमांना गुन्हेगार मानायचे काय? कारण उपरोक्त व्हिडीओमध्ये हिंदूंचे सर्वाधिक लोकप्रिय दैवत श्री गणेशाची विटंबना व हेटाळणी करण्यात आलेली आहे. झाकीर नाईक यांनीच ती अवहेलना केलेली नाही तर अन्य मुस्लिम बांधवांनी तशी गणपतीची विटंबना करावी; असे त्यात उघड आवाहन केलेले आहे. कोणा हिंदू मित्राने पूजेला किंवा गणपतीच्या सणाला आमंत्रित केले, तर त्याला कोणते प्रश्न विचारून हेटाळणी करावी, याचे ते नेमक्या शब्दातील आवाहन आहे. आणि ज्या तर्कबुद्धीने झाकीर ते करू बघतात, त्याच तर्कबुद्धीने कोणी श्रद्धावान मुस्लिमाला प्रेषित महंमद, अल्लाह किंवा गॅब्रियल या देवदूताबद्दल शंका विचारल्या तर चालेल काय? पूजेला किंवा गणपतीच्या सणाला जाऊन प्रसाद घेताना, असे प्रश्न हिंदू मित्राला विचारायला झाकीर सांगतात, तेव्हा त्याच्या भावना नेमक्या हळव्या असतानाच त्याची कळ काढायचे आवाहन करीत आहेत. आणि तसेच कोणा हिंदूने उलट प्रसंगी करायचे ठरवले तर? म्हणजे कोणा मुस्लिम मित्राने हिंदूला ईदच्या निमित्ताने आमंत्रित केले असेल तर अल्लाह किंवा धर्मविषयक तर्कशुद्ध प्रश्न विचारले तर? किती मुस्लिम ते प्रश्न तर्कबुद्धीने सहन करू शकतील? कारण हिंदू पुराण, वेद किंवा ख्रिश्चन बायबल जेवढे अनाकलनिय आहे, तेवढ्याच अनाकलनिय गोष्टी व कथा इस्लामी ग्रंथामध्येही शोधून दाखवता येतील. पण धर्मश्रद्धा या तर्क किंवा वैज्ञानिक निकषावर तपासल्या जाणार्‍या गोष्टी नसतात. म्हणुनच कोणी प्रेषितांवर चित्रपट काढला किंवा चित्र काढले तर मुस्लिम संतप्त होतात. अशा टिका किंवा विडंबनाचा तर्कशुद्ध वा वैचारिक मुकाबला केला जात नाही. मग त्याच पद्धतीने हिंदूंच्या दैवत किंवा श्रद्धांची तार्किक तपासणी ही हिंदूंच्या धर्मभावनांची विटंबनाच नाही काय? ती करण्याचा कुठला वैधानिक, घटनात्मक वा कायदेशीर अधिकार झाकीर नाईक यांना मुस्लिम म्हणून मिळाला आहे? आणि त्यांना तसा अधिकार असेल तर तो प्रत्येक भारतीय वा जगातल्या कुठल्याही माणसाला समानच आहे. त्यावर मुस्लिमांनी चिडून प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही. आणि तसा अधिकार कोणालाच नसेल तर झाकीर नाईकना आवरायचे कोणी? त्याचा बंदोबस्त करायचा कोणी?

   मी धर्माच्या कुठल्याही विषयाला हात न घालता धर्मस्वातंत्र्याचा आधार घेऊन मुस्लिमांचे जगभर चाललेले वर्तन एवढ्याच मर्यादेत लिहितो आहे, आणि त्यात धर्माची कुठलीही अवहेलना होऊ नये, याची काळजी घेतली आहे. तरी काही मुस्लिम कमालीचे विचलित झाले आहेत. मग उघडपणे झाकिर नाईक हिंदूंच्या दैवताची इतकी अवहेलना करतात, तर हिंदूंनी आपल्या श्रद्धा जपण्यासाठी कोणाला शिक्षा द्यावी; तेही जाहिरपणे सांगावे. मला ज्यांनी फ़ोन करून चार खडे बोल ऐकवायचा जागरूकपणा दाखवला, त्यांनी या झाकीर नाईकसाठी हिंदूंनी कोणाला गुन्हेगार ठरवून शिक्षा करावी, तेही सांगायला तेवाढ्याच उत्साहात पुढे यावे. तुमच्या धर्मश्रद्धा नाजूक व प्रिय असतील तर दुसर्‍यांच्या पायदळी तुडवता कामा नयेत. आणि एका कोणा अमेरिकन निर्मात्यासाठी संपुर्ण अमेरिकनांना दोषी मानायचे, तर एका झाकीर नाईकसाठी सर्वच मुस्लिमांना गुन्हेगार मानावे लागेल, त्याचे काय? तर्क किंवा नि्यम हे दुधारी शस्त्र असते. त्याचे फ़ायदे असतात, तसेच तोटेही असतात. सुदैवाने हिंदू समाज तसा अतिरेकी विचार करत नाही, म्हणूनच एका झाकीर नाईकसाठी तो तमाम मुस्लिमाना आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करत नाही. पण म्हणून मुस्लिमांनी झाकीर नाईकला सोडावे काय? एखादा कोणी नालायक असेल असेच म्हणायचे असेल, तर तो चित्रपट काढून युट्युबवर टाकणारा अमेरिकनही एखादाच आहे ना? त्याचा बंदोबस्त अमेरिकेने करावा नाहीतर अमेरिकेने त्याची कडू फ़ळे चाखावित, अशीच एकूण मुस्लिमांची भूमिका आहे ना? मग झाकीर नाईकचा बंदोबस्त मुस्लिमांनीच करायला नको का? नाही तर त्याची फ़ळे कोणाला भोगायची पाळी येईल?

   गुजरात-मोदी अशी टेप लावून उपयोग नसतो. तिथे कारस्थान करून मुस्लिमांवर हिंसक हल्ले झाले असे म्हणणेही सोयीचे असेल. पण हजारो लाखो हिंदूंचा जमाव त्यात सहभागी झाला, हे विसरता कामा नये. इतका मोठा जमाव मुठभर कारस्थानी लोकांच्या योजनेला बळी पडायला आणि हिंसाचार करायला इतका उतावळा का होता, याचा विचारच केला जाणार नाही काय? ते लाखो हजारो हिंदू दंगलखोर पशूसारखे मुस्लिमांवर तुटून पडले, त्याची कारणे कोणीच तपासणार नाही काय? चित्रकार फ़िदा हुसेन वा झाकीर नाईकसारखी मंडळी कायद्याचा आडोसा घेऊन सामान्य हिंदूंच्या भावनांशी जो खेळ करता असतात, त्यातून जी प्रक्षोभाची भावना निर्माण होत असते, ती लगेच पेट घेणारी नसते. पण ती स्फ़ोटक भावना तयार असते. तेव्हाच मग कोणी कारस्थान करणारा तिचा स्फ़ोट घडवून आणू शकतो. म्हणुन हिंदूंच्या भावनांशी खेळ करणार्‍या झाकीर नाईकसारख्या व्यक्तीचा बंदोबस्त मुस्लिम समाजातील बुजूर्गांनी व संस्थांनी केला पाहिजे. नाहीतर आज जे लिबिया, इजिप्त, येमेनमध्ये घडते आहे, त्याचीच प्रचिती गुजरातसारख्या घटनांमधून येत असते. मोदींना शिव्या मोजून उपयोग नाही. त्यांच्यासारख्याला पेटवता येईल अशी हिंदूंची स्फ़ोटक मानसिकता तयार करून देणार्‍या झाकीरचा बंदोबस्त मुस्लिमांनी करायला हवा आहे. किती मुस्लिम संघटनांनी त्यासाठी आजवर पावले उचलली आहेत?   ( क्रमश:)
व्हिडीओचा इंटरनेट दुवा-

http://www.youtube.com/watch?v=k1Clr_U8gXE&noredirect=1

भाग  ( ३३ )  १७/९/१२

७ टिप्पण्या:

  1. अतिशय संयत अन वास्तवदर्शी लेख. आपली लेखनशैली प्रचंड आवडली.

    उत्तर द्याहटवा
  2. Bhau kharach manatil bhavna vyakt kelyat...sarkha gujrat dangal baddal bolnare godhryala hindu karsevakan jivant jalalyabaddal gapp ka astat..

    उत्तर द्याहटवा
  3. हिंदूंनो, तुम्हाला अंधारात ठेवणार्‍या प्रसारमाध्यमांचा निषेध करा !
    हिंदूद्वेष्टे डॉ. झाकीर नाईक यांनी केलेल्या श्री गणेशाच्या अवमानाचे वृत्त दैनिक `सनातन प्रभात’ने प्रथम प्रसिद्ध केले. त्यानंतर हाताच्या बोटावर मोजता येणार्‍या दैनिकांनी आणि वृत्तवाहिन्यांनी या संदर्भात वृत्त दिले. वृत्त प्रसिद्ध न करणार्‍या प्रसारमाध्यमांची नावे खाली दिली आहेत.
    प्रसिद्ध न करणारी (आसुरी/मृतवत)
    हिंदी वृत्तवाहिन्या : आज तक, एबीपी न्यूज, इंडिया-टी.व्ही., एन्.डी.टी.व्ही., झी., आय.बी.एन्. ७, न्यूज २४, टी.व्ही -९, ‘सहारा समय’ (राष्ट्रीय)
    ज्या दैनिकांनी आणि वृत्तवाहिन्यांनी हे वृत्त प्रसिद्ध केले नाही. अशांनी हिंदूंना त्यांच्या धर्मश्रद्धांच्या होणार्‍या अवमानापासून अंधारात ठेवण्याचे पाप केले आहे. हिंदूंनो, अशांच्या विरोधात सनदशीर मार्गाने निषेध नोंदवा !

    उत्तर द्याहटवा
  4. हिंदू धर्मियांनी जाणूनबुजून कधीही इतर धर्माच्या अनुयायांना त्यांच्या धार्मिक भावना दुखावतील असे प्रश्न विचारण्याची आगळीक केलेली नाही. पण औत्सुक्यामुळे, कुतुहलामुळे किंवा धर्मद्वेष्टेपणामुळे काही इतर धर्मांमधील काही अजाण व उद्धट अनुयायांनी, स्वतःच्या धर्मामधील चालीरितींच्या उणीवा झाकून ठेवून, हिंदू धर्म पुरता जाणूनदेखील न घेता, त्यातील चालीरितींबद्दल चेष्टायुक्त प्रश्न विचारून व युक्तिवाद करून स्वतःच्या धर्माचे श्रेष्ठत्व हिंदू धर्मियांच्या गळी उतरविण्याचे व स्वतःच्या धर्माचे अनुयायी येनकेन प्रकारेण वाढविण्याचे हीन व सामाजिक मूल्यांना घातक ठरतील असे लांच्छनास्पद प्रयत्न चालवले आहेत.

    या व्हिडीओमधून तर हे स्पष्टच होतंय की हिंदूंची कुरापत काढण्यासाठी उकसवणारे झाकीर नाईक सारखे लोक मुस्लीम समुदायामधे आहेत. या माणसाच्या भाषणांवर म्हणे बॅन लावला आहे, तर मग याची भाषणं अजूनदेखील यूट्यूबवर कशी, हा एक प्रश्नच आहे. याच माणसाच्या वक्तव्यांना हिंदूंनी दिलेल्या चोख उत्तरांचे व्हिडीओज मात्र यूट्यूबवर चालत नाहीत. जर हिंदू देवदेवतांबद्दल चेष्टायुक्त उत्सुकतेने केलेली वक्तव्ये चालू शकतात, तर इस्लामच्या प्रेषितावर काढलेला माहितीपट का चालू शकत नाही?

    उत्तर द्याहटवा
  5. I have seen a video on N.D.T.V. in which this Zakir Naik is commenting about ShriKrishna Sarcastically.Some body needs to tell such lumpane people that this is not going to be tolerated any more.

    उत्तर द्याहटवा
  6. या देशात देशविरोधी गोष्टींचा निषेध करण्यासाठी एकमत होत नाही हे फार दुर्दैवी. देशभक्ती अगदी तळापासुन शिकवावी लागत आहे हे दुर्दैव .

    उत्तर द्याहटवा