रविवार, ३० सप्टेंबर, २०१२

धर्माच्या पालनात राष्ट्राचे स्थान काय असते?


   कालच्या लेखामध्ये मी सय्यद इफ़्तिकार यांच्या विवरणाचा हवाला दिला होता. तो अनेकांना थक्क करणारा असेल. पण तेच वास्तव आहे. मुस्लिमेतर ज्याला सेक्युलर विचारसरणी किंवा आधुनिक राज्यव्यवस्था म्हणतात, ती इस्लामला अजिबात मान्य नाही. निदान ज्याला इस्लामचे धर्मपालन करायचे आहे, त्याला तरी ती मान्य नाही, असे जगभरच्या अनेक मुस्लिम विचारवंताचे मत आहे. आणि ते मान्य करून वा समजून घेऊन, आपण मुस्लिमांच्या वर्तनाकडे बघितले तर अनेक प्रश्नांचा उलगडा होऊ शकतो. आणि भारतातल्याच नव्हेतर जगभरच्या मुस्लिमांचे वर्तन तसेच दिसेल. भारतात रहायचे आणि राज्यघटना व कायदे जुमानायचे नाहीत, हे भयंकर तर्कशास्त्र आहे असे कोणीही म्हणेल. कारण नागरिक देशाचा असतो आणि तिथले कायदे त्याला मानायलाच हवेत, असे आपले ठाम मत असते. अशी आपली श्रद्धा असते. पण मुस्लिमांना तसे मानायची मुभा त्यांचा धर्म देतो का? आपण आधुनिक जमान्यात ज्याला राष्ट्र म्हणतो ती राष्ट्राची संकल्पना इस्लामला मान्य आहे काय? सय्यद इफ़्तिकार यांनी त्यावरही मार्गदर्शन केलेले आहे. शेषराव मोरे यांच्या पुस्तकातील त्या प्रदिर्घ अभिप्रायामध्ये सय्यद इफ़्तिकार यांनी राष्ट्र या संकल्पनेवर काय विचार मांडलेत ते वाचा, मग मुस्लिमांच्या किंवा तुमच्या स्वत:च्या राष्ट्रप्रेमाबद्दल तुमच्या मनातले सर्व आक्षेपच निकालात निघतील. इफ़्तिकार लिहितात,

    ‘राष्ट्र आणि राष्ट्रवादाची नवी कल्पना पाश्चिमात्यांनी औद्योगिक क्रांती नंतर प्रचलीत केली आहे. त्याला ते आधुनिक म्हणतात. त्यांनी दिलेल्या व्याख्याच खर्‍या आहेत, असे त्यांनी सर्व जगाला पटवून दिले आहे. आम्हीही (इथे आम्ही म्हणजे इफ़्तिकार यांना सर्वसामान्य भारतीय नागरिक असे सुचवायचे आहे)त्यांच्या या कल्पनांना बळी पडलो आहोत. राष्ट्राची व्याख्या आजपर्यंत कुणी अचुक मांडलेली नाही. कारण राष्ट्राच्या सीमा किंवा त्यांची चौकट सतत बदलत असते. राष्ट्र म्हणजे एका व्यक्तीची विस्तारित ओळख. त्या ओळखीमागची त्याची अस्मिता सतत बदलत असते. राष्ट्राशी आपल्याला संबंधित करणे (Identify)  हाच एका व्यक्तीचा उद्देश असतो. त्याचे स्वत:चे अस्तित्व टिकवणे, त्याचे जतन करणे हेच त्याचे संबंध जोडण्यामागचे अंतिम ध्येय असते. म्हणून राष्ट्र किंवा राष्ट्रवादाची प्रवृत्ती वरचेवर संकुचित होऊन शेवटी एका व्यक्तीपर्यंत सीमित होत जाते. जेव्हा समोर मोठे संकट असते, तेव्हा राष्ट्रवादाची कल्पना व्यापक बनते. ते उद्दिष्ट साध्य झाले, की वेगवेगळ्या अस्मिता आपले डोके वर काढतात."  

   इथे इफ़्तिकार काय समजावून देत आहेत? ज्याला आपण राष्ट्र म्हणतो, त्याची काही अचुक व्याख्याच नाही. आणि राष्ट्र ही संकल्पना पाश्चात्यांची आहे. ती आपली भारतिय कल्पना नाही. त्यामुळेच त्याची आज सर्वमान्य असलेली व्याख्याही आपली नाही. एकदा हे मान्य केले, मग राष्ट्र आणि त्याच्या भौगोलिक सीमाच नि्रर्थक होऊन जातात. मग काश्मिरातला मुस्लिम पाकिस्तानशी निष्ठा का दाखवतो, या प्रश्नाला अर्थच उरत नाही. दुसरीकडे म्यानमारमधल्या मुस्लिमासाठी इथे मुंबईत मुस्लिम रस्त्यावर का उतरतात, त्याचेही रहस्य उलगडू शकते. कारण मुस्लिम आहेत ते राष्ट्र नावाची भौगोलिक सीमा व तिची व्याख्याच मानत नाही. मग त्या संकल्पनेशी निष्ठावान असण्याला अर्थ कुठे उरतो? इथे आणखी एक उदाहरण देणे योग्य ठरावे. पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार शोएब मलिक याने २००७ साली विश्वचषक टी-२० क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तान पराभूत झाल्यावर काढलेले उद्गार. तेव्हा अंतिम सामन्यात पाकिस्तानचा भारताकडून पराभव झाला. त्यावर बोलताना शोएब मलिक याने जगाभरच्या मुस्लिमांची माफ़ी मागितली होती. त्याचे काय कारण? त्यामागची मानसिकता कोणती? पाकिस्तानचा क्रिकेट संघ जगभरच्या मुस्लिमांचा संघ असू शकतो काय़? आणि तसे असेल तर मग भारताचा पराभव होऊन पाकिस्तान जिंकला असता तर तो जगभरच्या मुस्लिमांसाठी विजय ठरणार होता काय? मग भारतीय संघामध्ये जे मुस्लिम खेळाडू सहभागी होते त्यांचे काय? युसूफ़ व इरफ़ान पठाण असे बडोद्याचे दोन मुस्लिम भाऊच भारतीय संघात होते. मग त्यांनी भारताला मिळवून दिलेला विजय कोणाचा होता? मलिकने असे का बोलावे?

   शोएब मलिक जे बोलला त्यालाही त्याचा तर्कशुद्ध खुलासा करता येणार नाही. तेव्हा त्याच्यावर बरीच टिका झाली होती. कारणही उघड होते. एकट्या भारताच्या संघातच मुस्लिम खेळाडू नव्हते, तर दक्षिण आफ़्रिका व अन्य संघातही मुस्लिम खेळाडूंचा समावेश होता. बांगला देशाच्या संघातही जवळपास सगळेच खेळाडू मुस्लिम होते. मग शोएबला काय म्हणायचे होते? तो अंतिम सामना मुस्लिम देश आणि मुस्लिमेतर देश यांच्यातला असल्याने मुस्लिमांचा जागतिक पराभव झाला असे त्याला म्हणायचे होते काय? जर तो मुस्लिमांचा जय किंवा पराजय असेल तर मग मुस्लिमाचे राष्ट्र तरी कुठले मानायचे? पाकिस्तान की बंगला देश? सौदी अरेबिया की इराक? कुठला देश मुस्लिमांचा असतो आणि त्यांच्या राष्ट्रनिष्ठा कशा सिद्ध व्हायच्या? शोएब मलिकने भारतीय मुस्लिमच नव्हेत तर जगभरच्या कुठल्याही देशात वास्तव्य करणार्‍या मुस्लिम नागरिकाच्या राष्टीयत्वावर प्रश्नचिन्ह लावले की नाही? त्याला मुर्ख म्हणायचे तर मग सय्यद इफ़्तिकार यांच्या्सारख्या इस्लामी धर्मपंडीताच्या विवेचनाचे काय करायचे? कारण इस्लामला आधुनिक राष्ट्रीय संकल्पना किंवा त्याची भौगोलिक व्याख्याच मान्य नाही, असे त्यांचे प्रतिपादन आहे. हे इस्लामचे वेगळेपण आपण लक्षात घेत नाही, म्हणुन मग अमूक बाबतीत कोणी मुस्लिम असा का वागला, त्याबद्दल आपल्या मनात शंका निर्माण होतात. मग बिचारा इर्फ़ान पठाण किंवा युसूफ़ पठाण आपल्या देशाच्या संघासाठी कडी मेहनत करून विजय मिळवून देतो, त्याला काय म्हणायचे? तो सच्चा मुस्लिम रहात नाही काय? शंका शेकडो असतात आणि त्यांची तर्कशुद्ध उत्तरे नसतात, मग अधिकच गोंधळ उडत असतो. इफ़्तिकार म्हणतात ते मान्य करू, की राष्ट्राची आधुनिक व्याख्या पाश्चात्यंनी तयार केली व आपल्या गळ्यात बांधली आहे. पण त्यानुसारच आजचा भारत देश उभा आहे व त्यानुसारच संमत केलेल्या राज्यघटनेनुसार त्याचा कारभार चालविला जाता आहे ना? मग त्याचे काय करायचे? ते कायदे किंवा ती घटना भारतातल्या मुस्लिमांनी मान्य करून जगावे की नाही? ती मान्य करण्यात मुस्लिमांच्या धर्मपालनाला बाधा येत असेल तर काय करायचे?

   हे प्रश्न मी मुद्दाम विचारतो आहे कारण हेच प्रश्न सतत बोलले जात असतात आणि त्याची उत्तरे दिली जात नाहीत वा स्पष्ट केली जात नाहीत. उलटसुलट खुलासे येतात. त्यातून शंका निर्माण होतात. मग अब्दुल हमीदसारख्या शुरवीर जवानाचे हौतात्म्य बाजूला पडते. एका मुस्लिमाने देशासाठी गाजवलेला पराक्रम नजरेआड होतो आणि कोणी बॉम्ब फ़ोडले, घातपात केले त्याचाच गाजावाजा अधिक होतो. आणि असा गोंधळ हिंदू किंवा मुस्लिमेतरांचाच होत नाही, तर सामान्य मुस्लिमाचाही होतो. त्यालाही आपल्या राष्ट्रनिष्ठा आणि धर्मनिष्ठा यांच्यात कशाला प्रभूत्व, प्राधान्य द्यावे, त्याबद्दल स्पष्ट उत्तर नसते. एकूण सामाजिक घडामोडींपासून मुस्लिम वेगळा पडत जातो. मुख्य प्रवाहापासून दूर फ़ेकला जातो. मग त्याला जबाबदार कोण? स्वत:च अलिप्त राहू बघणारा मुस्लिम समाज, की त्याला मुख्यप्रवाहापासून अलिप्त ठेवणारे त्याचे धार्मिक नेतृत्व? आणि हे मुद्दाम मी इथे विचारतो आहे, कारण तो विषय आपल्या देशापुरता किंवा हिंदू-मुस्लिम संबंधापुरता मर्यादीत नाही. तो जागतिक विषय बनू लागला आहे. इथे असा विषय निघाला, मग कुणा संघ परिवार वा हिंदूत्ववाद्यांकडे बो्ट दाखवले जाते. पण मग जिथे हिंदू धर्माचे नावनिशाण नाही व जे प्रगत विकसित युरोपीय देश आहेत, तिथल्या अत्यल्प मुस्लिम लोकसंख्येचा कोणाशी कशाचा संघर्ष चालू आहे? मुस्लिमेतर राष्ट्रे वा देशात अलिकडे अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यातून मुस्लिम एकाकी पडू लागला आहे. त्यामुळेच अशा प्रश्नांची उत्तरे शोधणे अगत्याचे बनू लागले आहे. कारण जगभर या विषयाचे रुपांतर मुस्लिम व मुस्लिमेतर असे होत चालले आहे. यातल्या अनेक युरोपियन देशात सांस्कृतिक विविधतेसाठी अरेबियन अफ़्रिकन देशातून मुस्लिम स्थलांतरणाला प्राधान्य देण्यात आले. ज्यांनी मुस्लिमांच्या मोठ्या लोकसंख्येला अगत्याने आपल्या देशात सामावून घेण्याचा प्रयत्न केला, तिथल्या लोकांशी स्थलांतरीत मुस्लिमांचा संघर्ष होण्याची काय कारणे असू शकतात? स्विटझर्लंड सारख्या देशात एका भव्य मशिदीच्या मिनाराची उंची किती असावी, यावर सार्वमत घेण्याची वेळ का यावी? सेक्युलर व उदारमतवादी देशांची मुस्लिमांकडे बघण्याची नजर का बदलत आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे म्हणुनच अगत्याची होत चालली आहेत. त्याचे काही दुवे सय्यद इफ़्तिकार यांच्या विधानांमध्ये मिळू शकतात. इस्लाम ही स्वतंत्र सामाजिक, राजकीय जीवनव्यवस्था असण्याशी या जगभर आढळणार्‍या बेबनावाचा संबंध येतो का?      ( क्रमश:)
भाग  ( ४६ )  १/१०/१२

शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१२

देशातल्या कायद्यापेक्षा धर्मपालन श्रेष्ठ असते


   मुस्लिम असा का वागतो? बर्‍याच बाबतीत असा प्रश्न विचारला जातो. या लेखमालेच्या निमित्ताने अनेक वाचकांनी मुस्लिमांविषयीचे नेहमीचे आक्षेप मला फ़ोनवर ऐकवले किंवा इंतरनेटच्या माध्यमातून उपस्थित केले. पाकिस्तान मॅच जिंकला मग मुस्लिम फ़टाके का वाजवतात? मुस्लिमांच्या राष्ट्रभक्तीचा पुरावा काय? असे नेहमीचे ठाशीव प्रश्न आहेत. त्याची उत्तरे मिळत नाहीत याला मुस्लिमांपेक्षा आपली सेक्युलर माध्यमे जबाबदार आहेत. कारण माध्यमांनी कधीच अशा प्रश्नांची चर्चा होऊ दिली नाही किंवा लोकांच्या शंकानिरसनाचा प्रयास केलेला नाही. पण मुस्लिमांच्या ज्या अनेक प्रकाशन संस्था वा साधने आहेत; त्यातून अशा प्रश्नांना व शंकाना वेळोवेळी उत्तरे दिली गेली आहेत. स्पष्टीकरण आलेले आहे. पण खाजगी प्रकाशने व साधनांची मर्यादा असते. त्यामुळे अशी उत्तरे किंवा स्पष्टीकरणे सामान्य लोकांपर्यंत पोहोचत नाहीत आणि गैरसमज कायम रहातात, त्याबरोबरच शंका, संशय कायम रहातात. मुख्य प्रवाहातील माध्यमांनी अशा विषयावर जाहिर व सविस्तर खुल्या चर्चा घडवल्या, तर त्या शंकासमधानाला प्रोत्साहन मिळू शकेल आणि प्रबोधनही होऊ शकेल. एक उदाहरण पुरेसे ठरावे. शेषराव मोरे या ख्यातनाम सावरकरनिष्ठ लेखकाने प्रयत्नपुर्वक इस्लामचा अभ्यास करून ‘मुस्लिम मनाचा शोध’ घ्यायचा प्रयत्न केला. त्याच नावाचे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झालेले आहे. त्यांच्या त्या प्रयत्नांची मुस्लिम मौलवी व अभ्यासकांनीही पाठ थोपटली आहे. पण त्या अभ्यासपुर्ण पुस्तकामध्ये जी सविस्तर चर्चा झाली आहे, तशी माध्यमांनी कधीच का करू नये? त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यापुर्वी मोरे यांनी कच्ची प्रत काही मुस्लिम धर्मपंडीतांकडे अभिप्रायासाठी पाठवली होती. तिचा सांगोपांग परामर्श घेऊन सय्यद इफ़्तिकार अहमद या मुस्लिम धर्मपंडीतांनी प्रदीर्घ अभिप्राय पाठवला होता. त्यामध्ये उपरोक्त प्रश्नांसारख्या शेकडो शंकाची साफ़साफ़ उत्तरे आहेत. पण कधी त्यावर मुख्य प्रवाहातील माध्यमांनी चर्चा घडवली आहे काय? का नाही घडवली? की अशा चर्चेतून हिंदू मुस्लिमातील मतभेद दूर होतील. शंका संशय संपुष्टात येतील; अशी भिती आपल्या सेक्युलर माध्यमांना वाटते काय? नसेल तर अशी चर्चा का होत नाही?

   इस्लाम धर्म, त्याची जीवनशैली, त्याची राजकीय भूमिका, त्याच्या संदर्भात राष्ट्र व राष्ट्रवादाच्या संकल्पना, जिहाद इत्यादीबद्दल इफ़्तिकार यांनी सविस्तर विवरण दिले आहे. ते वाचले तर आपण बिनबुडाच्या गृहितावर मुस्लिमांना शंका विचारतो आणि अज्ञानाधिष्ठीत शंका काढतो, असेच आक्षेप घेणार्‍यांच्या लक्षात येईल. किंबहूना अनेक आक्षेप व संशय हे इस्लामविषयक अज्ञानातून आलेले आहेत, हे मान्यच करावे लागते. उदाहरणार्थ, राष्ट्रवादी, राष्ट्रभक्ती हे शब्द ज्या अर्थाने सामान्य नागरिक वापरत असतो; त्यापेक्षा त्याचे इस्लामच्या संबंधाने होणारे अर्थ अगदीच भिन्न आहेत. ज्यांना राष्ट्र ही संकल्पनाच भौगोलिक अर्थाने मान्य नसेल; तर त्या अर्थाने त्यांच्याकडून राष्ट्रभक्तीची अपेक्षा बाळगणे योग्य होईल का? सय्यद इफ़्तिकार यांनी अशा अनेक मुद्दे व आक्षेपांना त्या अभिप्रायातून सविस्तर उत्तरे दिली आहेत. उदाहरणार्थ इफ़्तिकार म्हणतात,

इस्लाम एक धर्म (रिलिजन) नसून ती परिपुर्ण सामाजिक, राजकीय आणि सर्वार्थाने सर्वसमावेशक जीवनव्यवस्था आहे. अल्लाहने प्रत्येक मुस्लिमावर त्या जीवनव्यवस्थेला आपल्या वैयक्तीक तसेच सामुहिक जीवनात स्थापन करण्याचे आदेश दिलेले आहेत, प्रेषित मुहंमद (स.) यांनी आपल्या प्रेषितत्वाच्या कालावधीत ती व्यवस्था सर्वत्र रुजवली होती. ती कशा पद्धतीने स्थापन करायची याचेही मार्गदर्शन केले होते. त्यांच्या अनुयायांनी ती जबाबदारी पार पाडली. आपल्या जीवीत व वित्तहानीचा विचार न करता त्यांनी सर्वदूर त्या व्यवस्थेवर आधारीत राजसत्ता प्रस्थापित केली. प्रसंगी त्यांना युद्धालाही तोंड द्यावे लागले. ह्या सर्व प्रक्रियेला ‘जिहाद’ म्हणतात.  

   इथे इस्लामचे धर्म म्हणून पालन करणारा मुस्लिम आणि अन्य धर्मपालन करणारा वा धर्माव्यतिरिक्त जगणारा नागरिक; यातला फ़रक लक्षात यायला हरकत नसावी. तुम्ही आम्ही जेव्हा भारताचे नागरिक म्हणुन जगत असतो, तेव्हा भारतीय राज्यघटनेने जे नियम कायदे बनवले आहेत, त्यानुसार जगत असतो. त्यानुसारच जगणे भाग असते. त्या धर्मपालनात किंवा नागरी जीवनात राजकारण आणता येत नाही. पण ज्याला इस्लामचे कठोर पालन करायचे आहे, त्याला त्याचे धर्मशास्त्र तशी मुभा देते काय? जर सय्यद इफ़्तिकार म्हणतात, तसे काटेकोर इस्लामचे पालन करायचे असेल, तर मग त्या मुस्लिमाला भारताच्या राज्यघटनेचे पालन करता येणार नाही. राज्यघटना किंवा घटनाधिष्ठीत कायदे आहेत, ते काटेकोर इस्लाम पालनाच्या आडवे येत नाहीत, तोपर्यंतच त्याला राज्यघटना सोयीची असू शकते. पण जिथे स्थानिक कायदे हे इस्लामी नियम व कायद्यांना छेद देऊ लागतील, तिथे त्या निष्ठावान मुस्लिमाने काय करावे? राज्यघटना व देशातील कायदे पाळायला गेल्यास; त्याच्या धर्मपालनामध्ये अडथळा येऊ शकतो. मग त्या निष्ठावान मुस्लिमाने काय करावे? एक बाजू संभाळायची तर दुसरीकडे तोल जातो आणि तिकडचा तोल संभाळायचा तर इकडचा तोल जातो. असे म्हटले तर उदाहरणाशिवाय त्यातले रहस्य उलगडणारे नाही. म्हणून उदाहरण महत्वाचे ठरावे.

   राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना एक प्रकरण खुप गाजले होते. शहाबानू असे त्याचे नाव आहे. त्या प्रकरणात शहाबानु नाम तलाकपिडीत महिलेने खालच्या कोर्टापासून सुप्रिम कोर्टापर्यंत तीन दशकांचा लढा दिला आणि आपल्या घटस्फ़ोटित नवर्‍याकडून भारतिय कायद्यानुसार पोटगी मिळवली होती. त्यावर प्रचंड काहुर माजले. एका सामान्य मुस्लिम घटस्फ़ोटितेला न्यायालयाने पोटगी मिळवून दिली, तर त्याला धर्मातील अधिक्षेप ठरवून तमाम मुस्लिम संघटना व संस्था रस्त्यावर उतरल्या होत्या. मग तो न्यायालयाचा निर्णय रद्दबातल करण्यासाठी राजीव गांधी यांच्या पुढाकाराने नवा कायदा करण्यात आला. त्याची अंमलबजावणी पुर्वलक्ष्यी करण्यात आली आणि शहाबानूला कोर्टाने दिलेली पोटगी नाकारण्यात आली. इथे नेमके काय झाले? का झाले? काय सिद्ध झाले? इथला भारतीय नागरी कायदा मुस्लिमांसाठी लागू होत नाही, हेच तत्व मान्य झाले ना? त्यासाठी तमाम मुस्लिम संघटना रस्त्यावर का उतरल्या, त्याचे उत्तर आपल्याला सय्यद इफ़्तिकार देतात. इस्लाम हा नुसता धर्म नाही तर ती एक परिपुर्ण सामाजिक, राजकीय जीवनव्यवस्था आहे. आणि तिचे आपल्यापुरते व्यक्तीगत जीवनातच नव्हेतर, सामुहिक जीवनातही पालन करण्याचे आदेश मुस्लिमाला अल्लाहने दिलेले आहेत. मग त्याने कोणाच्या आदेशाचे पालन करायचे? कोर्टाच्या की अल्लाहच्या? त्यातून शहाबानू निवाड्याची समस्या निर्माण झाली होती. राज्यघटनेनुसार स्थापन झालेल्या कोर्टाचे आदेश पाळायचे, की अल्लाहचे आदेश पाळायचे?

   मग जेव्हा दोन्हीत संघर्ष निर्माण झाला; तेव्हा मुस्लिम संघटनांनी कोर्टाच्या न्यायाला आव्हान दिले आणि त्यापुढे शरणागत होऊन पंतप्रधान राजीव गांधी यांनी कायदाच बदलून टाकला. मुस्लिमांचे धर्मपालन घटना व प्रस्थापित कायदे, याच्यापेक्षा महत्वाचे असल्याचेच त्यातून सिद्ध झाले. सवाल एका शहाबानूच्या पोटगीचा किंवा त्यातल्या रकमेचा नव्हता. भारतातील मुस्लिमांसाठी अंतिम कायदा व अधिकार कोणाचा चालतो, याचा निवाडा व्हायचा होता. भारतीय घटनात्मक जीवनपद्धती, की इस्लामप्रणित ईश्वरी जीवनपद्धती असा तो संघर्ष होता. त्यात इथल्या घटनाधिष्ठीत सत्तेने इस्लामचे धर्मपालन घटनात्मकतेपेक्षा महत्वाचे असल्याचा कृतीतून निर्वाळा दिला. त्याचा अर्थ सय्यद इफ़्तिकार यांच्या विवरणातून सापडतो. देशाची घटना काहीही असो, कायदे काहीही असोत, इथल्या मुस्लिमांनी आपल्या धर्माचे काटेकोर पालन करताना भारतामध्ये आपली इस्लामिक व्यवस्था प्रस्थापित करून दाखवली. इथे ही इस्लाम धर्मपालनाची वस्तुस्थिती समजून घेतली, मग मुस्लिमांचे एकूण वर्तन आपल्याला गैरलागू वाटणार नाही. आपण अन्य धर्माप्रमाणेच इस्लामी धर्मपालनात ढिलाई चालू शकते; असे जे गृहित धरतो, म्हणून आपली गल्लत होते. तुम्ही अन्य जे कोणी मुस्लिमेतर आहात, ते धर्माच्या काटेकोरपणाबद्द्ल आग्रही नसाल, म्हणून मुस्लिमानेही आग्रही असू नये; अशी जी तुमची समजूत असते, त्या समजूतीचे तुम्ही बळी आहात. कायद्याने मुस्लिमांना धर्मपालनाचे स्वातंत्र्य दिले आहे तर त्या धर्मपालनात स्थानिक कायद्याची अडचण आणून चालणार नाही. धर्मपालनासमोर अन्य कायदे आपोआप दुय्यम होतात, हे लक्षात घेतले तर मुस्लिमांच्या वर्तनाचा बोध होऊ शकतो.  ( क्रमश:)
भाग  ( ४५ )  २९/९/१२

गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२

धर्मप्रेमाचा राजकीय हेतूसाठी होणारा वापर


   मंगळवारची गोष्ट आहे. रोज अनेक फ़ोन येतात तसेच त्याही दिवशी वाचकांचे फ़ोन आले. त्यात एक शाळकरी वयातल्या मुलाचा फ़ोन होता. आपण काय बोलतोय तेही त्याला कळत नसावे. पण तो बोलत होता आणि मागून कोणीतरी त्याला ‘पढवत’ होते. ‘कुराणके बारेमे उलटसुलटा लिखनेवाले आपही है क्या’ असे त्याने विचारले. तेव्हा मी त्याला म्हटले मागून जो कोणी बोलतोय त्याला फ़ोन दे. तर त्या मुलाने आपणच बोलतोय असे ठामपणे सांगितले. पण मागे कुजबुज ऐकू येत होती. मग त्याला विचारले तु किती कुराण वाचले आहेस? तर त्या मुलाकडे उत्तर नव्हते. असे अनेकजण असतात. लातुरहुन एकाचा फ़ोन आला. तो नरेंद्र मोदींचे कौतुक केल्याचा आरोप करून मला सेक्युलर पत्रकारिता करा म्हणून शिकवू लागला. मग सेक्युलर पत्रकारिता म्हणजे काय, असे त्याला विचारावे लागले. तर मोदींवर टिका म्हणजे सेक्युलर टिका, असा एकूण त्याचा सुर होता. पण असे लोक कुठल्या भ्रमात वावरतात त्याचा तो उत्तम नमूना होता. अमेरिकेने तीनदा मोदींना व्हिसा नाकारला आणि तरी मी मोदींवर अकारण टिका करत नाही; याचे त्याला दु:ख झालेले होते. काय गंमत आहे बघा. सेक्युलॅरिझमची व्याख्या अशी क्षुल्लक होऊन गेली आहे. नरेंद्र मोदींना शिव्याशाप दिले, संघावर अवास्तव टिका केली; म्हणजे माणुस सेक्युलर होत असतो. मला त्या वादात पडायचे नव्हते. म्हणून त्या लातुरकराला म्हटले, अमेरिकेने मोदींना व्हिसा नाकारला म्हणून तुम्ही त्या देशाला न्यायनिष्ठ समजता का? तर त्याने लगेच होकारार्थी उत्तर दिले. मग त्याला म्हटले, की सध्या अमेरिकेत जो एक वादग्रस्त चित्रपट निर्माण झाल्याने वादळ उठले आहे, तोही न्याय्यच असेल ना? तिथे त्याची पुरती गडबड उडाली. त्यावर नकारार्थी उत्तर आले. मग त्याची न्यायाची वा सेक्युलर असण्याची संकल्पना काय आहे? त्याचे नियम व निकष काय असतात?

   नरेंद्र मोदींना अमेरिकेने व्हिसा नाकारला, म्हणून त्याला अमेरिकेचा गौरव वाटत होता. तिथे त्याला अमेरिकन न्याय व नियम कायदे योग्य वाटत होते. पण त्याच अमेरिकेतले तेच कायदे व धोरण अविष्कार स्वातंत्र्य म्हणुन प्रेषिताच्या बदनामीचा चित्रपट काढू वा प्रकाशित करू देते; तेव्हा तीच अमेरिका त्या वाचकाना जुलमी सत्ता वाटते. हा वाचक मुस्लिम होता हे वेगळे सांगायला नको. पण असा एखाददुसराच असतो. त्यांच्या अनेकपटीने माझे अभिनंदन करणारे मुस्लिमांचेही फ़ोन मला रोज येत असतात. फ़ार कशाला हा जो अमेरिकन न्याय शिकवणारा फ़ोन लातूरहून आलेला होता, त्याच्या अवघा एक मिनीट आधी लातुरहूनच सय्यद यांचाही फ़ोन आलेला होता. त्यांनी तोंड भरून माझ्या लिखाणाचे कौतुक केले. म्हणजेच मुद्दा असा, की ज्याच्या मनात जशा भावना असतात, तसाच तो समोरच्या घटनेचा वा विषयाचा अर्थ लावत असतो. त्याच्या सोयीचे असेल तसे त्यातून शोधत असतो. पण त्याचवेळी जगात खुप अशी विवेकी समजूतदार माणसे (त्यात मुस्लिमही आलेच) असतात, की जी योग्य असेल ते समजून घ्यायला उत्सुक असतात. आणि अशी कित्येक मुस्लिम माणसे आहेत ज्यांनी माझ्याशी फ़ोनवर संपर्क साधला आहे. मजा कशी बघा. मी कुठल्याही लेखात कुराणाच्या आयत वा सुरहचा अजून उल्लेख केलेला नाही. किंवा कुराण वा हदिस अशा मुस्लिम धर्मग्रंथाच्या संदर्भाने उहापोह केलेला नाही. पण एक शाळकरी मुस्लिम मुलगा मला फ़ोन करून कुराणाबद्दल उलटेसुलटे काही लिहितोस काय, म्हणून जाब विचारतो. त्यातला त्याचा उर्मटपणा बाजूला ठेवा आणि त्यातली अडाणी बेफ़िकीरी बघा. त्या मुलाला असे काही सुचलेले नाही, तर कोणीतरी त्याला ते बोलायला लावले हे मलाही कळते. पण मुद्दा आहे तो त्या मुलाच्या मानसिकतेचा. त्या मुलाला असे वागवण्यातून कोणते संस्कार दिले जात असतात? धर्माच्या नावाने त्याच्या मनात कोणत्या भावना रुजवल्या जात असतात?  

   ‘इस्लाम खतरेमे’ किंवा धर्मसंकट म्हटले मग नेमके काय संकट आहे किंवा त्याचे स्वरूप काय आहे; अथवा खरेच संकट आहे काय, तेही बघायची गरज नाही. थेट चाल करून जायचे, अशी ती मानसिकता आहे. जिथे अशी मानसिकता रुजवली जाते; तिथून खरी समस्या सुरू होत असते. मी कुराणाबद्दल किंवा त्यातल्या कुठल्याही सुरह-आयतीबद्दल काहीही लिहिले नसताना, त्या मुलाने मला असा फ़ोन करून जाब विचारला, तर त्याला मी बालिश म्हणुन सोडून देईन. पण तो बालिशपणा मोठ्यांमध्ये आढळत नाही काय? जे लिहिलेच नाही त्याबद्दल जाब विचारणे म्हणजे अफ़वेच्याच आहारी जाणे नाही काय? आणि हीच जगभरच्या मुस्लिम समाजाची कायमची समस्या राहिलेली आहे. अन्य धर्मियात जशी आपापल्या धर्मावि्षयीची अपुरी माहिती असते; तसेच मुस्लिम समाजातील लोकसंख्येचेही आहे. किती टक्के मुस्लिम लोकसंख्येने कुराण वा हदिस या धर्मग्रंथांचे पठण व अभ्यास खरोखर केला आहे, त्याची शंकाच आहे. पण मग त्यामुळेच अमुकतमुक कुराणात वा हदिसमध्ये आहे, असे बेधडक सांगून त्यांना भडकावणेही सोपे जात असते. एकोणिसाव्या शतकातील एका क्रांतिकारकाचे बोल मोठे सूचक आहेत. पण आधी तो क्रांतिकारक कोण ते समजून घ्यायला हवे.

   इराण म्हणजे त्याकाळातील पर्शियामधला एक धाडसी शिया मुस्लिम जमालुद्दीन अस्सदाबादी याने मुस्लिम जगतामध्ये आपले प्रभूत्व सिद्ध करण्यासाठी आपला शिया पंथ लपवून अफ़गाण रुप धारण केले. तो इजिप्तला गेला आणि सुन्नी म्हणून वावरू लागला. धर्मशास्त्राचा अभ्यास करून त्याने धर्मशास्त्र्याचे रुप धारण केले. आर्मेनियाचा मिर्झा मा्ल्कम खान त्याला येऊन मिळाला. तो होता आर्मेनियन. त्यांनी नव्या स्वरूपात इस्लामी साम्राज्य उभे करण्याचा विडा उचलला होता. आणि काही प्रमाणात त्यांना यशही मिळू शकले होते. त्यातला मिर्झा माल्कम खान खरेच धर्मांतर करून मुस्लिम झाला होता की नाही; याबद्दल शंका आहेत. पण राजकारणासाठी मुस्लिम समाजाला लढायला सिद्ध करण्याची सोपी युक्ती त्याने सांगितली आहे. ते त्याचे प्रसिद्ध वाक्यच आहे. मिर्झा माल्कम खान म्हणतो. "मुस्लिमांना नुसते सांगा अमूक हे कुराणामध्ये आहे आणि ते तुमच्यासाठी मरायला सज्ज असतात." याचा साधासरळ अर्थ इतकाच, की बहूतेक मुस्लिमांना खरेच धर्मग्रंथाविषयी फ़ारसे ज्ञान नसते आणि त्याचा गैरफ़ायदा घेणारे अनेकजण त्यांच्यात सराईतपणे वावरत असतात. भोळ्याभाबड्या सामान्य मुस्लिमाच्या धर्मवेडाचा असे लोक आपले राजकीय हेतू साध्य करण्यासाठी बेधडक उपयोग करून घेत असतात. मग एका बाजूला पाकिस्तानचा एक मंत्री अमेरिकेतील त्या चित्रपट निर्मात्याच्या खुनाचा फ़तवा काढून खुन्याला एक कोटी डॉलर्स बक्षिस देण्याची घोषणा करतो आणि दुसरीकडे त्याच पाक सरकारचे अन्य मंत्री व राजकारणी त्याला मुर्खही ठरवत असतात. आपल्याकडेही सहा वर्षापुर्वी उत्तरप्रदेशचे मुलायमसिंग मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्या अन्सारी नावाच्या मुस्लिम नेत्याने प्रेषिताची व्यंगचित्रे काढणार्‍याला ठार मारण्यासाठी जाहिर सुपारी दिलेली होतीच की.

   असे काही घडते तेव्हा मध्यममार्गी मुस्लिम नेते लगेच तो एखादा मुर्ख असतो असे सांगून त्यावर पांघरूण घालतात. पण अशी प्रवृत्ती मुस्लिम समाजात कुठून आली व का बळावते आहे, त्याचे विश्लेषण करताना दिसत नाहीत. सहाजिकच मग सर्वसामान्य मुस्लिम त्याच गोंधळात भरकटत जातो. दुसरीकडे इतर जे मुस्लिमेतर आहेत, त्यांच्याही लेखी मग सगळे मुस्लिम सारखेच भासू लागतात. तो गोंधळ दूर करण्याची गरज नाही का? इतकी वर्षे लोटली, शतके लोटली तरी मुस्लिम समाजाचे धर्माच्या नावाने वापरले जाणे थांबलेले दिसत नाही. जगाच्या पाठीवर कुठल्याही देशात गेलात तरी मुस्लिम लोकसंख्येला नेहमी धर्माच्या नावाने वापरले जाते असेच दिसेल. मग पाकिस्तान असो की इराक-इराण असो. त्यात ज्यांचे बळी पडतात, त्याचीही कोणाला फ़िकीर नसते. गेल्या आठवड्यात पाकिस्तानात अमेरिकन चित्रपटाच्या विरोधात जी उग्र निदर्शने झाली; त्यात अनेकांचा हकनाक बळी गेला आहे. त्या निदर्शनामुळे अमेरिकेचे कोणतेच नुकसान झाले नाही, की त्या चित्रपटावर बंदी आलेली नाही. मग पाकिस्तानात ज्यांचे बळी गेले त्यांचे काय? धर्मासाठी शहिद झाले आणि ते जन्नतमध्ये गेले; अशी मनाची समजूत घातली जाते. मुद्दा तो नाही, तर अशा धर्मवेडाचा व त्याचा होणार्‍या राजकीय वापराचा आहे. खरेच आपण धर्मपालनासाठी त्याग करतो का? आपले कृत्य धर्माचे उत्थान करण्यासाठी कारणी लागते काय? आपल्याला होणारी हानी व्यक्तिगत लाभाची नसेल, पण धर्मकार्यासाठी तरी पोषक आहे काय? असा विचार यापैकी कोणाच्या तरी मनाला शिवतो का? नसेल तर असेच वारंवार का घडत रहाते? दुसर्‍या कुणाच्या तरी राजकीय मतलबासाठी आपले धर्मप्रेम वस्तुप्रमाणे वापरले जाते; याची जाणिव कशी व कधी निर्माण होणार? आणि ते होणार नसेल तर मुस्लिम समाजाचे उत्थान कसे शक्य आहे?  ( क्रमश:)
भाग  ( ४४ )  २८/९/१२

बुधवार, २६ सप्टेंबर, २०१२

इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी


   उत्तर प्रदेशचेच राजकारण घ्या. तिथे मंडल शिफ़ारशीच्या बळावर मुलायम यादव यांनी समाजवादी पक्षाची उभारणी केली. त्यांचा पक्ष डॉ. लोहियांच्या विचारसरणीची पोपटपंची करीत असला तरी त्याचे सर्व राजकारण व डावपेच यादव-मुस्लिम यांच्या मतांच्या संख्येवर मांडले जात असतात. लालूंनी तिकडे बिहारमध्ये तेच गणीत मांडले होते. मायावतींनी दलित पिछडा अधिक मुस्लिम असे समिकरण मांडून मुलायमना शह दिला तर बिहारमध्ये इतर मागास जातींना सोबत घेऊन नितीशकुमार यांनी मुस्लिमांच्याच आधाराने आपले बस्तान बसवले आहे. अगदी भाजपासोबत असूनही. बंगालमध्ये ममतांनी मुस्लिमांना हाताशी शरून डाव्यांचे डाव उधळून लावले. या सर्व समिकरणाला शह देण्याचे डावपेच १९८९ नंतर भाजपाचे जहाल नेता म्हणुन ओळखले जाणारे लालकृष्ण अडवाणी यांनी सुरू केले होते. त्यातूनच तेव्हापासून भाजपाची ताकद वाढत गेली. पण १९९६ सालात लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष झालेल्या भाजपाला सत्तेचे वेड लागले आणि त्यांनी हिंदूत्वाची जहाल भूमिका सोडून दिली, तसा त्यांचा आक्रमक हिंदू चेहरा गमावला होता. तिथेच त्यांची पिछेहाट सुरू झाली. हिंदू मतांचा गठ्ठा तयार होण्याची प्रक्रिया तिथेच खुंटली होती. त्याचे परिणाम मग निवडणूक निकालातही दिसू लागले. आधी दोन निवडणूका भाजपाच्या जा्गा वाढायचे थांबले आणि मग त्याची घसरण सुरू झाली. गेल्या आठदहा वर्षात थांबलेल्या त्याच प्रक्रियेला आता मोदी यांच्या नावाने वेग मिळू लागला असे दिसते आहे. मायावती, मुलायम, पासवान, नितीशकुमार अशा सर्वांचे राजकारण मुस्लिम मतांचा गठ्ठा अधिक त्यांच्या जातीसमुहाचे गठ्ठे धरून मांडलेले गणित आहे. पण त्याला तत्पुर्वीच्या अडवाणी यांच्या हिंदूत्वाने शह दिला होता. पण मध्येच अडवाणी हिंदूत्व सोडुन सत्तेच्या गणिताकडे वळले, तिथे ती प्रक्रिया थांबली होती. त्याचीही कारणे महत्वाची आहेत.

   सत्ता व त्यासाठी झटपट उसनी मते मिळवण्याच्या घाईत अडवाणी व अन्य भाजपा नेतृत्वाने भल्याबुर्‍या लोकांसाठी पक्षाची दारे खुली केली. काल कुठल्याही पक्षात असलेला नेता आज भाजपामध्ये दिसू लागला. आपला मतदार गोळा करण्याचे कष्ट सोडून भाजपा निवडून येणार्‍या नेत्यांच्या मागे धावू लागला व त्यासाठी त्याने हिंदूत्वाची कास सोडली आणि भाजपा विस्ताराची प्रक्रिया थंडावली. अशा खोगीरभरतीने भ्रष्टाचारही भाजपामध्ये बोकाळला. त्यातूनच भाजपाची पत संपली. त्याला कॉग्रेस होता आले नाही, की हिंदूत्ववादीही रहाता आले नाही. ते चक्र मोदींनी उलटे करून दाखवले आहे. गुजरातमध्ये त्यांनी दंगलीचा कलंक अंगावर घेतला, तरी बदनामीच्या दबावाखाली न येता उत्तम कारभार करून दाखवला. त्यांच्यावर अन्य कुठलेही आरोप होऊ शकले तरी भ्रष्टाचाराचा आरोप होऊ शकत नाही. दुसरीकडे त्यांनी उत्तम कारभारही करून दाखवला आहे. म्हणजेच १९९८ सालात देशाची सत्ता मिळवताना वेगळा पक्ष (Party with Differance ) असे भाजपाने सांगितले होते, ते गुजरातमध्ये मोदींनी करून दाखवले. देशातला सर्वात यशस्वी मुख्यमंत्री ही त्यांची प्रतिमा आहे. त्यात माध्यमांनी त्यांचा आक्रमक हिंदू चेहरा देशासमोर सतत मांडल्याने त्यांचे काम सोपे होऊन गेले आहे. आज जेव्हा अवघा देश महागाई, दरवाढ व भ्रष्टाचाराच्या गर्तेत लोळतो आहे; तेव्हा त्यातून देशाची प्रशासन व्यवस्था बाहेर काढण्याची क्षमता आलेला एकमेव नेता अशी स्वत:ची प्रतिमा मोदी यांनी बनवली आहे. तशा नेत्याचा देशाला शोध आहे. त्यात पुन्हा हिंदूत्वाचा आक्रमक चेहरा असेल तर तो अडवाणींनी वार्‍यावर सोडून दिलेला देशभरचा हिंदू मतदार मोदींच्या मागे अगत्याने उभा रहायला उत्सुक आहे. हा नुसता तर्क आहे काय? त्याचा पुरावा काय?

   १९९१ पासून १९९९ पर्यंत उत्तरप्रदेश हा भाजपाला सर्वाधिक खासदार देणारा प्रांत होता. त्यात तीनदा पन्नासहून अधिक भाजपाचे लोकसभा सदस्य एकट्या उत्तरप्रदेशातुन निवडून आले होते. जिथे सत्तेसाठी हिंदूत्व गुंडाळले, तिथून त्याची घसरण सुरू झाली. तोच मतदार मग अन्य पक्षांकडे अन्य कारणासाठी वळला. आता मोदींच्या आक्रमकतेमु्ळे तो पुन्हा हिंदूत्वाकडे येऊ शकतो आणि चाचण्य़ांनी त्याचीच चाहुल दिली आहे. मोदी यांची चाचण्यांमध्ये दिसणारी लोकप्रियता त्याचीच साक्ष असू शकते. इथे मोदी यांची तुलना इंदिरा गांधी यांच्याशी करता येईल. १९६९ आणि १९७९ अशा दोन वेळी इंदिरा गांधी यांनी स्वत:चा पक्ष व त्यातले प्रमुख नेते विरोधात गेले असतानाही प्रचंड यश मिळवले होते. दोन्ही प्रसंगी माध्यमातले विद्वानही त्यांच्या विरोधात गेले होते. पण देशात एकूणच जे राजकीय, प्रशासकीय व आर्थिक अराजक माजले होते, त्यावर उपाय म्हणून खंबीर नेता समजून इंदिरा गांधी यांची भुरळ लोकांना पडली होती. कठोर निर्णय घेण्याची कुवत व धाडसी कारभार करण्याची क्षमता या गुणांनी इंदिरा गांधींना मोठे यश मिळवून दिले होते. त्यांच्या तेवढ्या मोठ्या यशाची अपेक्षा कोणीच केली नव्हती. मोदींनी आज तसाच नेता म्हणून आपली प्रतिमा निर्माण करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळेच त्यांच्या पक्षाची आजची लोकप्रियता किती व त्या पक्षाला लोकांचा मिळणारा कौल किती, याला फ़ारसा अर्थ नाही. भाजपा अधिक मोदी अशी चाचणी घेतली तर त्याचे थोडेफ़ार योग्य उत्तर मिळू शकते. पण त्याची गरज नाही. आजही भाजपाचा प्रमुख नेता असलेल्या अडवाणी यांची लोकप्रियता मोदींच्या तुलनेत खुप मागे पडली आहे.

   मग असा प्रश्न पडतो, की मोदी हे पंतप्रधान होऊ शकणार असतील तर मुस्लिमांची भूमिका काय असणार आहे? अगदी आक्रमक जहाल मुस्लिम नेत्यांपासून सामान्य मुस्लिमापर्यंत प्रत्येकाला या शक्यतेचा विचार करण्याची गरज आहे. त्यांना सेक्युलर म्हणून मिरवणार्‍या पक्षांच्या राजकारणातले प्यादे म्हणून बळी जायचे आहे, की भारताचे समहक्क नागरिक म्हणुन विकासाचे भागिदार म्हणून जगायचे आहे? तशा शक्यतेचा विचार करायचा, तर मग मोदी का जिंकू शकतात आणि त्यामागे हिंदू मानसिकता का उभी रहाते आहे; याकडे गंभीरपणे बघण्याची गरज आहे. त्याचे दोन भाग होतात. हिंदू मा्नसिकतेला मोदींच्या आहारी जाण्यापासून रोखणे आणि दुसरी मोदी यशस्वी होणार असतील, तर त्यांच्या कारकिर्दीत मुस्लिमांना काय स्थान असेल, त्यासाठी तयारी करणे. तुम्ही ज्याला आधीच आपला शत्रू मानले आहे असा माणुस सत्ताधीश होणार असेल तर एक भूमिका घ्यावी लागते. आणि शत्रू म्हणुन त्याला सत्तेवरच येऊ द्यायचे नाही, ही दुसरी भूमिका असू शकते. या दुसर्‍या भूमिकेमध्ये हिंदू मानसिकतेला मोदी नावाच्या भुरळीमधून बाहेर काढणे अगत्याचे आहे. आणि त्यासाठी मुस्लिमांनी अधिकाधिक हिंदू समाज घटकांचा विश्वास संपादन करणे महत्वाचे असू शकते. त्यात मग मुंबईतल्या दंगलीसारख्या घटनांना स्थान असू शकत नाही. म्हणजे शाही इमाम म्हणतात, तसे हिंदूंना सेक्युलर धर्मनिरपेक्ष व संयमी ठेवणे आवश्यक आहे. हिंदू समाज घटकांचा संयम व सोशिकता संपणार नाही एवढ्य़ावरच मुस्लिमांच्या धार्मिक आक्रमकतेचा आग्रह थांबला पाहिजे. त्याची चिन्हे कुठे दिसत आहेत का?

   ही चिन्हे भारतात दिसत नाहीत तशीच ती जगभरच्या मुस्लिम समाजामध्ये दिसत नाहीत. म्हणुनच मला ही लेखमाला लिहिण्याची पाळी आलेली आहे. ती सर्व मुस्लिमांना आवडणारी असेलच असे नाही. पण नावडती असली म्हणुन त्यातले तथ्य संपत नाही. कुराणाच्या एका आयतीमध्ये साक्षात ईश्वरच म्हणतो, की अनेकदा तुम्हाला न आवडणार्‍या गोष्टीही तुमच्या भल्यासाठी आवश्यक म्हणुन ठरवून दिलेल्या असतात. मुस्लिमांनी तो बोध वाढत्या मोदी लोकप्रियतेपासून घेतला, तर देशाच्या भावी राजकारणाला मोठीच कलाटणी मिळू शकेल. मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याचे जे राजकारण चालू आहे त्याला शह म्हणून हिंदूंच्या मतांचा अवघा २०-२५ टक्के मतांचा गठ्ठाही मोठीच उलथापालथ घडवू शकतो. लक्षात ठेवा १९७१ असो की १९८० असो; इंदिरा गांधींनी अवघ्या ३५-३७ टक्के मतांवर लोकसभेच्या दोन तृतियांश जागा जिंकल्या होत्या. तेवढ्या जागा घटनादुरुस्ती करायला पुरेशा असतात. इंदिराजींनी त्याच बळावर या देशातील घटना व लोकशाहीचाच गळा घोटला होता. मग मोदींना मि्ळणारी लोकप्रियता आक्रमक मुस्लिमांसाठी किती घातक असू शकते त्याचा अंदाज केला तरी पुरे ठरेल. इतके बहूमत पाठीशी असेल तर मोदींसारखा जहाल नेता गुजरातप्रमाणेच देशाचा कारभार चालवू शकेल ना? मग  मतचाचण्य़ांमध्ये मोदीची लोकप्रियता ४२ टक्के दिसते त्यातला धोका काय इशारा देतो आहे, ते वेगळे समजावून देण्याची गरज आहे काय? एकच उदाहरण पुरेसे ठरावे. मुंबईच्या दंगलीत दुखावले गेलेले पोलिस दल मोदींचे स्वागत करील, की नाही; ते प्रत्येक मुस्लिमाने मनाशी विचार करून ठरवावे. मग चाचण्यातले ४२ टक्के कुठून त्यांना मिळू शकतात त्याचा घरबसल्या अंदाज येऊ शकतो.   ( क्रमश:)
भाग  ( ४३ )  २७/९/१२

मंगळवार, २५ सप्टेंबर, २०१२

हिंदूमतांच्या गठ्ठ्याने सेक्युलॅरिझमही बदलू शकतो


   दिल्लीचे शाही इमाम सय्यद अहमद बुखारी यांच्या एका वाक्याभोवती मी किती घुटमळतो आहे, असे काही वाचकांना वाटू शकेल. पण त्यातला गर्भितार्थ समजून घेण्यासाठी त्याच एका वाक्याची अनेक कोनातून व अंगाने मिमांसा मला आवश्यक वाटते. त्याचे कारणही तसेच आहे. मानवी स्वभाव फ़क्त फ़ायद्याकडे बघण्याचा असतो. पण त्याच किरकोळ लाभातून किती भयंकर तोटे संभवतात, त्याकडे बघायची मानवी स्वभावाची तयारी नसते. म्हणूनच मानवी जीवनात अनेक समस्या भेडसावत असतात. वेळीच त्यांचा बंदोबस्त शक्य असतो, पण काणाडोळा करण्याच्या प्रवृत्तीने इवली समस्या भीषण भयंकर होईपर्यंत तिच्याकडे डोळसपण बघितले जात नाही. आपल्या लोकशाहीमध्ये आज जे आकड्याला अवास्तव महत्व आले आहे, त्याच्या फ़ायद्यामध्ये सगळे गर्क आहेत. पण त्याच आकड्यातून संभवणार्‍या धोक्याचा विचारही कोणाच्या मेंदूला शिवलेला नाही. म्हणूनच अनेक सेक्युलर विचारवंत किंवा मुस्लिम जहाल नेते, छातीठोकपणे मुस्लिमांच्या पाठींब्याशिवाय देशात सत्ता बनू शकत नाही; असे आग्रहपुर्वक सांगत असतात. त्याचा अर्थ नेमका काय आहे? आपल्या देशात सतरा अठरा टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे. त्या लोकसंख्येला सतत हिंदूत्वाच्या भयगंडाखाली ठेवले, मग त्यांची निदान नऊ दहा टक्के मते एकगठ्ठा होऊन मिळू शकतात. मग ती कधी कॉग्रेस, मायावती, मुलायम किंवा डावे, ममता असे राजकारणी मिळवू शकतात. त्यावरच त्यांची मदार असते. पण जो बहुसंख्य हिंदू समाज मानला जातो, तो अनेक समाज घटक, जातीपातीमध्ये विखुरला आहे. त्याच कारणास्तव तो एकगठ्ठा मतदान करण्याची शक्यता नाही. कारण त्या वेगवेगळ्या जाती उपजातीचे पक्ष व संघटना उदयास आलेल्या आहेत. त्यांचे छोटे छोटे मतांचे गठ्ठे तयार झाले असून त्यात मुस्लिम गठ्ठ्याची भर पडली, मग बहुमताचे गणित जमवता येते. मग त्या गणिताला शह द्यायचा, तरी दुसर्‍या प्रकारे पुन्हा मुस्लिम मतांचा गठ्ठा गृहित धरूनच समिकरण मांडावे लागते. कारण कुठल्याही स्थितीत जातीपातींमध्ये विखुरलेला हिंदू मतदार एकगठ्ठा होणार नाही, याची हमीच त्या सेक्युलर गणितामागे आहे. पण गुजरातने त्या गृहिताला जबरदस्त धक्का दिला आहे. दहा वर्षे उलटून गेली तरी नरेंद्र मोदी यांनी दंगलीतून तयार झालेली मानसिकता गुजरातची अस्मिता म्हणुन टिकवली आहे. पण दुसरीकडे त्या गुजरातच्या अस्मितेला हिंदू आक्रमकता, असे लेबल लावून सेक्युलर माध्यमांनी त्या राज्यातील हिंदू गठ्ठा जपायला मोदींना मोठाच हातभार लावला आहे. सहाजिकच गुजरातमध्ये मुस्लिमांची लक्षणिय लोकसंख्या असूनही तिचा प्रभाव गठ्ठा मते म्हणून दिसत नाही. आणि ते वास्तव मोदींना सतत शिव्यांची लाखोली वहाणार्‍यांनी सामान्य मुस्लिमापासून लपवलेले आहे.

   मागल्याच विधानसभा निवदणुकीची गोष्ट घ्या. मोदींच्या मुस्लिम विरोधावर तावातावाने बोलण्यात धन्यता मानणार्‍या कॉग्रेसचे राजकीय समिकरण किती बदलून गेले आहे? २००२ च्या विधानसभा निवडणुकीत गुजरातमध्ये कॉग्रेसने १७ मुस्लिम उमेदवार उभे केले होते आणि शक्य होईल तेवढी मोदींच्या मुस्लिम विरोधावर आगपाखड केली होती. पण पाच वर्षांनी आलेल्या विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसचाही हिंदूत्ववादी चेहरा जगासमोर आलेला होता. त्या २००७ चा विधानसभा निवडणूकीत कॉग्रेसच्या मुस्लिम उमेदवारांची संख्या १७ वरून चारपर्यंत खाली का आली? प्रचारात व मोदींवर आरोप करताना आपला मुस्लिमप्रेमाचा चेहरा रंगवून मतदारासमोर मांडणार्‍या कॉग्रेसने मुस्लिमांना उमेदवारी देण्यात कंजुषी का केली? तेवढेच नाही दिल्लीहून कोणीही मुस्लिम कॉग्रेस नेता गुजरातमध्ये निवडणुक प्रचारासाठी फ़िरकला नाही. हा काय प्रकार होता? कॉग्रेस आपल्यावरचा मुस्लिम धार्जिणेपणाचा शिक्का पुसायला धडपडत होती का? एका जाहीर कार्यक्रमात मोदी यांनी कॉग्रेस नेते दिग्विजय सिंग यांना त्याच उमेदवारीबद्दल सवाल करून निरूत्तर केले होते. गुजरात विधानसभेची आमदारसंख्या १८१ इतकी आहे, त्यात दहा टक्के जरी मुस्लिम लोकसंख्या धरली तर कॉग्रेसने १८ मुस्लिम उमेदवार का उभे केले नाहीत? की मुस्लिम निवडून येणार नाहीत म्हणुन उभे केले नाहीत? पण त्याचवेळी पक्षाचे उमेदवार मुस्लिम मतांवर निवडून यावेत म्हणुन मोदींच्या विरोधत तो्फ़ा डागणे मात्र जोरात चालू होते. म्हणजेच हिंदू एकत्र आल्याचा तो परिणाम होता. मतांची तेव्हाची आकडेवारी पाहिली तरी त्याचीच साक्ष मिळते. मोदींच्या पक्षाला त्या विधानसभा निवडणुकीत ४९ टक्के मते मिळाली. याचा अर्थच जातीपाती पलिकडे जाऊन हिंदू मतांचा गठ्ठा बनवण्यात मोदी यांनी मोठेच यश मिळवले आहे. त्याच बळावर त्यांनी लागोपाठ तिथल्या निवडणुकीत यश मिळवले आहे. आणि त्या हिंदू मतांच्या प्रभावी गठ्ठ्य़ानेच मुस्लिम एकगठ्ठा मतदान करतात या राजकीय गृहिताला सुरूंग लावला आहे. तो मुस्लिम गठ्ठा मतांचा सिद्धांत अगदी कॉग्रेसनेही गुजरातमध्ये सोडुन दिला आहे. ज्यांना देशात हिंदूत्वाचा प्रभाव वाढू नये असे वाटते, त्यांनी या समिकरणाचा विचार न करून चालेल काय?

   मोजक्या जागी तुमच्याकडे मतांचा हुकमी गठ्ठा असेल, तर तुम्ही मोठे यश मिळवू शकता असे आजच्या भारतीय लोकशाहीचे आकडेशास्त्र आहे. उत्तरप्रदेशात अलिकडेच ज्या विधानसभा निवडणुका पार पडल्या, त्यात अवघ्या २७ टक्के मतांच्या बदल्यात मुलायमच्या समाजवादी पक्षाने निर्विवाद बहुमत मिळवले आहे. त्यांच्यापेक्षा अवघी अडिच तीन टक्के मते कमी झाली, तर मायावतींच्या बसपाने शंभराहून जास्त जागा गमावल्या. तिथे भाजपाने पंधरासोळा टक्के मतेच मिळवली तर जागा अवघ्या दहा टक्के मिळाल्या. पण त्याच्या दुप्पट टक्के मते आणि पाचपट जागा मुलायमनी जिंकल्या. हे टक्के व गठ्ठे समजून घेतले तरच कोडे उलगडू शकते. मोदींच्या विजयाची भिती मुलायमना का वाटते, त्याचे उत्तर त्यातच सामावले आहे. मोदींची आक्रमक हिंदू नेता ही प्रतिमा भावली असेल, तर उत्तरप्रदेशाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या पंधरासोळा टक्के मतांमध्ये चक्क दहाबारा टक्के वाढ, केवळ मोदी या नावाने होऊ शकते. हे मुलायम ओळखतात. म्हणूनच त्यांना लगेचच लोकसभा निवडणूक नको आहे. त्यांना भाजपाचे भय नाही, तर मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार झाले तरची भि्ती आहे. पण मला त्याच्याशी कर्तव्य नाही. माझा मुद्दा आहे, तो मोदी या नावाभोवती गोळा होऊ लागलेल्या हिंदू मतांच्या गठ्ठ्याशी संबंधित आहे. गुजरातच्या हिंदू मतांच्या गठ्ठ्य़ाने मुस्लिमांच्या गठ्ठा मतांची जादू निकालात काढली आहे. त्यातून तिथल्या मुस्लिम समाजातील आक्रमकता किंवा त्यांचा राजकीय दबाव निष्प्रभ होऊन गेला आहे. देशाच्या राजकारण व सत्तेची सुत्रे ज्या सोनिया गांधींच्या हाती आहेत, त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल हे गुजरातचे मुस्लिम नेता म्हणुन मिरवतात. पण त्यांना त्या राज्यात काय स्थान आहे? तिथे कुठला मुस्लिम नेता आज स्वयंभूपणे उभा आहे? गुजरातचा मुस्लिम समाज दिशाहीनच नव्हेतर नेतृत्वहीन होऊन गेलेला नाही काय?

   मोदींनी गुजरातचा केलेला विकास, वेगाने केलेली प्रगती, औद्योगिक भरारी, उत्पन्नातील वाढ हे सगळे गुजरातबाहेर दुय्यम मुद्दे आहेत. व्यापारी किंवा उद्योग जगतामध्ये त्यांची तशी प्रतिमा असेल आणि त्याचा एक प्रभाव देशातील मध्यमवर्गावर असू शकतो. पण सामान्य भारतीय किंवा एकू्णच जातिपातीमध्ये विखुरलेला जो हिंदू समाज आहे, त्याच्यासाठी मुस्लिमांपेक्षा जहाल व आक्रमक हिंदू नेता, अशीच एक मोदींची प्रतिमा उभी राहिली आहे. त्याच प्रतिमेची भुरळ गुजरात बाहेरच्या मोठ्या हिंदू लोकसंख्येला पडत चालली आहे. आणि त्याला दहा वर्षापुर्वीच्या दंगलीपेक्षा मधल्या दहा वर्षात मोदींनी मुस्लिम एकगठ्ठा मतांचे समिकरण संपवले, त्याचे अधिक आकर्षण आहे. या हिंदू गठ्ठा मतासमोर गुजरातचा भाजपा पक्षही नामोहरम होऊन गेला आहे. तिथले जुनेजाणते भाजपा नेतेही नामोहरम होऊन गेले आहेत. १९७०-८० च्या दशकात जशी कॉग्रेस म्हणजे इंदिरा गांधी, अशी मानसिकता तयार झाली होती, तशीच हळुहळू मोदींची प्रतिमा तयार होते आहे. सत्तेसाठी हिंदूत्वाची कास सोडलेल्या भाजपाच्या नेतृत्वाला पर्याय म्हणुन देशभरातील धर्मनिष्ठ हिंदु व कडवा भाजपा कार्यकर्ता मोदींकडे आशेने बघतो आहे, त्याचाच हा परिणाम आहे. पण त्याचे व्यापक परिणाम हिंदूंपेक्षा मुस्लिम राजकारणाला भोगावे लागणार आहेत. कारण मध्यंतरीच्या दोनतीन दशकात सेक्युलर म्हणजे मुस्लिम गठ्ठा मतांना शरण जाणे, असे जे चित्र तयार झाले, त्यावरची ही प्रतिक्रिया आहे. म्हणूनच मोदींच्या लोकप्रियतेची चढती कमान हा मुस्लिमांनी गंभीरपणे विचार करण्याचा विषय आहे, असे मला वाटते. सेक्युलर पक्ष वगैरे शुद्ध भंपकपणा आहे. हे गुजरातमध्ये मुस्लिमांना कमी उमेदवारी देऊन कॉग्रेसनेच दाखवून दिले आहे. हिंदू मतांचा गठ्ठा निर्माण झाला मग सेक्युलर म्हणून मिरवणारे तमाम पक्ष मोदींपेक्षा अधिक हिंदूत्ववादी होतील, हे विसरून चालणार नाही. कारण निवडणुकीच्या रिंगणातले पक्ष मतांचे लाचार असतात. मतांच्या गठ्ठ्य़ांचा धर्म कोणता याच्याशी त्यांना कर्तव्य नसते.      ( क्रमश:)
भाग   ( ४२ )      २६/९/१२

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१२

मुस्लिमांचा कर्दनकाळ ही प्रतिमाच उलटते आहे


   भारतामध्ये हिंदू म्हणून जो समाज आहे, तो संघटित धर्म म्हणुन काम करत नाही, की वागत नाही. पण एखाद्या क्षणी संयम सुटला, मग त्याची झुंड तयार होते. तेव्हा त्यांच्याकडे दंगलखोर म्हणुन बघितले जाते. पण अन्य वेळी तो कायम शांत व आपल्या व्यक्तीगत जीवनात रममाण झालेला असतो. त्याला धर्माच्या नावाने रस्त्यावर आणणे सहजशक्य नसते. याची कल्पना असल्यानेच इमाम बुखारी देशात टिकून राहिलेल्या धर्मनिरपेक्षतेचे श्रेय इथल्या हिंदू लोकसंख्येला देतात. मग त्यापैकीच वाढती लोकसंख्या मोदी या नावाला भुलू लागली असेल, तर तो गंभीर विषय नाही काय? मागल्या एका वर्षात अनेक वाहिन्या व वृत्तपत्रांनी ज्या देशव्यापी मतचाचण्य़ा घेतल्या त्यातून समोर आलेले आकडे काही सांगत आहेत. हे आकडे जसेच्या तसे खरे नसतील. पण ते दिशा दाखवणारे आहेत, हे विसरता कामा नये. त्यातले अनेक आकडे एकमेकांना छेदणारे आहेत. परस्पर विरोधी वाटणारे आहेत. पण त्या सर्वच मतचाचण्यांमध्ये एक समान घटक सातत्याने पुढे येतो आहे, त्याचे नाव आहे नरेंद्र मोदी. कुठल्याही वाहिनी वा वृत्तपत्राने घेतलेल्या मतचाचणीमध्ये सतत मोदींच्या लोकप्रियतेची कमान चढती दिसत आहे. देशातल्या मुस्लिमांना सतत मोदी या नावाचे भय घातले जात असताना, त्याचीच देशातील वाढती लोकप्रियता गंभीर विषय नाही काय? मग त्याचा विचार कोणी करायचा? त्यामागची कारणमिमांसा मात्र कुठलेच वृत्तपत्र वा वाहिनी करत नाही. त्याचे कारण त्यांना एकतर त्याचे गांभिर्य कळत नसावे किंवा सत्य सांगण्याचीच भिती वाटत असावी.

   आपल्या देशातले सेक्युलर राजकारण मुस्लिम मतांच्या गठ्ठ्याभोवती भरकटत असते. तसेच आता हिंदूंच्या गठ्ठा मतांचे समिकरण बनू लागले आहे काय? एबीपी न्यूज या वाहिनीने केलेल्या मतचाचणीमध्ये ४२ टक्के लोकांनी मोदी यांना पंतप्रधान म्हणुन कौल दिला आहे तर अवघ्या २६ टक्के लोकांनी राहुल गांधी यांना कौल दिला आहे. ज्या राहुलचा भावी पंतप्रधान म्हणून मागली चार वर्षे अखंड प्रचार चालू आहे, त्याला मोदींनी मागे टाकून मारलेली मुसंडी मोठी नाही काय? अवघ्या एका वर्षापुर्वी आणखी एका मतचाचाणीमध्ये मोदी व राहुल जवळपास सारख्या मतांवर दिसत होते. त्यातही राहुल आघाडीवर होते. पण अवघ्या वर्षभरात राहुलच्या मतांमध्ये पाचसहा टक्के घट झाली आहे, तर मोदी यांची लोकप्रियता दुपटीने वाढल्याचे आढळून आले आहे. अशा मतचाचण्या शेवटी लोकमताचे नेमके गणित सांगत नाहीत, असाही दावा असतो. पण ज्यांना लोकमताची नस कळली आहे असा दावा आहे, त्या नेत्यांच्या प्रतिक्रियाही मोदींच्या बाबतीत बोलक्या आहेत. कालपरवाच दिल्लीच्या सरकारला असलेला पाठींबा ममता बानर्जी यांनी काढून घेतला, तेव्हा हे सरकार टिकणार की नाही असा प्रश्न विचारला जाता होता. तेव्हा मुलायम सिंग यांनी बिनशर्त मनमोहन सरकारला पाठींबा दिला. रस्त्यावर उतरून त्यांच्या समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महागाई, दरवाढीच्या विरोधात निदर्शने केली. पण सरकारला पाठींबा देताना त्यांचे बंधू व समाजावादी पक्षाचे प्रवक्ते रामगोपाल यादव काय म्हणाले? जातियवादी नरेंद्र मोदी यांना आजच निवडणुका झाल्यास लाभ मिळू शकतो. त्यापासून देशाला वाचवण्यासाठी आम्ही सरकार पडू देणार नाही. असे फ़क्त मुलायमच्या पक्षाचेच म्हणणे नाही.

   भाजपाचे सहकारी बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमारही पुर्वाश्रमीचे समाजवादी आहेत. त्यांनाही पुढल्या वेळी मोदीच पंतप्रधान होण्याचा धोका दिसू लागला आहे. म्हणुन त्यांनी त्या नावाला आतापासूनच विरोध सुरू केला आहे. खुद्द कॉग्रेसही मोदीच पुढला भाजपाचा उमेदवार असेल असे वारंवार बोलतो आहे. याचा अर्थ इतकाच, की मतचाचण्यांचे जे आकडे समोर येत आहेत, त्यात खुपच तथ्य असले पाहिजे. म्हणूनच गुजरातबाहेर देशाच्या अन्य राज्यात मोदी यांची वाढती लोकप्रियता ही दखल घेण्यासारखी बाब आहे. मग असा सवाल निर्माण होतो, की अशी लोकप्रियता वाढण्याचे कारणच काय आहे? अजून तरी भाजपाने मोदी यांना आपल्या पक्षाचे किंवा आघाडीचे-एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केलेले नाही. स्वत: मोदी यांनीही आपल्याला पंतप्रधान व्हायचे आहे, असे जाहिरपणे बोलून दाखवलेले नाही. मग गुजरात बाहेरच्या लोकांचा त्यांच्याकडे ओढा कशाला आहे? हा ओढा अर्थातच हिंदू किंवा मुस्लिमेतर लोकांचा आहे, हे नाकरण्यात अर्थ नाही. देशातल्या मुस्लिमांमध्ये मोदीविषयी कमालीचा क्षोभ आहे. म्हणजेच मोदी यांची वाढती लोकप्रियता प्रामुख्याने हिंदू समाजात आहे, हे नाकारता येणार नाही. पण तिचे कारण काय? हिंदू समाजाला मोदी यांच्यासारखा नेता आवडावा असे कोणते गुण त्या माणसाकडे आहेत? त्याने असे काय मोठे कर्तृत्व गाजवलेले आहे? आणि समजा गाजवलेले असेल तरी त्याची माहिती या गुजरात बाहेरच्या लोकांपर्यंत पोहोचली तरी कशी? एका राज्याचा विकास व प्रगती करू शकणारा कर्तबगार मुख्यमंत्री देशाचा कारभार उत्तम चालवू शकेल, असे लोकांना का वाटावे? लोकांच्या अपेक्षा तरी काय असतात? एखाद्या नेत्याविषयी जनमानसात अशी लोकप्रियता कशामुळे निर्माण होते?

   इथे एक आणखी विरोधाभास लक्षात घेण्याची गरज आहे. देशातल्या संपुर्ण माध्यमांनी मोदी यांची विकृत प्रतिमाच गेल्या दहा वर्षात सातत्याने रंगवलेली आहे. तशीच लालूप्रसाद किंवा मुलायम, मायावती यांचीही काहीकाळ विकृत प्रतिमा रंगवण्यात आलेली होती. पण त्यात त्यांचा बळी पडला. मात्र मोदींना बदनाम करणे माध्यमांना शक्य झाले असले तरी त्यांची लोकप्रियता याच बदनामीने वाढवली आहे. ज्याचे इतके विकृत चित्र इतकी वर्षे रंगवले, तो बदनाम होण्याऐवजी अधिकच लोकप्रिय का व्हावा? की ज्याला माध्यमे गैरकृत्य म्हणून रंगवत होते, ते अन्य राज्यातील लोकांना गैरकृत्य वाटत नव्हते आणि म्हणूनच त्याच बदनामीने मोदी यांना लोकप्रिय बनवले आहे? आज माध्यमांनी मोदींचा जो चेहरा रंगवला आहे, तो मुस्लिमांचा कर्दनकाळ असाच आहे ना? आणि तोच गुजरातमध्ये बहुसंख्य लोकांना भावला होता, तसाच गुजरात बाहेरील हिंदू बहुसंख्य लोकांना भावतो आहे काय? त्याच भावण्याचे प्रतिबिंब मतचाचण्यांपधून पडत असेल का? विकास, उत्तम कारभार किंवा प्रगतीचा मोठा वेग; अशा कारणासाठी एखादा नेता मुख्यमंत्री लोकप्रिय होत असेल तर तो चिंतेचा विषय नाही. पण तो नेता कुणा एका समाज घटकाचा कर्दनकाळ म्हणून दुसर्‍या समाज घटकात लोकप्रियता संपादन करत असेल; तर ती नक्कीच चिंतनिय बाब आहे. त्याचाकडे केवळ निवडणुकीचे राजकारण किंवा निवडणुकीतले आकडे म्हणून बघणे मुर्खपणाचे आहे. ती सामाजिक चिंतेची बाब असते. आणि म्हणूनच विविध मतचाचण्यांमध्ये आढळणारी मोदी यांच्या लोकप्रियतेची बाब गंभीरपणे मिमांसा करण्यासारखी आहे, असे मी मानतो. दुर्दैव असे की नेमक्या त्याच गोष्टीवर कुठल्या वाहिनी वा माध्यमांनी चर्चाच करण्याचे टाळले आहे.  

   सेक्युलर माध्यमे किंवा विचारवंत त्याकडे भाजपाला सत्ता मिळणार, की सत्तेपासून भाजपा वंचित राहिल एवढ्य़ाच संकुचित नजरेने बघत असल्याचा तो परिणाम आहे. वास्तव तसे नाही. त्यापेक्षा ही गंभीर बाब आहे. गुजरात बाहेरील मोदींची वाढती लोकप्रियता त्यांच्याकडे विकासपुरूष किंवा उत्तम प्रशासक म्हणुन बघत असती तर तो राजकीय विषय असतो. पण त्या वाढत्या लोकप्रियतेचे मोठे प्रमाण मुस्लिमांचा कर्दनकाळ म्हणुन बघायचे असेल, तर तीच लोकप्रियता सामाजिक सहिष्णूतेचा गुंतागुंतीचा विषय होऊन जातो. अशी लोकप्रियता ही शांत व सोशिक वाटणार्‍या बहुसंख्य हिंदू समाजात कट्टरतेचे प्रमाण वाढत असल्याचे द्योतक असते. ज्याला शाही इमाम बुखारी सेक्युलर धर्मनिरपेक्षतेचा रखवालदार म्हणतात; त्या हिंदूंच्या सोशिकतेला खिंडार पडत असल्याचे ते लक्षण आहे. सनातन संस्था, विश्व हिंदू परिषद, संघ परिवार किंवा भाजपा व शिवसेना अशा हिंदूत्ववाद्यांकडे ज्या हिंदू समाजातील लोकांचा ओढा दिसत नाही, ते मोदींकडे वळत आहेत; असा त्याचा अर्थ होतो आणि त्याचा आणखी एक अर्थ असा, की ज्यांच्यावर सतत हिंदूत्वाचा आरोप होत आलेला आहे, त्यांच्यापेक्षा जहा्ल व आक्रमक अशा माणसाकडे या लोकप्रियतेचा ओढा दिसतो आहे. त्यांना अन्य हिंदूत्ववादी सौम्य किंवा निरुपद्रवी वाटतात आणि नरेंद्र मोदी खरे आक्रमक हिंदू वाटतात, असा त्याचा अर्थ आहे. मतचाचण्यांमध्ये वाढणारी मोदींची लोकप्रियता म्हणूनच अत्यंत गंभीर बाब आहे असेच मी मानतो. आणि त्याचा विचार मुस्लिमातील विवेकी व समजदार मंडळींनी करण्याची गरज आहे. कारण आपल्याकडे संख्येची लोकशाही आहे आणि ज्या डावपेचांनी मुस्लिमांच्या मतांचे राजकारण खेळले जाते, त्याच डावपेचांनी मोदी संख्येचा पर्याय उभा करू बघत आसावेत. ही संख्येची लोकशाही सेक्युलर राज्यघटनेच्या आधारे काय काय चमत्कार घडवू शकते त्याची कल्पना कोणी केली आहे काय?    ( क्रमश:)
भाग   ( ४१ )      २५/९/१२

रविवार, २३ सप्टेंबर, २०१२

शाही इमाम बुखारी काय म्हणतात बघा


   ‘राजकीय पक्षांना फ़क्त अल्पसंख्यांक आणि दुर्बळ समाज घट्काची मते मिळवणे तेवढे माहित आहे, पण त्या पक्षांनी अशा वर्गाच्या कल्याणासाठी काहीच केलेले नाही. देशामध्ये धर्मनिरपेक्षता टिकून राहिली असेल तर ती कुठल्या राजकीय पक्षामुळे नव्हेतर हिंदूंमुळे शिल्लक उरली आहे.’  

   हे शब्द कोणा संघवाल्या हिंदूत्ववाद्याचे नाहीत, तर एका मुस्लिम मौलवीचे आहेत. दिल्लीतील ऐतिहासिक जामा मशिदीचे शाही इमाम मौलाना सय्यद अहमद बुखारी यांनी आक्टोबर २००६ मध्ये अलाहाबाद येथे पत्रकारांशी बोलताना हे मत व्यक्त केले होते. तेव्हा त्यातला गर्भितार्थ समजून घ्यायला हरकत नसावी. हिंदूमुळे म्हणजे हिंदूंच्या कुठल्या संघटना किंवा भाजपासारख्या राजकीय पक्षामुळे देशातील धर्मनिरपेक्षता टिकून राहिली असेही बुखारी यांना म्हणायचे नाही. कारण त्यांनी त्याच पत्रकार परिषदेत भाजपाला पराभूत करणे हे प्रत्येक मुस्लिमाचे कर्तव्य आहे, असे सांगताना १९८९ वगळता मुस्लिमांनी कधीच भाजपाला मते दिली नाहीत; असेही सांगितले होते. मग देशातल्या धर्मनिरपेक्षता म्हणजे सेक्युलॅरिझमेचे श्रेय बुखारी हिंदूंना का देतात? ते हिंदू समाज किंवा लोकसंख्येला श्रेय देत आहेत. आणि त्याचा नेमका अर्थ समजून घेण्याची गरज आहे. जसे त्यांनी मुस्लिमांना भाजपा विरोधी मतदान करण्याचे धार्मिक आवाहन आपल्या समाजाला केलेले आहे तसे धार्मिक राजकीय आवाहन हिंदू धर्मोपदेशक किंवा धर्मसंस्था म्हणुन कोणी कधी करत नाही. आणि कोणी केलेच तर त्याला हिंदू समाज कधी दाद देत नाही. धर्माचा राजकारणाशी संबंध नाही, हे तत्व हिंदू समाज उपजतच पाळत असतो. म्हणुनच तो आपोआपाच सेक्युलर असतो. त्याला कोणी सेक्युलर तत्वज्ञान शिकवण्याची गरज नाही. तो आपले राजकीय मत बनवतो आणि त्याप्रमाणे मतदान करतो. म्हणुनच त्याच्या मताचे गठ्ठे नसतात. कोणा सत्ताधीशाला वा राजकीय पक्षाला राजकीय-प्रशासकीय निर्णय घेताना हिंदूंच्या धर्मश्रद्धेचा विचार करावा लागत नाही, की भयभित व्हावे लागत नाही. पण तसे मुस्लिमांबद्दल म्हणता येईल काय?

   इथे हिंदूंना मौलवी बुखारी जे धर्मनिरपेक्षतेचे श्रेय देतात, ते हिंदूंच्या सोशिकता व संयमी प्रवृत्तीला देत आहेत. ते म्हणतात, त्याचा नेमका अर्थ म्हणुनच प्रामुख्याने मुस्लिम समाजाने समजून घेण्याची मला गरज वाटते. कारण गेल्या काही वर्षात त्याच हिंदूमधल्या धर्मनिरपेक्ष प्रवृत्तीला ओहोटी लागताना दिसते आहे. ती बाब आक्रमक धर्मभावनांचे सतत प्रदर्शन मांडणार्‍या मुस्लिमांसाठी घातक आहे. कारण ती आक्रमकता हिंदूंच्या सोशिकता व संयमाच्या मर्यादेतच चालू शकणार आहे. जिथे हिंदूंच्या संयमाचा कडेलोट होईल, तिथे मग गुजरात सुरू होत असतो. आणि म्हणुनच नरेंद्र मोदी यांना गुजरात बाहेर मिळणारे नैतिक समर्थन, ही मला अत्यंत गंभीर बाब वाटते. हिंदू समाजातील ज्यांचा ज्यांचा आपल्या संयमी वृत्ती वा सोशिकतेबद्दल भ्रमनिरास होत आहे, त्यांच्यामध्ये मोदी विषयक आकर्षण वाढताना दिसत आहे. आणि हे बघायचे असेल तर दिसणारे सत्य आहे. मागल्या चार महिन्यात देशव्यापी अनेक मतचाचण्या झाल्या, त्यात प्रत्येकवेळी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान म्हणुन मिळणारी पसंती वाढत आहे. एक तर मोदी अन्य सर्व उमेदवारांपेक्षा अधिक लोकप्रिय असल्याचे प्रत्येक चाचणी सांगते. पण तेवढ्याने मोदी लगेच पंतप्रधान होणार असे अजिबात नाही. पण त्यांच्यकडे वाढणारा देशव्यापी कल हिंदूंमधील सोशिकता कमी होत असल्याचे लक्षण आहे. हिंदू किंवा मुस्लिमेतर समाजातील धर्मनिरपेक्षतेची भावना घटत असल्याचे ते निदर्शक आहे. मुंबईतील रझा अकादमीच्या मोर्चानंतरची दंगल अशा बदलणार्‍या मतांना किंवा भ्रमनिरासाला मदत करणारी असते. आणि म्हणूनच त्याकडे मुस्लिमांनी गंभीरपणे बघावे असे मला वाटते. असे मी पुन्हा मुस्लिमांनाच थेट आवाहन का करतो आहे? त्यापेक्षा मुस्लिमांच्या आक्रमकतेवर पांघरुण घालणारे खुप आहेत. सेक्युलर पोपटपंची करणार्‍या अशा विद्वानांवर विश्वास ठेवणे सोपे असले तरी ते घातक आहे. कारण त्यापैकी कोणी प्रसंग ओढवतो तेव्हा मुस्लिमांच्या मदतीला येणार नाहीत.

   गुजरातच्या दंगलीसाठी नेहमी भाजपा व मोदी यांच्यावर दोषारोप होत असतात. पण त्याच दंगलीत बडोद्यातील बेस्ट बेकरीचे प्रकरण घडले. तेव्हा ज्यांना गुन्हेगार म्हणून शिक्षा झाली, त्यात भाजपाप्रमाणेच कॉग्रेसच्या नगरसेवकांचाही समावेश आहे हे विसरता कामा नये. त्या दंगलीत किती सेक्युलर पक्षाचे, कॉग्रेसचे कार्यकर्ते मुस्लिमांचे प्राण वाचवायला घराबाहेर पडले होते? उलट ज्यांच्यावर दंगलीचे खापर फ़ोडले जाते, त्याच भाजपावाल्यांच्या खांद्याला खांदा लावून अनेक कॉग्रेस कार्यकर्तेही मुस्लिमांवर हिंसक हल्ले करण्यात पुढेच होते. म्हणजेच सेक्युलर म्हणुन मुखवटे लावून मतांचा जोगवा मागणारेही विपरित प्रसंग आला, मग मुस्लिमांना वार्‍यावर सोडुन देतात किंवा अगदी थेट मुस्लिमांवर हल्लेसुद्धा करतात. आणि म्हणुनच सुरक्षा मोलाचीव वाट्त असेल तर मुस्लिमांनीच काही प्रश्नांचा वा विषयांचा गंभीरपणे विचार करावा असा माझा आग्रह आहे. आणि सर्वात गंभीर मुद्दा आहे तो हिंदू समाजाची धर्मनिरपेक्षता टिकवण्याचा. हिंदूंच्या संयमाचा कडेलोट न होण्याचा. कारण तीच हिंदूंची धर्मनिरपेक्षता वा संयम मुस्लिमांच्या सुरक्षेची खरी हमी असते. बाकी वाहिन्या किंवा माध्यमातून पोपटपंची करणार्‍यांच्या शब्दांचा काहीही उपयोग नसतो. मग मुस्लिमांनी विचार करायचा म्हणजे काय?

   आपण जे मुस्लिम म्हणून धर्मप्रेम दाखवतो किंवा त्यातून मुस्लिमेतरांवर जो परिणाम होतो, त्याचा अतिरेक तर होत नाही ना? तो अतिरेक झाला आणि तशीच प्रतिक्रिया उमटू लागली तर? इमाम बुखारी यांचे विधान त्याच संदर्भात बारकाईने वाचणे व समजून घेणे अगत्याचे ठरावे. त्यांनी देश धर्मनिरपेक्ष असल्याचे सर्वस्वी श्रेय हिंदूंना म्हणजे हिंदू समाजाच्या संयमाला दिले आहे. पण मुस्लिमांना दिलेले नाही. म्हणजेच देशातील धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या संयमावर अवलंबून आहे. त्याचा साधा सरळ अर्थ इतकाच, की भारतातील धर्मनिरपेक्षता हिंदूंच्या संयमी सोशिकतेवर विसंबून आहे, तिचा अंत पाहिला जावू नये. तो पाहिला गेल्यास नरेंद्र मोदी यांच्याविषयी आकर्षण सुरू होते. आणि ते आकर्षण वाढणे, मुस्लिमांना घातक असू शकते. कारण मोदी हा नुसता हिंदूत्ववादी नेता नाही, तर मोदी यांची प्रतिमा कुठल्याही आक्रमक मुस्लिम नेत्याइतकीच जहाल आहे. जेवढी त्यांच्या प्रेमात पडणार्‍या हिंदूंची संख्या वाढणार आहे, तेवढीच देशातील धर्मनिरपेक्षतेची हमी संपुष्टात येणार आहे. म्हणूनच भारतात अजून जो बहुसंख्यांक हिंदू समाज आहे, त्याला मोदींकडे आकृष्ट होण्यापासून बाजूला ठेवण्याचे काम मुस्लिम नेते व समाजाने करणे मला अगत्याचे वाटते. तसे का होऊ शकते?  

   अलिकडे ज्या घटना आसाम व अन्य संदर्भात घडल्या, त्यानंतर मोठ्या प्रमाणात मोदी हेच मुस्लिमांच्या आक्रमकतेला खरे उत्तर असल्याची चर्चा कानावर येऊ लागली आहे. ‘बघा जगात आणि देशात सगळिकडे मुस्लिम गडबड करू शकतात, पण गुजरातमध्ये त्यांची हिंमत होत नाही. कारण तिथे मोदींची दहशत आहे’; हा युक्तीवाद वा्ढत चालला आहे. फ़ेसबुक किंवा इंटरनेटवरील चर्चा व मतप्रदर्शन त्याची साक्ष आहे. पण ज्या समाजघटकाला अशा प्रकारे उघड बोलता येत नाही, तो प्रचंड लोकसंख्येतला वर्ग आहे आणि तोच खर्‍या दंगलीत सहभागी होत असतो. त्याला शब्दापेक्षा कृतीचे आकर्षण असते. असा वर्ग हिंदू किंवा मुस्लिमेतर समाजात वाढणे, धर्मनिरपेक्षतेला बाधक आहे. परिणामी धर्माविषयी कमालीची नाजूक मनस्थिती असलेल्या मुस्लिम समाजाला जास्त घातक आहे. कारण इवल्याशा कारणाने मुस्लिम रस्त्यावर येतात, तेव्हा समोरून प्रतिकार होणार नाही, संयम दाखवला जाईल; याची खात्री असते. ती खात्री संपली मग काय होईल? मोदींचे वाढते आकर्षण त्याच धोक्याची घंटा आहे. त्याला माध्यमांची टिका वा राजकीय आरोप हे उत्तर नाही. कारण दहा वर्षे चाललेले आरोप पचवून मोदी ठामपणे उभे आहेत. आणि त्याच बदनामीने त्यांना निराश वैतागलेल्या हिंदू समाजात लोकप्रियता मिळत चाललेली आहे. त्यातून हिंदूमधील धर्मनिरपेक्षतेचे आकर्षण संपले मग काय व्हायचे? समाजवादी पक्षाचे मुलायम, बिहारचे नितीशकुमार किंवा डावी आघाडी मोदी नकोत असे दडपण भाजपावर आताच आणु लागले आहेत, त्याची कारणे कोणी तपासून बघायची? गुजरातपेक्षा मोठी राज्ये संभाळणार्‍या पक्षाचे हे मोठे नेते मोदी नावाचा इतका धसका का घेत आहेत? मग त्यापासून मुस्लिम नेते व समाजाने काय धडा शिकला पाहिजे? मोदींना रोखण्यात कोणी पुढाकार घेतला पाहिजे? दिल्लीची सत्ता काबीज केल्यावर मोदी काय करू शकतात, या प्रश्नाचे उत्तर भयंकर आहे.  ( क्रमश:)
भाग   ( ४० )      २४/९/१२

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१२

नरेंद्र मोदी हिंदूना का आवडू लागलेत?


   मी जेव्हा हिंदू मुस्लिम यांच्यातले सौहार्द म्हणतो तेव्हा ती प्रक्रिया दोन्ही बाजूंनी सुरू होण्याची गरज आहे. ती एका बाजूची असून भागणार नाही. तशी असणे किंवा तशी दाखवणे तद्दन खोटारडेपणा किंवा निव्वळ देखावा असतो. आणि असे माझे म्हणणे नाही, तर इलामच्या अनेक अभ्यासकांचे मत आहे. कोणा हिंदूत्ववाद्याचेही ते मत नाही. आणि म्हणुनच जेवढा सामान्य हिंदूने इस्लाम समजून घेण्याची गरज आहे, तेवढाच आपला धर्म मुस्लिमांनीही समजून घेण्याची गरज आहे. बहुतेक तसे नसते, त्यामुळेच घोटाळा होत असतो. सध्या जगभर एका चित्रपटाने कल्लोळ माजवला आहे. अमेरिकेतल्या कुणा ख्रिश्चन वा ज्यु धर्मियाने प्रेषित महंमदांच्या संदर्भात चित्रपट काढला. त्यात प्रेषितांची बदनामी झाली म्हणून हे काहूर माजले आहे. ही बदनामी नेमकी काय आहे, असे आपल्या परिचित वा मित्र मुस्लिमाला विचारून बघा. बहुतेकांना यापैकी काहीच ठाऊक नसेल. बदनामी किंवा विटंबना एवढेच तो छातीठोकपणे सांगू शकेल. याचे कारण तशी त्याची ठाम समजूत आहे. तशी माहितीच त्याच्यापर्यंत पोहोचली आहे. आणि अशी माहिती मिळाली, मग चिडून संतापुन रस्त्यावर येणे आणि प्रेषितांच्या बदनामी वा विटंबनेच्या विरोधात प्राणपणाने लढायला सिद्ध होणे; म्हणजेच इस्लामचे पालन, अशी त्या सामान्य मुस्लिमाची ठाम समजूत करून देण्यात आलेली आहे. मग त्याने रस्त्यावर उतरून हिंसक होणे चुक मानता येईल काय? त्याला जेवढा धर्म किंवा धर्मपालन माहित आहे, त्यानुसारच तो वागत असतो. मग त्याला दोषी ठरवून प्रश्न सुटत नाही. तो ज्याला धर्मपालन समजतो किंवा धर्म मानतो, त्याबद्दल त्याच्याशी चर्चा करून त्याच्या वागण्याची उकल केली पाहिजे. त्याला बोलते केले पाहिजे.

   एक गोष्ट बघा. पाकिस्तान हा स्वत:ला इस्लामिक देश म्हणतो म्हणूनच तिथेही त्या अमेरिकन चित्रपटाबद्दल गुरूवार-शुक्रवारी मोठीच हिंसक निदर्शने झाली. पण त्याच पाकिस्तानची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली आहे. अमेरिकन अनुदानावर तिथल्या खर्चाची बेगमी करावी लागते. तशीच अवस्था पॅलेस्टाईनची आहे. अमेरिका व युरोपियन देशांकडून मिळणार्‍या एक अब्ज डॉलर्सच्या अनुदानावर पॅलेस्टाईनचे अर्थकारण चालते. त्या अनुदानाच्या मदतीने स्वत:च्या पायावर उभे रहाणेही त्या दोन्ही देशांना शक्य झालेले नाही. पण इस्लामिक आंदोलनाचा विषय असेल, तर हेच दोन्ही देश सर्वात जास्त आघाडीवर दिसतील. म्हणजेच आपल्या व्यक्तीगत जीवनातील दुर्दशेबद्दल तिथल्या बहुतांश मुस्लिम जनतेला कसलीच फ़िकीर नाही. कुपोषण, गरीबी, उपासमार, बेकारी, मागासलेपणा अशा कुठल्याही विषयावर तिथे अशी मोठी आंदोलने होत नाहीत. युरोप किंवा अमेरिकन अनुदानावर जगण्याची लाचारी व अगतिकता त्यांच्या संतापाचे कारण होत नाही. पण धर्माचे नाव घेतले मग तात्काळ सर्वस्व पणाला लावायला तिथली मोठी लोकसंख्या रस्त्यावर उतरते. दुरची उदाहरणे कशाला? आपल्या जम्मू काश्मिरचीच गोष्ट घ्या. मागल्या दोनतीन दशकात त्या राज्याचा खर्च केंद्राच्या अनुदानावरच चालू आहे. एकूण उलाढालीमध्ये ९० टक्क्याहून जास्त रक्कम केंद्राने पुरवावी लागते. कारण सततच्या हिंसाचाराने कधीकाळी तेजीत चालणारा पर्यटन व्यवसाय दिवाळखोरीत गेला आहे. पण त्यातून जी दयनीय अवस्था तिथल्या मुस्लिम लोकसंख्येच्या नशीबी आली आहे, त्याचे वैषम्य तिथल्या कुठल्या मुस्लिम नेत्याच्या बोलण्यातून कधी्तरी दिसते का? पण तोच काश्मिर सध्याच्या व्हिडीओ प्रकरणात हिंसक आंदोलनामध्ये आघाडीवर दिसला.

   काही अपवाद सोडले तर जवळपास सर्वच मुस्लिमबहुल देशात अशीच परिस्थिती दिसेल. त्याचे कारण मग मुस्लिम स्वभावात शोधावे लागते. धर्माचा विषय निघाला मग मुस्लिम असे का वागतात? आणि अन्य धर्मिय म्हणजे हिंदू, ख्रिश्चन, बौद्ध, जैन इत्यादी तसे का वागत नाहीत, असा प्रश्न पडतो. अर्थात देशातले किंवा जगातले सर्वच म्हणजे प्रत्येक मुस्लिम असाच वागत नाही. पण मुस्लिम म्हणुन जी त्या धर्माच्या अनुयायांची आज जागतिक ओळख झाली आहे, ती अशीच भडक व हिंसक नाही काय? आणि जेव्हा असा चेहरा जग आपल्या डोळ्यांनी पहाते किंवा कानाने ऐकते, तेव्हाच कुठल्या वाहिन्या, चॅनेलवर कोणी मुस्लिम विचारवंत ‘इस्लाम म्हणजे शांतता’ असे सांगू लागतो; तेव्हा त्यावर विश्वास कसा ठेवायचा? आपल्या डोळ्यांवर की त्या पोकळ शब्दांवर? खरेच इस्लाम म्हणजे शांतता असेल तर बारीकसारीक गोष्टीतून इस्लामच्याच नावाने मुस्लिम हिंसक का होतात? कधीतरी हे वाहिन्यांवर दिसणारे मुस्लिम विद्वान त्याचे तर्कशुद्ध उत्तर देणार आहेत काय? नसतील तर त्यांचे काही बिघडत नाही. पण खरेच प्रत्येकवेळी शांत रहाणारा जो संयमी अन्यधर्मिय आहे, त्याचा संयम सुटेल तेव्हा काय होणार, हा गंभीर प्रश्न आहे. तेव्हा पोकळ शब्द उपयोगी नसतात. गुजरात हे त्याचे भयानक उदाहरण आहे. त्यावर संघ परिवाराचे कारस्थान असा आरोप केल्यामुळे विषयाचे गांभिर्य संपत नाही. तिथे दोन अडिच महिने चाललेल्या दंगलीत किमान आठदहा लाख अन्यधर्मिय किंवा हिंदूंनी सहभाग घेतला हे विसरता कामा नये. हे काही लाख लोक कारस्थान शिजवून असे काही करू शकत नाहीत. मुठभर लोक कारस्थान करतात आणि बाकीच्या प्रक्षुब्ध हिंसक झुंडीकडून पाशवी कृत्य करून घेत असतात. पण ती बाकीची प्रक्षुब्ध झुंड उपलब्ध नसेल, तर मुठभर कारस्थानी इतका मोठा हिंसाचार घडवून आणु शकत नाहीत.

   गुजरातच्या नरोडा पाटिया येथे दहा वर्षापुर्वी ९७ मुस्लिमांची निर्घृण हत्या झाली. त्यात आता चाळीस, पन्नास आरोपींना शिक्षा झालेली आहे. पण तेवढेच लोक त्या हत्याकांडात सहभागी होते काय? इतक्या कमी संख्येने ह्ल्लेखोर आले असते, तर त्यांचा तिथल्या मुस्लिम वस्तीने यशस्वी मुकाबला केला असता. पण तसे नव्हते. कित्येक हजाराच्या संख्येन तिथे हिंदू किंवा मुस्लिमेतरांचा जमाव चाल करून आलेला होता. म्हणूनच मुस्लिम स्वत:चा बचाव करू शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. तेव्हा त्यातल्या पन्नास शंभर लोकांना शिक्षा देऊन किवा गुन्हेगार ठरवून मुस्लिमांना सुरक्षित झालो असे मानता येणार नाही. सुडाचे समाधान नक्की मिळू शकेल. पण तेच हवे आहे, की मुस्लिमांना सुरक्षित जीवन हवे आहे? सुरक्षित जीवन हवे असेल तर जेव्हा दंगल चालू होती, त्यावेळी इतका हजारो मुस्लिमेतरांचा जमाव असा पाशवी हिंसक होऊन का चाल करून आला, त्याचा विचार नको का करायला? कारण त्या जमावातल्या मुठभरांनाच कायदा दोषी ठरवू शकला आहे आणि बाकी हजारपट दंगेखोर मोकाट आहेत आणि त्यापैकी कोणी घडल्या प्रकाराबद्दल पश्चात्तापही व्यक्त केलेला नाही. ती बाब अधिक भयंकर आहे. म्हणूनच जर दुसरा लोकसमुह म्हणजे मुस्लिमेतरांच्या जमावानेही हिंसक व्हायचे ठरवले तर काय? हा प्रश्न अंगावर शहारे आणणारा आहे. त्याचा विचार कोणी करायचा? मोदींवर खापर फ़ोडून ते संकट संपते का?

   आज जसे जगभर मुस्लिम एका चित्रपटासाठी हिंसक जमावाच्या रुपाने आक्रमक झाले आहेत आणि जाळपोळ करत आहेत, त्यापेक्षा गुजरातच्या दंगलीचे स्वरूप व लक्ष्य वेगळे होते काय? गुजरातच्या दंगलीचा व हत्याकांडाचा निषेध करायला आजही उत्साहात पुढे सरसावणारे किती मुस्लिम नेते, आजच्या हिंसक हल्ल्यांच्या निषेध करताना दिसतात? ते दिसत नाहीत, तेव्हाच मुस्लिमेतरांच्या मनात शेकडो शंका निर्माण होत असतात आणि त्यांची उत्तरे कुठेच मिळत नाहीत. उलट मुस्लिमांच्या भावना दुखावल्यात, अशी मखलाशी करणारे मुस्लिम नेते विचारवंत समोर येतात; तेव्हा मुस्लिमेतरांच्या शंकांचे रुपांतर संशयात होऊ लागते. त्याचे निराकरण करणे अगत्याचे असते. पण त्याची कोणालाच फ़िकीर नाही. ज्यांना मुस्लिमांच्या मतांच्या गठ्ठा मतांवर डोळा ठेवून राजकारण खेळायचे असते, त्यांना दंगलीत मरतो कोण व किती याच्याशी कर्तव्य नसते. त्याला मतांच्या गठ्ठ्य़ाशी कर्तव्य असते. म्हणूनच परवा ममता बानर्जी काय म्हणाल्या? ‘जुम्मेके नमाजके बाद हमारे मंत्री इस्तिफ़ा देंगे’. पश्चिम बंगालाम्ध्ये २७ टक्के मुस्लिम लोकसंख्या आहे आणि त्यासाठीच ममता अशी भाषा वापरतात. दिल्लीतल्या राजकीय पेचप्रसंगाचा जुम्मेकी नमाजशी काय संबंध असतो? हेच मुस्लिमेतरांना खटकणारे असते. मग त्याला वाटू लागते मतांच्या गठ्ठ्याला मतांच्याच गठ्ठ्य़ानेच उत्तर दिले पाहिजे. त्यातूनच मग नरेंद्र मोदी हा हिंदू आक्रमकतेचा नवा चेहरा समोर येऊ लागला आहे आणि त्याविषयीचे आकर्षण हिंदूमध्ये वाढत चालले आहे. त्याच्या परिणामांचा विचार मुस्लिम नेतृत्वाचे किंवा विचारवंतांनी कधीतरी गंभीरपणे केला आहे काय? अशा मोदीविषयी आकर्षणाच्या परिणामांकडे चिकित्सक दृष्टीने बघितले आहे काय? मुस्लिमांच्या धार्मिक आक्रमकतेचा हिंदूंवर किंवा मुस्लिमेतरांवर पडणार्‍या मानसिक प्रभावाचा विचार तरी कोणाच्या मनाला शिवला आहे काय? असेल तर त्याचे प्रत्यंतर मुस्लिमांच्या वर्तनातून दिसायला हवे ना? दिल्लीच्या शाही इमाम बुखारी याचे शब्द त्यासाठी मार्गदर्शक ठरावेत.( क्रमश:)
भाग   ( ३९ )      २३/९/१२

शुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१२

सामंजस्याची प्रक्रिया सुरू होणे महत्वाचे


   ही लेखमाला लिहितांना मला भलेबुरे फ़ोन आले. त्यात अनेक समंजस लोक होते, तसेच काही नुसतेच चिडलेले होते. पण त्याला महत्व नाही. साधायचा हेतू मोलाचा असतो. जसे काही मुस्लिमांचे मन विचलित झाले तसेच काही हिंदूंना जणू काही हत्यार हाती लाभल्यासारखे वाटले. ज्यांना मुस्लिमांच्याच डोक्यावर खापर फ़ोडायचे असते, त्यांना दोषच बघायचे असणार आणि या लेखमालेत इतके नेमके दोष मी मांडलेले आहेत, की तेवढे कुणा हिंदूत्ववाद्यानेही मांडलेले नसतील. मग त्याच हेतूने ही लेखमाला वाचणार्‍यांना उत्साह आला तर नवल नाही. पण माझा हेतू कुणाच्या डोक्यावर खापर फ़ोडण्याचा अजिबात नाही. तसेच करायचे असेल तर माझ्यात आणि उठसुट संघ किंवा शिवसेनेवर खापर फ़ोडणार्‍या सेक्युलर अर्धवटरावांमध्ये काय फ़रक उरला? दोष दाखवणे किंवा नुसते आरोप करणे याला मी पलायनवाद म्हणतो. जे दोष असतील ते दाखवणे योग्य आहे. पण तिथेच विषय संपता कामा नये. ते दोष दूर करण्याचाही प्रयत्न असायला हवा. आणि जर तो प्रयत्न माध्यमे किंवा तथाकथित सुधारक वा राजकीय मंडळी करणार नसतील, तर सामान्य माणसानेच त्यात पुढाकार घ्यायला हवा. कारण जे काही बिघडते, त्याचे सर्व दुष्परिणाम त्याच सामान्य माणसाला भोगावे लागत असतात. मग त्याचा धर्म हिंदू असो की इस्लाम असो. मग त्यानेच आपल्या या समस्येवर उपाय का शोधू नये? त्यानेच परस्परांच्या धर्माविषयी ज्ञान करून घेण्यात गैर काय? जे दोष मुस्लिमांकडून हिंदूंना दाखवले जातात, त्याची मिमांसा करून ते दुर करण्याचा हिंदूंनी प्रयत्न करावा आणि मुस्लिमांचे दोष आसतील तर त्यांच्याकडे चर्चेतून त्याविषयीची भूमिका समजून घ्यावी. त्यासा्ठी दोघांमध्ये संवाद सुरू व्हावा. कुठलीही कटूता न आणता संवाद सुरू व्हावा.

   यात एकच अडचण मला नेहमी जाणवायची, की हिंदूंच्या मनात मुस्लिमांविषयी शंका आहेत, आक्षेप आहेत. पण त्याना नेमके शब्दरूप देण्यात ही तक्रारखोर मंडळी तोकडी पडतात. त्यांच्या मनातल्या त्या शंका व प्रश्नांना मी म्हणूनच इथे सार्वजनिक स्वरूप दिले आहे. त्याचा आधार घेऊन त्यांनी मुस्लिम परिचित, मित्र, सहकारी असेल, त्याच्याशी संवाद साधला पाहिजे असे माझे मत नव्हे तर आग्रह आहे. नुसत्या शंका मनात ठेवून संशयाने बघून हे प्रश्न कधीच सुटणार नाहीत. मजेची गोष्ट अशी, की आपण मिश्र समाजात असतो. त्यामुळे सार्वजनिक स्वरूपात हिंदूंचे उत्सव होतात, मतप्रदर्शन चालते, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिमांना हिंदू धर्माविषयी थोडीफ़ार कल्पना असते. पण हिंदू मात्र इस्लामविषयी मोठ्या प्रमाणात अनभिज्ञ असतो. म्हणूनच तो मुस्लिमाच्या साध्या साध्या गोष्टीकडे संशयाने बघू लागतो. त्या शंका मी इथे थोड्याफ़ार प्रमाणात मांडल्या आहेत, त्याचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या मित्र परिचित मुस्लिमाशी संवाद साधू शकाल. त्याला जेवढा इस्लाम वा त्याचा धर्म माहित आहे, तेवढ्यावर त्याच्याकडे त्यावर खुलासा मागा. खुलासा याचा अर्थ जाब मागणे नव्हे, तर समजून घेण्यासाठी प्रयत्न करणे होय. आणि त्याच्याकडे खुलासा मिळत नसेल तर तो निदान त्याच्या कुणा मौलवी धर्मोपदेशकाला विचारून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकेल ना? पण त्याचा एक लाभ असा आहे, की त्याचेही इस्लामविषयक अज्ञान दुर होण्यास तुम्ही हातभार लावू शकाल. पर्यायाने त्याच्याशी तुमचा जो संवाद सुरू होतो, त्यातुन भिन्न धर्मिय असूनही जवळ येण्याची प्रक्रिया आरंभ होत असते. तेवढ्या प्रमाणात शंका संशयाचे जाळे तुटत असते. तो संवाद व्हावा हीच माझी मूळ इच्छा आहे. हा सगळा खटाटोप त्यासाठीच आहे.

   दोन बाजूंनी एकमेकांबद्दल गैरसमजात जगण्यातून दुरावाच निर्माण होत नाही, तर ज्यांना कोणाला त्यांच्यात संघर्ष पेटवायचा असतो त्यांच्यासाठी पोषक वातावरण निर्माण होत असते. त्यांना गैरसमज हवेच असतात. की म्हणूनच दोन्ही बाजूंच्या डिवचणार्‍या गोष्टी घटनांना अगत्याने प्रसिद्धी दिली जाते? आणि जेव्हा असे होत असते तेव्हा त्यातून जे लोक दुखावतात, त्यांच्या  जखमेवर मीठ चोळले; मग अधिकच भडका उडत असतो. एक ताजी गोष्ट घ्या मुस्लिम आरक्षणाची. मुस्लिमांना ओबीसीमधून काही टक्के आरक्षण देण्याचा निर्णय मोठ्या आवेशात सामाजिक न्यायाचा ठरवला जात असतो. पण त्याचे नेमके किती लाभ मुस्लिमांना मिळणार, याचा दोन्हीकडून विचार होत नाही, झालेला नाही. कधीतरी आपण आजवरच्या आरक्षणाचे लाभ तपासून पाहिले आहेत काय? जेव्हा संधीच कमी असतात किंवा सोयीच कमी तुटपुंज्या असतात, तेव्हा टक्केवारीने अशा दुर्बळांच्या वाट्याला किती आणि काय येत असते? जेव्हा रांगेत लाखभर माणसे उभी आहेत, तेव्हा संधी वा सुविधा ह्जार असल्या मग एकूण गरजवंत आहेत त्यातले ९९ टक्के वंचित रहाणार असतात. अगदी टक्केवारीने बघितले तरी त्यात मग अधिक वंचित उरतो तो मागास समाजच असतो. कारण जेवढा मागास समाज किंवा मागास घटक, तेवढी त्यातल्या गरजवंतांची टक्केवारी अधिक असते. मग एक लाख गरजवंत असे आपण म्हणतो, तेव्हा त्यातले अर्धेअधिक मागास घटकातलेच असतात. म्हणजेच जर पन्नास टक्के आरक्षणाच्या संधी मिळाल्या तरी त्याचा खरा लाभ त्या जातीजमातीमधील सुखवस्तू व पुढारलेल्यांनाच मिळतो आणि जे खरे गरीब व गरजू असतात, त्यांची वंचना कधीच संपत नाही. पण आपल्या जातीमधल्या कुणाला मिळाले म्हणून उअरलेल्यांनी खोट्या आनंदात मशगुल रहावे अशी अपेक्षा असते.

   ज्या ज्या जातीजमातींना आजवर आरक्षण मिळाले त्यांच्यातल्या किती लोकसंख्येला त्याचे खरेखुरे लाभ मिळू शकले, त्याचा तपास केला तर या रहस्याचा उलगडा होऊ शकेल. कारण समस्या टक्केवारीच्या आरक्षणाची नसून उपलब्ध अपुर्‍या संधीची आहे. आपल्या देशात प्रगती व विकास करताना संधी निर्माण करण्याचा दृष्टीकोनच नसल्याने मुळात संधीचा तुटवडा आहे. मग ते अपयश लपवण्यासाठी आरक्षणाचे तुकडे फ़ेकून विविध समाज घटकात झुंज लावता येते आणि ज्यांनी नाकर्तेपणाने देश चालवून विकासाच्या संधीच निर्माण केलेल्या नाहीत, त्यांच्या पापावर मस्त पांघरूण घातले जाते. शिवाय इवल्या तुकड्याकरीता झुंजणार्‍यांना न मिळालेला ‘न्याय दिला’ म्हणुन मिरवताही येत असते. असे का होऊ शकते? तर समाज घटकात दुफ़ळी व एकमेकांच्या विरुद्ध भावना चिथावलेल्या असल्या, मग त्यांना स्वत:ला काय मिळते यापेक्षा दुसर्‍याला काय मिळाले नाही; यातच आनंद अनुभवायची सवय लागते. दुसर्‍याच्या दु:खात सुख शोधण्यात समाजाचे विविध घटक रंगून गेले, मग झुंजवणार्‍यांना मजा मारायची निश्चिंत मोकळिक मिळत असते. इतकी चांगली फ़सवणुकीची सोय समाज घटकात वैरभावना असली मगच मिळत असताना कोण कशाला त्या परस्पर विरोधी घटकांत सामंजस्य निर्माण करील? त्यापेक्षा न्यायाच्या, सवलतीच्या व आरक्षणाच्या ‘सामाजिक न्यायाचे’ गाजर दाखवून झुंजत ठेवण्याचेच राजकारण होणार ना? आणि ज्यांचे हितसंबंध अशा भांडणात किंवा वैरभावनेत गुंतलेले आहेत, त्यांच्याकडुन गैरसमज दुर करण्याचा प्रयत्न होईलच कशाला? उलट अधिक दुफ़ळी व भांडणे होतील यासाठीच प्रयत्न होणार ना? आज सेक्युलर पुरोगामी राजकारण नेमके त्याच दिशेने व वाटेने चालू आहे.

   यातून बाहेर पडण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विविध समाज घटकांनी आपल्यात नेमके कुठे पटत नाही किंवा काय भांडण आहे वा मतभेद आहेत, त्याचा शोध घेऊन त्यावर मात करण्याचे मार्ग शोधून काढणे. आणि यात मुस्लिम समाजाने पुढाकर घ्यावा अशीच माझी इच्छा आहे. कारण स्वातंत्र्योत्तर काळात सेक्युलर या शब्दाने सर्वात अधिक शोषण व दिशाभूल कोणाची केली असेल तर ती मुस्लिम समाजाची केलेली आहे. किंबहूना आरंभी ते फ़क्त कॉग्रेस पक्ष करत होता. आता त्यात अनेक भागिदार तयार झालेले आहेत. पण त्याची जाणिव झालेल्या समाज व वर्गातून मग पर्यायी व्यवस्था उभी राहू लागली. ती अत्यंत धोकादायक आहे. आज नरेंद्र मोदी यांच्या प्रभावाखाली देशभर एक नवे धृवीकरण सुरू झालेले आहे, ते धृवीकरण सहा दशकातल्या मुस्लिमांच्या गठ्ठा मतांचा पर्याय म्हणून उभे रहात आहे. सेक्युलर अतिरेकाने जो विकृत मुस्लिम चेहरा समोर आणला आहे व जे अनुचित गैरसमज निर्माण केले आहेत; त्यातून मग हिंदूंमध्ये गठ्ठा मतांची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याचा बिमोड पाखंडी सेक्युलर वर्तन करू शकणार नाही. तर खरेखुरे धर्मनिरपेक्ष विचार व त्याद्वारे विविध समाज घटक व त्यांच्यातले सौहार्द हाच त्यावरचा पर्याय आहे. आणि म्हणुनच त्याची सुरूवात सामान्य मुस्लिम व हिंदूंनी करावी अशी माझी अपेक्षा आहे. म्हणुनच ही लेखमाला त्याला चालना देण्यासाठीच मी लिहित आहे. तिचा रोख हिंदूंमधील अस्वस्थ लोकांनी मुस्लिमांना समजून घेण्याचा, शंका, प्रश्न विचारण्याची प्रक्रिया सुरू करणाचाच आहे. आणि काही ठिकाणी तसे प्रयास सुरू झाल्याचे वाचकांनी मला फ़ोन करून कळवले हा मी शुभशकून मानतो.      ( क्रमश:)
भाग    ( ३८ )  २२/९/१२

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२

इस्लाम व मुस्लिमांना समजून घ्यायला हवे


   आज ही लेखमाला लिहित असताना मला जेवढा काही थोडाफ़ार इस्लाम किंवा मुस्लिम मानसिकता कळली आहे, त्याचा लवलेशही मला साधारण पाचसहा वर्षापुर्वी नव्हता. आज जसे वाहिन्यांवरचे अर्धवटराव विवेचन करतात, तशीच माझीही अक्कल चालत होती. कारण मुस्लिम  किंवा इस्लाम याविषयीचे माझे अज्ञान त्यांच्या इतकेच होते. अणि मजेची गोष्ट म्हणजे जसे हे वाहिन्यांवरचे मुर्ख बोलतात, तशीच काहीशी इकडची तिकडची पोपटपंची मीसुद्धा करत होतो. ‘शोधन’ साप्ताहिकाचे नौशादभाई म्हणतात, तसाच मीसुद्धा इस्लामविषयी पुर्णत: अनभिज्ञ होतो. म्हणजे काय? तर मला मुळात हिंदूधर्म सुद्धा माहित नाही, ज्या धर्माचा अनुयायी म्हणून मी जन्मत: ओळखला जातो. पण जे काही माझे स्वत:च्या धर्माविषयी अज्ञान आहे, त्याच निकषावर मी इस्लाम वा मुस्लिमांचे विवेचन करीत होतो. आज जाहिर चर्चेत तोच मुर्खपणा अत्यंत विद्वान माणसेही समाजाला मार्गदर्शन म्हणून करत असतात. सर्व धर्म सारखे किंवा सर्व धर्मामध्ये तीच मानवी उद्धाराची मूळ संकल्पना आहे, असली भोंगळ भाषा आपल्या कानावर पडत असते. पण वास्तवात तसे अजिबात नसते. म्हणून मग जेव्हा भलताच अनुभव येतो, तेव्हा आपण चकित होऊन जातो किंवा कुणाच्या तरी डोक्यावर त्याचे खापर फ़ोडून मोकळे होतो. ‘इस्लामदर्शन’ या संकेतस्थळावर नौशादभाई उस्मान यांनी (‘मुस्लिम म्हणजे कोण?’ हे) जे स्पष्टीकरण दिले आहे ते म्हणूनच मला मोलाचे वाटते. ते म्हणतात, ‘मुस्लिम म्हणजे मुस्लिमाच्या पोटी जन्मलेली किंवा अरबी-उर्दु नाव असलेली व्यक्ती म्हणजे मुस्लिम, हा गैरसमज आहे. इतर अनेक धर्मांविषयी ही गोष्ट खरी असू शकते, परंतु इस्लामची भूमिका यापेक्षा वेगळी आणि तर्कसंगत आहे. ही भूमिका फक्त आमच्या मुस्लिमेतर बांधवांनाच नव्हे तर बहुसंख्य मुस्लिमांना देखील माहित नाही.’

   त्या मुस्लिमेतर मुर्खांमध्ये पुर्वी माझाही समावेश होता. पण १९९२-९३ च्या मुंबईतील दंगलीनंतर मी क्रमाक्रमाने बदलत गेलो. माझा एक मित्र भाऊ कोरडे याने दंगलीनंतरच्या काळात मुंबईच्या धारावी परिसरात हिंदू मुस्लिम सहजीवनासाठी खुप काम केले. वकार खान व भाऊ कोरडे यांनी केलेल्या त्या कामासाठी एक तासाभराचा माहितीपटही "द बॉंड" नावाने तयार झालेला आहे. त्याचा जगात खुप गाजावाजा झालेला आहे. या मित्राबरोबर माझी नेहमी चर्चा होत असते. विचारांची देवाणघेवाण होते, तशीच अनुभवाचीही देवघेव होते. त्यातुनच मी मग इस्लाम समजून घेण्याचा दिशेने पहिले पाऊल टाकले. हरून रखांगी हा माझा खुप जुना मित्र आहे. तो सध्या सौदी अरेबियात स्थायिक झालेला आहे. त्याने एकदा बोलण्यातून विषय निघाला म्हणुन मला कुराणाची मराठी प्रत आणुन दिली; तशीच काही इस्लाम विषयक खुलासे करणारी छोटीछोटी पुस्तकेही आणून दिली. माझ्या चिकित्सक वृत्तीमुळे ती मी बारकाईने वाचत गेलो आणि मला इस्लाम धर्म व त्याचा इतिहास समजून घेण्यात रस निर्माण झाला. आणि जसजसा मी त्यात अधिक शिरत गेलो; तसतसा मला आजवरचे माझे अज्ञान लक्षात येत गेले. म्हणजे माझ्या समजूती किंवा गृहिते उध्वस्त होत गेली. त्याचे प्रमुख कारण म्हणजे इस्लाम विषयक जे काही वाचनात आलेले होते, ते एकीकडे पुर्वग्रह दुषित म्हणजे एकांगी विरोधातले होते. तर दुसरीकडे हरूनने आणून दिलेल्या पुस्तकात प्रचारी थाटाचा मजकूर होता. तिसरीकडे जे स्वत:ला सेक्युलर म्हणवून घेतात व मुस्लिम नाहीत; त्यांनी आपल्या भूमिकेला पुरक अर्धवट माहिती दिलेली. सहाजिकच इस्लामची भूमिका असे जे नौशादभाई म्हणतात, त्याचा नेमका चेहरा त्यापैकी कशातच सापडू शकला नव्हता. पण भाऊ कोरडेचे अनुभव आणि माझे वाढलेले वाचन यातून मी थोडाफ़ार इस्लाम समजू शकलो.

   याचा एक फ़ायदा असा झाला, की जे कोणी सेक्युलर म्हणून बोलत असतात, ते निव्वळ लोकाची दिशाभूल करतात हे लक्षात आले, तसेच जे कोणी इस्लाम विरोधात सातत्याने बोलत असतात, त्यांचेही अज्ञान मला समजू शकले. म्हणूनच नौशादभाई जे सांगतात ते कोणी सांगू शकला नव्हता. मुस्लिम असणे म्हणजे काय तेच तुम्हाला ठाऊक नसेल, तर तुम्ही मुस्लिम असू शकत नाही, तसेच तुम्ही इस्लामचे प्रामाणिक टिकाकारही असू शकत नाही. आज आपण ज्यांना जाहीर कार्यक्रमातून ऐकत असतो, ते नेमके असेच अर्धवट असतात. ते कारण नसताना सर्व धर्म सारखेच आहेत अशी थाप ठोकून समोरच्या लोकांची दिशाभूल करत असतात. तुम्ही इस्लामचे विरोधक असा किंवा समर्थक असा, तुम्हाला इस्लामची जी भूमिका समजून घेतली पाहिजे. अन्यथा तुम्ही केलेले समर्थन जेवढे निरुपयोगी असते, तेवढीच त्यावरची टिकाही निरर्थक असते. त्यातून कुठलेही हित साधले जात नाही. उलट अहित होण्याचा धोका संभवतो. जिथे ज्ञानापेक्षा गैरसमज निर्माण होतात, तिथे अहित अपरिहार्य असते. कारण शंकांचे निरसन होत नाही, तेव्हा बारीकसारीक गोष्टीत संशय पुढे येत असतात. आणि संशयाचे भूत मानेवर बसले, मग समजूतीला सुट्टी दिली जात असते. म्हणूनच मी इस्लाम म्हणजे इस्लामची भूमिका समजून घेण्याचा प्रयत्न करू लागलो. त्याचेही श्रेय मोठ्या प्रमाणात नौशादभाई यांच्या ‘शोधन’ साप्ताहिकालाच द्यावे लागेल. कारण जेव्हा मी सेक्युलर चळवळी व कार्यक्रमात तरूणपणी सहभागी व्हायचो, तेव्हा हमीद दलवाई यांच्या बंडखोर सुधारणावादाचा मी समर्थक होतो. आणि त्याच कालखंडात ‘शोधन’मधून हमीदभाईंवर अत्यंत कडवी टीका छापून येत असे. हरूनभाईने त्यावेळी त्या साप्ताहिकाची वर्गणी माझ्या एका नातागाच्या नावाने भरली होती. त्यामुळे पोस्टाने त्यांच्या घरी येणारा ‘शोधन’चा अंक मला १९७८-८० च्या कालखंडात नियमित वाचायला मिळत होता.

   मी ‘शोधन’मधली हमीदभाईवरची टिका वाचून कमालीचा अस्वस्थ होत असे. कारण मला हमीद हा मोठा क्रांतीकारक वाटत होता. आपोआपच त्याच्या विरोधातले कुठलेही युक्तीवाद कितीही विवेकी असले, तरी पटवून घेण्याच्या मनस्थितीत मी नव्हतो. पण त्यावेळी जे कुतूहल ‘शोधन’च्या वाचनाने निर्माण केले होते, तेच दोन दशकांनंतर उत्सुकतेचे कारण झाले असावे. पण जसजसे मी इस्लाम विषयक लिखाण वेगवेगळ्या मार्गाने मिळवत गेलो आणि अभ्यासत गेलो, तसतसे एक लक्षात आले; की आपण जे सार्वजनिक ठिकाणी ऐकतो किंवा राजकीय जाणकार व पत्रकार सांगत असतात, त्यापेक्षा वास्तवातला इस्लाम व मुस्लिम खुपच वेगळा आहे. हे लोक आपल्यासमोर अपवाद आणून उभा करतात आणि त्यालाच नियम म्हणून दाखवू व सिद्ध करू बघतात. मग तो नियम सिद्ध होत नाहीच. पण जे अपवाद असतात ते लुळे पडतात. त्यातून अकारण गैरसमज वाढायला मदत होते. आज आपल्या देशामध्येच नव्हेतर जगामध्ये म्हणूनच इस्लाम व मुस्लिम हे अनाकलनिय रहस्य बनले आहे. आणि नौशादभाई तेही लपवत नाहीत. ते म्हणतात, ‘समाजात शांती हवी असेल तर आम्ही एकमेकांना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी थोडा वेळ खर्च करणे अगत्याचे आहे. सर्वात जास्त गैरसमज असलेल्या इस्लाम व मुस्लिम समाजाला आपण समजून घेऊ या.’

   कुठल्यातरी सेक्युलर वा मुख्यप्रवाहातील माध्यमाने इतके प्रामाणिक मत व्यक्त केले आहे काय? ‘सर्वात जास्त गैरसमज असलेल्या इस्लाम व मुस्लिम समाजाला’ समजून घेऊ या, असे नौशादभाई स्पष्टपणे सांगतात. मग मुद्दा असा उरतो, की हे गैरसमज कुठून व का निर्माण झाले? कोणी निर्माण केले? कशासाठी निर्माण केले? ते आपोआप निर्माण झाले, की जाणिवपुर्वक कोणी निर्माण केले आहेत? त्यात कोणाचा लाभ आहे काय? जर गैरसमज असतील आणि ते दुर करायचे असतील, तर सत्याला सामोरे जावे लागेल. आणि त्याला नौशादभाई तयार आहेत. पण दोन्ही समाजात सौहार्द असावे म्हणुन प्रयत्न करणारे तथाकथित सेक्युलर मात्र सत्याला सामोरे जायला तयार नाहीत. याचा अर्थ त्यांनाच खरे सामाजिक सौहार्द नको आहे काय? सेक्युलर म्हणजे दोन भिन्न धर्मिय किंवा जातिय समाजघटकांमध्ये शत्रूत्व असते काय? त्यामुळेच जे सेक्युलर नाहीत तर खरेखुरे नि:पक्षपाती व अभ्यासपुर्ण लिहिणारे आहेत व अलिप्तपणे गुणदोष सांगू शकणारे आहेत, त्यांच्या वाचनाकडे मी वळलो. इतकेच नाही तर इस्लामचे पुरस्कर्ते व कडवे विरोधक यांचीही मते अधिकाधिक वाचण्याचा प्रयास केला. त्यामुळेच मी असे ठामपणे सांगू शकतो, की आज इस्लाम जो बदनाम झाला आहे त्याला, त्याच्या कडव्या विरोधकांपेक्षा व मुस्लिमातील मुठभर अतिरेक्यांपेक्षा; मुस्लिमंविषयी वैचारिक दिशाभूल करण्यातच धन्यता मानणारे सेक्युलर उदारमतवादीच अधिक जबाबदार आहेत. आणि म्हणुनच मुस्लिमांनी जसे अन्य लोकांचे गैरसमज दूर करण्यात पुढाकार घेतला पहिजे, त्याचप्रमाणे अन्य धर्मियांनी इस्लाम वा मुस्लिम म्हणजे नेमके काय, ते समजून घेण्यास पुढे यायला हवे आहे. तरच ही सामाजिक दरी व अस्वस्थता संपवणे शक्य आहे.   ( क्रमश:)
भाग   ( ३७ )  २१/९/१२

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१२

धर्मविचारांचे विवेचन की वैरभावनेची मशागत?


   कोण हे डॉ. झाकीर नाईक आणि काय आहे त्यांचा युट्युबवरील व्हिडीओ? नाईक यांचा जागतिक पातळीवरील इस्लामिक चळवळीमध्ये मोठा दबदबा आहे. वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर झालेले झाकीर नाईक नंतरच्या काळात धर्मशास्त्राकडे वळले आणि कुराणच नव्हेतर हिंदू व ख्रिश्चन धर्मग्रंथांसह अनेक वैज्ञानिक ग्रंथ संशोधनाचे हवाले देऊन ते कुराण व इस्लामची महती सांगण्याचे कार्य करीत असतात. सर्व धर्माच्या परिषदा भरवून, त्यात अन्य धर्मांच्या संकल्पना खोडून काढण्यात ते कुशल असल्याचे मानले जाते. अनेक धर्माच्या उपदेशकांना परिसंवादात त्यांनी पराभूत केल्याचाही दावा आहे. मात्र ही सगळी कसरत आहे. आपले हुकूमी चहाते व पाठीराखे जमवून टाळ्या मिळवण्यापलिकडे नाईक यांची मजल गेलेली नाही. खरे तर कुठल्याही जादूगाराने किंवा किमयागाराने समोरच्या प्रेक्षकाची मती कुंठीत करून त्याला भारावून टाकावे; असा शो डॉ. नाईक उत्तम प्रकारे पार पाडत असतात. आणि समोर भारावून जायला उत्सुक श्रोतृगण जमा असला, मग फ़ारसे कष्टही घ्यावे लागत नाहीत. त्यात पुन्हा फ़टाफ़ट कुराण, गीता किंवा बायबलच्या अध्याय व श्लोकांचे दाखले क्रमांकासह दिले, मग श्रोता भारावून जाणे सोपे असते. मुद्दे बाजूला रहातात आणि नाईक यांच्या स्मरणशक्तीच्या चमत्काराने श्रोता भारावलेला असतो. त्यातले यश हे बौद्धिक नसून ती किमया मानवी स्वभावाशी खेळण्याच्या कौशल्याची आहे. हे कसे साध्य होते? कुठलीही मुलगी वयात येत असते, तेव्हा तिच्या उपजत वृत्ती तिला सौंदर्याविषयी जागृत करत असतात. अशावेळी आपणही सुंदर आहोत हे ऐकायला ती षोडषवर्षिय मुलगी उत्सुक असते. मग प्रत्यक्षात ती किती का काळी कुरूप असेना. तिला आपल्या सौंदर्याचे गुणगान ऐकायला आवडत असते. एका गाजलेल्या हिंदी चित्रपटातले लोकप्रिय गीत आहे,

‘क्या खुब लगती हो, बडी सुंदर लगती हो’. मग ते शब्द ऐकून ती म्हणते, ‘फ़िरसे कहो, कहते रहो; अच्छा लगता है. जीवनका हर सपना अब सच्चा लगता है’.

   हा मानवी स्वभावाचा उपजत गुण आहे. जे ऐकायचे असते ते खरे असायची गरज नसते, तर आवडणारे असावे लागते. आणि आवडणरे असेल तर ते खोटे असले तरी खरे वाटू लागते. ‘सपना सच्चा लगता है’. डॉ. झाकीर नाईक जी गर्दी समोर जमवतात, तिला आवडणारे सांगू लागतात आणि मग ते वास्तवात खरे व योग्य असण्याची गरज उरत नाही. भुरळ घालणारे असावे, याची ते मस्त पेरणी करतात. त्यातून अन्य धर्मापेक्षा इस्लाम हा कसा श्रेष्ठ व परिपुर्ण आहे, तेच समोर जमलेल्या श्रद्धावंतांना ऐकायचे असते. ते नुसते कुराण वा हादीसमधील दाखले देऊन शक्य नसते, तेवढे अन्य धर्मग्रंथ व पुराणकथेतील पोकळ्या सांगून शक्य असते. झाकीर नाईक यांनी ते कौशल्य छानपैकी आत्मसात केले आहे. आणि त्याचे उत्तम मार्केटींग केले आहे. पण म्हणून ते सर्वकाही सत्य बोलतात वा सांगतात असे मानायचे कारण नाही. उलट डॉ. झाकीर नाईक किती धडधडीत सफ़ाईदार खोटे व अर्धसत्य बोलतात, त्याचाही दाखला आहे. एका अभ्यासू तरूणाचा हा व्हिडीओसुद्धा युट्यूबवर उपलब्ध आहे. नाईक यांच्या विधाने व दावे यांचे पुरते पोस्टमार्टेम केलेले आहे. अवघ्या पाच मिनिटात झाकीर नाईक तब्बल पंचवीस असत्ये कथन करतात; हे त्याने उदाहरणे व दाखले देऊन सिद्ध केले आहे. पण त्याच्याकडे नाईक यांच्यासारखी मार्केटींगची यंत्रणा नाही. म्हणूनच त्याचा फ़ारसा गवगवा होत नाही. या तरूणाने नाईक यांच्या पाच मिनिटाचा व्हिडीओ घेऊन एक एक वाक्य आणि त्यातला दावा तपासून पुराव्यानिशी खोटा पाडला आहे. तोही व्हिडीओ युट्युबवर उपलब्ध आहे. पण त्याला खोटा पाडायचे कष्ट कधी नाईक यांनी घेतलेले नाहीत.

   माझा नाईक यांच्या बाजारीकरणावर आक्षेप नाही. त्यांनी आपले दुकान जरूर चालवावे. पण ते दुकान चालवताना भारतीय वा अन्य कुठल्या देशातील समाज घटकांमध्ये वितुष्ट येणार नाही व त्यातून हिंसा भडकणार नाही, याची मर्यादा पाळावी. दुसर्‍याच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. आपल्या धर्म किंवा धर्मश्रद्धा श्रेष्ठ ठरवण्यासाठी अन्य कोणाच्या धर्मभावना व श्रद्धांची अवहेलना करण्याचे कारण नाही. ज्या व्हिडिओबद्दल मी याआधी लिहिले आहे, त्यात नाईक हिंदूंच्या भावना दुखावण्याचे आवाहन नाईक करतात आणि तसे न करणार्‍या मुस्लिमांना डिवचतात, ही गंभीर बाब आहे. आपला हिंदू मित्र दुखावेल म्हणुन किंवा आपल्या दुकानात येणारा हिंदू ग्राहक दुखावेल म्हणुन मुस्लिम धर्मविषयक सवाल त्यांना विचारत नाहीत, अशी तक्रार करून डॉ. नाईक काय साध्य करू बघत आहेत? ते स्पष्ट शब्दात मुस्लिमांना सवाल करतात, तुम्हाला आपल्या अल्लाहच्या श्रद्धेपेक्षा हिंदूची मैत्री प्यारी आहे काय? अल्लाहबद्दलची श्रद्धा अन्य कुणा धर्मियाच्या श्रद्धा दुखावूनच सिद्ध होत असते काय? हे कुठले तर्कशास्त्र आहे? ही दोन धर्मियातील मैत्रीभाव बंधूभाव उध्वस्त करण्याची ती चिथावणीच नाही काय? थोडक्यात नाईक कोणते आवाहन करीत आहेत? अलाह प्यारा असेल तर त्याच्यासाठी हिंदूच्या धर्मश्रद्धा दुखावणे अगत्याचे आहे. त्याचा व्यवहारी अर्थ असा, की मैत्री किंवा व्यवसाय दुय्यम असून धर्मासाठी कुणाशीही वैरभावना जोपासली पाहिजे. आणि तसे करणार नसाल तर मुस्लिम म्हणुन घ्यायला तुम्ही नालायक आहात. ही धर्मविद्वेषाची चिथावणी नाही काय?

   व्यवहारी जीवन आणि धर्मचिकित्सा यांच्या जागा वेगवेगळ्या असतात. नाईक असे सवाल ज्या प्रेक्षक श्रोत्यांसमोर करतात, ते चर्चेचे व्यासपीठ असते. आणि त्यातील नाईक यांचे आवाहनानुसार श्रोत्यांनी वागायचे तर कृती व्यवहारी क्षेत्रात होणार असते. म्हणजे हिंदू मित्राला मुस्लिमाने मैत्री बाजूला ठेवून दुखावणे असते. आपल्या दुकानात आलेल्या ग्राहकाला माल देण्याऐवजी धर्मचिकित्सा त्या मुस्लिम दुकानदाराने करायची काय? ती चिकित्सा त्याला ग्राहक व मित्रापासून तोडणारी नसेल काय? त्या मैत्रीत व व्यवहारात त्यातून बाधा येणार नाही काय? मग यातून काय साधले जाणार असते? नाईक तरी नेमके काय साधू पहातात? समोरचा जो हिंदू मित्र असेल, तर तो कसा प्रतिसाद देईल; तेही नाईक यांनी कथन केले आहे. पण तसाच प्रतिसाद येईल याची खात्री नाही. ‘अरे जाने दो झाकीर, वोह तो कहानी है’ असे एखादा संयमी हिंदू म्हणू शकेल. पण तो संयमी नसला तर? आणि त्यानेही तसेच दुखावणारे प्रत्युत्तर मुस्लिम मित्र वा दुकानदाराला तिथल्या तिथे दिले मग? त्यातून मुस्लिमाच्या भावना दुखावणार ना? मग तो मुस्लिम समजूतदार वा संयमी नसला तर काय परिणाम संभवतात? की तेच नाईक यांना अपेक्षित आहे? नौशादभाई नेमके त्याच दुखण्यावर बोट ठेवतात. झाकीर नाईक यांच्यासारखे ‘तथाकथित मुस्लिम’ इस्लामची प्रतिमा खराब करत असतात. कारण नसताना गुण्यागोविंदाने नांदणार्‍या दोन समाजात विष कालवत असतात. पण त्यांना वेळच्यावेळी आवर घातला जात नाही किंवा लगाम लावला जात नाही, तेव्हा काय होते?

    ‘तथाकथित मुस्लिमांच्या वाईट कृत्यांना संपूर्ण समाजाच्या व पर्यायाने इस्लामच्या नावावर चिटकवले जाते. त्यामुळे समाजात आंतरधर्मिय तेढ निर्माण होऊन देशात अराजकता पसरते. मग दंगली, लाठीचार्ज, गोळीबार, संचारबंदी, सूडचक्र, खून, अत्याचार, नरसंहार वगैरे-वगैरे...’ असे नौशादभाईच म्हणतात. आणि म्हणुन मी डॉ. झाकीर नाईक यांच्या व्हिडीओचा इथे उहापोह केला. एकीकडे हेच नाईक मुंबई व अनेक जागी विविधधर्मिय शांतता परिषदा भरवतात. मुंबईत तर डोळे दिपवणारा समारंभ ते दरवर्षी साजरा करतात. आठवडाभर चालणार्‍या त्यांच्या त्या सोहळ्याला जगभरातून मुस्लिम विचारवंत धर्मोपदेशक हजेरी लावतात. म्हणजेच झाकीर नाईक ही दुर्लक्ष करण्यासारखी व्यक्ती नाही. म्हणुनच त्यांच्या वक्तव्याकडे काणडोळा करता येणार नाही. कारण चिथावणार्‍या शब्दांची जादू झूंडींना आवडत असते आणि झूंडीने असे शब्द उचलले; मग ते विध्वंसक हत्यारापेक्षाही हानिकारक ठरू शकतात. नौशादभाईंना व अन्य मुस्लिम बुजूर्गा्ना म्हणुनच माझी विनंती आहे, की त्यांनी मुस्लिम समाजातील ही समस्या ओळखली आहे, तर तिचे निराकरण करण्यातही पुढाकार घ्ययला हवा आहे. ते ज्यांना डुप्लीकेट मुस्लिम म्हणतात, त्यांच्या चिथावण्यांनी विपरित प्रसंग ओढवू शकतात. मग अशा हिंदूमधील प्रवृत्तीला रोखायला जसे अनेक सुबुद्ध हिंदू पुढाकार घेतात, तसाच एक मुस्लिमांचा आक्रमक सुबुद्ध वर्ग मजबूत करणे अगत्याचे झाले आहे. तसे झाले तर आझाद मैदानसारख्या घटना घडणारच नाहीत आणि मग त्याच्यावर प्रक्षुब्ध प्रतिक्रिया उमटण्याचा धोकाही आपोआपच संपुष्टात येईल.  ( क्रमश:)
डॉ.नाईक विरोधातला व्हिडीओचा इंटरनेट दुवा- http://www.youtube.com/watch?v=6Bnqp3tI484

भाग   ( ३६ )  २०/९/१२

कोंबड्या झुंजवण्याचे हे सेक्युलर कारस्थान आहे का?


   गेल्या शनिवारी मला एका मुस्लिमाचा फ़ोन आला होता. तो हिंदीत बोलत होता. मी कुराण वाचले आहे काय, असा सवाल त्याने केला. त्यावर मी होकार देताच त्याने उलट सवाल केला, की कुराण वाचूनही तुम्हाला इतक्या शंका कशाला येतात? मग मी त्याला उलटा प्रश्न विचारला, की त्याने खरेच कुराण वाचले आहे काय? आणि वाचले असेल तर मी या लेखमालेत असे काय लिहिले, की जे कुराणाची अवज्ञा करणारे आहे? तर त्याच्याकडे उत्तर नव्हते. पण त्याने आपली मळमळ व्यक्त करून फ़ोन बंद केला. त्याचे म्हणणे एकच होते, मी मुस्लिमांविषयी इतके सवाल का उपस्थित करतो आहे? तो हिंदीत बोलत होता. त्यामुळे मी मराठीत काय लिहितो, याचा बहुधा त्यालाही पत्ता नसावा. मात्र मी मुस्लिमांच्या वर्तनाबद्दल काही शंका उपस्थित करतो आहे एवढेच त्याला कळलेले असावे. पण त्याची दुसरी बाजू अशी, की तो धर्मनिष्ठा दाखवत असला तरी त्यालाच धर्म म्हणजे काय व त्याचे गांभिर्य काय त्याचा थांगपत्ता नव्हता. पण जेव्हा असे लोक मुस्लिमांचा चेहरा म्हणून अनुभवास येतात, तेव्हा नवनव्या समस्या निर्माण करत असतात. त्याच्याशी संवाद झाल्यावर मला एका इस्लामी वेबसाईटची आठवण झाली. इस्लामदर्शन असे त्या संकेतस्थळाचे नाव आहे. अत्यंत सोप्या मराठी भाषेत तिथे मराठी वाचकाला इस्लाम समजून घेण्यासाठी मदत होऊ शकते. माझेही ‘पुण्यानगरी’मधले एकदोन लेख तिथे पुनर्प्रकाशित केलेले आहेत. शिवाय एका लेखासंबंधाने प्रतिवादही केलेला होता. तिथे मुस्लिम कोणाला म्हणावे याचे उत्तम मार्गदर्शन आहे. त्यानुसार हा जो कोणी मला फ़ोन करणारा आहे, तो मुस्लिम ठरत नाही. उलट त्याला डुप्लिकेट मुस्लिम म्हणायला हवे. किंबहूना असेच लोक मोठ्या प्रमाणात इस्लाम व मुस्लिमांबद्दल विकृत प्रतिमा निर्माण करतात, असे म्हणायला हरकत नाही. नौशाद उस्मान नावाचे ‘शोधन’ साप्ताहिकाचे काम करणारे गृहस्थ आहेत. एकदा त्यांनी मला फ़ोन करून गप्पासुद्धा केल्या होत्या. यांनी तिथे दिलेल्या विवरणाचा हा उतारा छान आहे.

 ‘मुस्लिम म्हणजे कोण? आता तुम्ही म्हणाल हा काय प्रश्न झाला. मुस्लिम म्हणजे मुस्लिमाच्या पोटी जन्मलेली किंवा अरबी-उर्दु नाव असलेली व्यक्ती म्हणजे मुस्लिम, हा गैरसमज आहे. इतर अनेक धर्मांविषयी ही गोष्ट खरी असू शकते, परंतु इस्लामची भूमिका यापेक्षा वेगळी आणि तर्कसंगत आहे. ही भूमिका फक्त आमच्या मुस्लिमेतर बांधवांनाच नव्हे तर बहुसंख्य मुस्लिमांना देखील माहित नाही. त्यामुळे काही तथाकथित मुस्लिमांच्या वाईट कृत्यांना संपूर्ण समाजाच्या व पर्यायाने इस्लामच्या नावावर चिटकवले जाते. त्यामुळे समाजात आंतरधर्मिय तेढ निर्माण होऊन देशात अराजकता पसरते. मग दंगली, लाठीचार्ज, गोळीबार, संचारबंदी, सूडचक्र, खून, अत्याचार, नरसंहार वगैरे-वगैरे...! समाजात शांती हवी असेल तर आम्ही एकमेकांना समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी थोडा वेळ खर्च करणे अगत्याचे आहे. सर्वात जास्त गैरसमज असलेल्या इस्लाम व मुस्लिम समाजाला आपण समजून घेऊ या.’

   इस्लामचा धर्मानुयायी व अभ्यासक असूनही नौशाद यांची शैली किती नम्र आणि प्रामाणिक आहे बघा. एका बाजूला नुसतेच चिडून फ़ोनवर वाटेल ते मला ऐकवणारे व धर्माभिमानाचा देखावा करणारे आणि दुसरीकडे आपल्या धर्मतत्वाची ओळख दुसर्‍यांना व्हावी म्हणून प्रामाणिक प्रयत्न करणारे, यात असा जमिन अस्मानाचा फ़रक असतो. इथे नौशादभाई म्हणतात, मुस्लिम असण्यामागची ‘भूमिका फक्त आमच्या मुस्लिमेतर बांधवांनाच नव्हे तर बहुसंख्य मुस्लिमांना देखील माहित नाही’. आणि त्यातून काय होते? ‘त्यामुळे काही तथाकथित मुस्लिमांच्या वाईट कृत्यांना संपूर्ण समाजाच्या व पर्यायाने इस्लामच्या नावावर चिटकवले जाते. त्यामुळे समाजात आंतरधर्मिय तेढ निर्माण होऊन देशात अराजकता पसरते. मग दंगली, लाठीचार्ज, गोळीबार, संचारबंदी, सूडचक्र, खून, अत्याचार, नरसंहार वगैरे-वगैरे...’ 

   म्हणजेच दोन्ही बाजूच्या अडाणीपणातून शंका व संशयाला जे खतपाणी घातले जाते, त्याचेच विपरित परिणाम आपण बघत असतो. नुसता मुस्लिम मातापित्यांच्या पोटी जन्माला आल्यामुळे कोणी मुस्लिम असू शकत नाही. त्याला मुस्लिम व्हायचे असेल व रहायचे असेल, तर त्याने ईश्वरी आज्ञांचे काटेकोर पालन करायलाच हवे. त्यातून सुटका नसते किंवा सुट घेता येत नाही. आणि अशी सुट कोणी घेत असेल तर तो खरा मुस्लिमच नाही. तर तो डुप्लिकेट मुस्लिम आहे असेही नौशादभाई म्हणतात. आणि मला वाटते ही अशी जी डुप्लिकेट मंडळी आहेत, तीच समाजात वितुष्ट निर्माण करत असतात. ज्याचे परिणाम एकू्णच समाजाला भोगावे लागत असतात. आणि तिथेही सत्य सांगण्यापासून नौशादभाई पळवाट शोधत नाहीत. अत्यंत प्रामाणिकपणे ‘तथाकथित मुस्लिमांच्या वाईट कृत्यांना संपूर्ण समाजाच्या व पर्यायाने इस्लामच्या नावावर चिटकवले जाते. त्यामुळे समाजात आंतरधर्मिय तेढ निर्माण होऊन देशात अराजकता पसरते’, असे सत्य सांगुन टाकतात. मला वाटते नौशादभाईसारख्या मुस्लिमांचा चेहरा जगासमोर आणि एकूण लोकसंख्येसमोर येण्याची गरज आहे. जो चेहरा मुस्लिम आहे, तसाच समजूतदार व सुसंस्कृत आहे. माध्यमांनी असे चेहरे अधिकाधिक प्रसिद्धी देऊन लोकांसमोर आणले पाहिजेत. ज्यांना सनसनाटी विधाने करता येणार नाहीत, की खळबळ माजवता येणार नाही. पण समाजामध्ये सामंजस्य निर्माण करण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे. दु्र्दैव इतकेच, की त्यांना समोर आणलेच जात नाही. त्याऐवजी जे स्फ़ोटक भडक बोलतात, त्यांनाच पुढे आणले जाते. म्हणूनच जेवढे ते डुप्लिकेट तथाकथित मुस्लिम या गैरसमजाला जबाबदार आहेत, तेवढीच माध्यमे सुद्धा दोन समाजातील वितुष्टाला कारणीभूत आहेत असे मी मानतो.

   माझे लिखाण असो, की नौशादभाईंसारखे लेखक अभ्यासक असोत, आमच्यात अनेक मतभेदाचे मुद्दे आहेत. पण आम्ही जेव्हा बोललो, तेव्हा अत्यंत मनमोकळे बोललो होतो. कुठेही कटूता नव्हती. एकमेकांना न पटणारे मुद्दे असतातच, पण संवाद तर सुरू होतो. जसजसे तुम्ही संवाद करू लागता तसे विवादातूनही काही सुसंवादाचे मुद्दे सापडू लागतात. अनेकदा आपण जे मुस्लिम नेते वा पत्रकार शहाणे वाहिन्यांवर बघतो, ते सहसा मुस्लिमातील गैरवृत्तीचे लोक इस्लाम कसा बदनाम करतात, त्यावर बोलत नाहीत. उलट हिंदू संघटनांवर खापर फ़ोडण्यात धन्यता मानतात. मग दुसरी बाजू तेवढ्याच आग्रहपुर्वक यांच्या दोषावर बोट ठेवू लागते. इथे नौशादभाईंनी कुठेही अन्य धर्मियांच्या दोषावर बोट न ठेवता मुस्लिमातील दोषाकडे ठामपणे अंगुलीनिर्देश केला आहे. मग त्यांच्याविषयी कुठला हिंदूत्ववादी सुद्धा शंका घेऊ शकणार नाही. त्यालाही निमुटपणे आपल्यातल्या दोषांचा स्विकार करणे भाग पडेल. तिथूनच खरी देवाणघेवाण सुरू होऊ शकते. पण अशी चर्चा किंवा विवाद व संवाद मुख्य प्रवाहातील माध्यमातून होऊच दिला नाही तर एकमेकांवर दोषारोप खुप होतात. पण संवादाला सुरूवातच होत नाही. आणि त्या बाबतीत असे दिसेल, की माध्यमात दोन्ही बाजूंमध्ये संघर्ष पेटवण्याची मनोवृत्तीच अधिक दिसते. हिंदू असो की मुस्लिम त्यांच्यातला को्ण स्फ़ोटक बोलला, तेच वाक्य काढून जास्त प्रसिद्धी दिली जात असते. आणि नौशादभाईंसारखे लोक बाजूला फ़ेकून दिले जात असतात.

   मला खात्री आहे. मी आज इथे इस्लामदर्शन किंवा नौशादभाईंच्या लिखाणाचा जो उतारा दिला आहे, तो वाचून अनेक मराठी वाचकच नव्हेतर हिंदूत्ववादी सुद्धा थक्क होतील. कारण त्यांच्यापैकी कोणी इतके स्पष्ट शब्दात मुस्लिमांचे दोष इस्लामी प्रकाशनात सहसा वाचलेले नसतील. उलट मुस्लिमांच्या भावना दुखावण्यातच धन्यता मानणार्‍या काही बंडखोर लेखकांचा समावेश होऊ शकतो. तस्लिमा नसरिन किंवा रश्दी यांच्या इतकीच नौशाद उस्मान यांना प्रसिद्धी मिळू शकली तर? पण मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये सहसा असे होत नाही. तिथे एका बाजूला अबू आझमी यांच्यासारखे चिथावणीखोर किंवा दुसरीकडे रश्दीसारखे डिवचणारेच मुस्लिम समोर आणले जातात. किंबहूना मुस्लिमांचा समजूतदार चेहरा समोर येऊच नये, अशी काळजी माध्यमे घेतात की काय अशी कधीकधी शंका येते. की त्या डुप्लीकेट मुस्लिमांचा चेहरा समोर आणून मुस्लिम समाजाला एकुणच बदनाम करण्याचे सेक्युलर कारस्थान शिजलेले आहे? त्यात हिंदू मुस्लिमांच्या कोंबड्या झुंजवून मताचे राजकारण करण्यासाठी ते कारस्थान राबवले जात असते?  ( क्रमश:)
भाग   ( ३५ )  १९/९/१२

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१२

गुजरात दंगलीची वास्तव मिमांसा कधी होणार?


   डॉ. झाकीर नाईक अन्य धर्मांचे ज्या प्रकारचे तार्किक विवेचन करत असतात, तसेच काहीसे इस्लामविषयक सलमान रश्दी यांनी जे काही लिहिले. मग त्यावर इतका राग कशाला? तर्कानेच एखाद्या धर्मापेक्षा दुसर्‍या धर्माचे श्रेष्ठत्व सिद्ध करण्याची मुभा घ्यायची म्हटली, तर तो अधिकार एकट्या मुस्लिमांना असू शकत नाही. त्याचे लाभ झाकीर नाईकसारखे मुस्लिम उठवत असतील, तर तशीच इस्लामची मिमांसा अन्य मुस्लिम वा बिगर मुस्लिमही करू शकतात. त्याबाबत मुस्लिमांना संयम राखता आला पाहिजे. नाहीतर झाकीर नाईक यांना आवरले तरी पाहिजे. पण तसे सहसा होत नाही. मग सगळी गडबड सुरू होते. कारण मुस्लिम समाज आपल्या धर्माच्या श्रेष्ठत्वाबद्दल खुप आग्रही असतो, पण अन्य धर्माविषयी तो तेवढा सहिष्णू आढळत नाहीत. त्याला अनेक अपवाद आहेत. जसे माझे अनेक मुस्लिम मित्र आहेत. किंबहूना नव्वद नव्हे तर नव्याण्णव टक्के मुस्लिम तसे आग्रही नसतात. त्यातले एक टक्का फ़ार तर तसे अत्याग्रही आढळतील. पण जेव्हा मुस्लिम समुह तयार होतो, तेव्हा त्यांच्यातला हा संयम कमी होतो. कारण आक्रमक मुठभर लोक संयमी मुस्लिमांना फ़रफ़टत घेऊन जातात. त्याचाच फ़ायदा झाकीर नाईकसारखे लोक घेत असतात. आपल्या धर्माची थोरवी ऐकायला माणसाला आवडत असते. आणि हे फ़क्त मुस्लिम धर्माच्या बाबतीतच खरे मानायचे कारण नाही. धर्मापुरताच हा विषय नसतो. कधी तो जातीविषयक आग्रह वा अभिमान असतो, तर कधी प्रांत, वंश किंवा भाषा, वर्ण यांच्याबद्दलही आग्रही श्रेष्ठत्वाचा गंड असतो. मग असे लोक एकत्र येतात, तेव्हा त्यांना आपल्या श्रेष्ठत्वाचे गुणगान ऐकायला खुप आवडत असते. त्यात ते रममाण होतात. तो मानवी स्वभावाचा एक उपजत गुण किंवा दुर्गुण आहे.

   सध्या अमेरिकन अवकाश स्थानकात वास्तव्य असलेली सुनिता विल्यम्स ही महिलाच घ्या. ती अमेरिकन आहे आणि मिश्रवंशिय आहे. तिचे वडील भारतीय वंशाचे तर आई अमेरिकन गौरवर्णिय आहे. त्यामुळे तिच्या नावातही भारतीयत्व आहे. पण तिने ख्रिश्चन अमेरिकनाशी विवाह केला असून तिचे नागरिकत्वही अमेरिकन आहे. पण तिने अंतराळात सर्वाधिक वास्तव्य करण्याचा विक्रम केला, त्याचे तिच्या जन्मभूमीला नाही इतके भारतीयांना कौतुक आहे. मग ती अंतराळात जाताना समोसा, गणेशाची मुर्ती आणि भगवत गीतेची प्रत घेऊन गेल्याचा करोडो भारतीयांना अभिमान वाटण्याचे कारण काय? अमेरिकेचे नागरिकत्व पत्करलेल्या कल्पना चावलाचेही तेच. आणि ही मानसिकता केवळ सामान्य अजाण भारतीयाची आहे, असेही मानायचे कारण नाही. बहुतेक वाहिन्यांवर या विषयाचे अवास्तव कौतुक चालू असते. त्याचे कारण काय असते? तर त्याचा दुरान्वये संबंध आपल्याशी जोडून अशी मंडळी आपले श्रेष्ठत्व सिद्ध करायला धडपडत असतात. त्यामागची चालना अनेकदा सामुहिक मानसिकता असते. कुठल्या तरी अभिमानाला धरून माणुस आपले दु:ख मागासलेपण, वेदना, यातना, दैन्य यावर मात करायला धडपडत असतो, त्याचाच हा अविष्कार असतो. खरे म्हणजे त्यामागचा आग्रह ही दुबळे वास्तव नाकारण्याची केविलवाणी धडपड असते. इतरेजन आपल्याला जितका कमी लेखतात, तसे आपण नगण्य नाही; हे सिद्ध करण्याचा तो प्रयास असतो. त्यातूनच हटवाद किंवा आग्रह प्रभावी होत असतो. पण तो मानवी स्वभावधर्म आहे. आपण सगळेच त्याचे कमीअधिक बळी असतो. प्रत्येकामधली ही वृत्ती कुठल्या मार्गाने डोके वर काढील याचा नेम नाही.

   सचिन तेंडूलकर याचे विक्रम झाल्यावर फ़टाके उडवणार्‍यात फ़क्त श्रीमंतच पुढे नसतात. अगदी गरीब वस्तीतही पोटाला चिमटा घेऊन काही उत्साही लोक फ़टाके फ़ोडतात. त्या विक्रमाने त्यांच्या दैन्यावस्थेमध्ये कुठलाही फ़रक पडणार नसतो. पण काही क्षण ती दयनिय अवस्था विसरण्याला तो उन्माद उपयोगी असतो. आपले कमीपण किंवा दु:ख विसरण्याची ती एक नशाच असते म्हणायला हरकत नाही. कधी ती धर्माचा मुखवटा लावून समोर येते, तर कधी राष्ट्रवाद म्हणून पुढे येते. आणि असे केवळ अडाणी अशिक्षित गरीबच करतात, असेही मानायचे कारण ना्ही. अत्यंत सुशिक्षित वा सुखवस्तू लोकही त्याच भावनेचे बळी झालेले दाखवता येतील. मात्र जोवर त्याला सामुहिक आक्रमक स्वरूप नसते, तोवर ती समस्या नसते. पण जेव्हा अशी मनोवृत्ती सामुहिक रुप धारण करून दुसर्‍या कुणावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करू लागते; तेव्हा समस्या सुरू होते. कारण ती सामुहिक वृत्ती दुसर्‍या समुहाला आव्हान देऊ लागते. आणि दुसर्‍या समुहाच्या सहनशक्ती किंवा संयमाच्या मर्यादा टिकण्य़ापर्यंतच गंभीर प्रसंग ओढवत नसतो. मुंबईत ११ ऑगस्ट रोजी जे झाले; त्यात दुसर्‍या समुहाच्या संयमाचा अंत बघितला गेला. तरी संयम टिकला म्हणूनच परिस्थिती आटोक्यात राहिली. पण झाले त्याच्या विरोधात मग राज ठाकरे यांना मिळालेला मोर्चारुप प्रतिसाद, दुसर्‍या समुहाची सावध प्रतिक्रिया होती. आपल्या आग्रही भूमिका किंवा श्रेष्ठत्वाच्या नादात आपण अन्य कुणाला दुखावतो आहोत, याचे भान राखले तर गडबड होत नाही. आणि त्याचे भान सुटले, मग परिस्थिती बिघडत असते. आपल्या देशातील वा अन्य देशात मुस्लिम मुस्लिमेतर यांच्यातल्या वाढत्या बेबनावाची म्हणूनच कारणमिमांसा होण्याची मला गरज वाटते. कारण जगभर हे प्रकार वाढत आहेत. आणि त्याला जर मुस्लिम आणि बिगर मुस्लिम असेच स्वरुप येत असेल, तर तो गंभीर विषय आहे. कारण जेव्हा त्याचे उलटे पडसाद उमटू लागतात, तेव्हा मग प्रत्येकाकडे संशयाने बघितले जात असते. असे संशयाने बघितले जाते म्हणून चीड येत असेल तर चुक नाही. पण असा संशय कुठून निर्माण होतो आणि त्याची कारणे तपासणेही अगत्याचे आहे. आणि ज्यांना परिणाम भोगावे लागतात, त्यांनी ते अगत्य अधिक दाखवलेच पाहिजे.

   एक धोका मोठा आहे आणि त्याची कोणी जाणिव करून देत नाही. तो धोका म्हणजे मुस्लिम एकाकी पडण्याचा. मुंबईतल्याच घटनेचे उदाहरण घ्या. त्याचे कोणते गांभिर्य आहे? इथे पोलिसांवरच हल्ला झालेला आहे. त्यातही महिला पोलिसांवर हल्ला झालेला आहे. त्यामुळे पोलिसांच्या मानसिकतेमध्ये कोणता फ़रक पडलेला असू शकतो; याचा कोणी तरी विचार केला आहे काय? जे काही त्या दिवशी झाले, त्यानंतर राजकीय सारवासारव झाली असली, तरी प्रत्यक्ष पोलिसकाम करणारा जो कर्मचारी आहे, त्याच्या भावना कोणी जाणून घेतल्या आहेत काय? आज त्या सामान्य पोलिसाच्या मनात मुस्लिमांबद्दल कोणत्या भावना आहेत, याची साधी चाचपणी तरी चर्चा रंगवणार्‍यांनी केली आहे काय? तो सामान्य पोलिस आता मुस्लिमांकडे कोणत्या नजरेने बघणार आहे? उघड कोणीही पोलिस बोलणार नाही, पण त्याच्या मनात अढी तयार झालेली नाही, असे कोणी म्हणू शकेल काय? प्रमोद तावडे नावाच्या शिपायाने राज ठाकरे यांच्या मोर्चानंतर व्यासपीठावर जाऊन त्यांना गुलाब पुष्प दिले, तो वैयक्तिक मामला होता, असेच म्हणायचे असेल तर गोष्टच वेगळी. रस्त्यावरच्या पोलिसाशी गप्पा मारता मारता विषय काढा, त्याला त्या तावडेचे कौतुक आहे. आणि असा एखाददुसरा पोलिस नाही. मग जेव्हा कधी भयंकर प्रसंग ओढवेल, तेव्हा तेच पोलिस खाते तटस्थपणे नि:पक्षपाती बंदोबस्त करू शकणार आहे काय?

   अगदी पत्रकार घ्या. वाहिन्यांच्या गाड्या जाळल्यावर आपला सेक्युलर मुखवटा टिकवण्यासाठी कोणी उघड टिप्पणी केली नाही. पण मी ही लेखमाला लिहितो आहे, त्या दरम्यान ज्या पत्रकारांनी माझ्याशी संपर्क साधला आणि प्रतिक्रिया दिल्या, त्या धक्कादायक आहेत. मी मुस्लिमांच्या विरोधात लिहितो आहे, अशा समजूतीने अनेकांनी माझे अभिनंदन केले, त्याचे मला आश्चर्य वाटले. कारण मी विरोधात लिहित नसून लपवले जाणारे दोष तेवढे दाखवतो आहे आणि ते दूर करावेत व त्याद्वारे दोन्ही समाजातले शंका-संशयाचे वातावरण निवळावे; अशीच माझी इच्छा आहे. आणि हे जेव्हा मी अशा सेक्युलर मुखवटे लावलेल्यांना सांगतो, तेव्हा ते चकीतच होतात. पण तो मुद्दा महत्वाचा नाही. अगदी सेक्युलर मुखवटा लावून वावरणारे आजचे बहुतांश लोकही ११ ऑगस्टच्या हरकतीने कमालीचे विचलित झालेले आहेत. म्हणजेच न बोलून दाखवलेली पोलिसांची जी मानसिकता आहे, तशीच बहुतांश पत्रकार व समाजाची आहे. आणि ती मानसिकताच मुस्लिमांसाठी मला मोठा धोका वाटतो. आणि त्या धोक्याचा विचार करायचा तर आपली अशी सामुहिक प्रतिमा कशामुळे तयार झाली आहे, त्याचा विचार मुस्लिम समाजात होण्याची गरज आहे. कारण कायदे-नियम कागदावर असतात. जेव्हा सामुहिक उन्माद उफ़ाळतो; तेव्हा कागदावरचे कायदे सुरक्षा द्यायला निकामी असतात. गुजरातमध्ये तेच झाले, हे विसरून चालणार नाही. मोदी यांच्या विरोधात राजकीय प्रचाराच्या मोहिमा चालवून ते संकट संपवता येणार नाही. कारण त्याच टाळाटाळीने मोदींना हवी तशी सामुहिक मानसिकता देशभरच्या बहुसंख्य हिंदूमध्ये निर्माण होत चालली आहे. दहा वर्षे उलटून गेल्यावरही गुजरातमध्ये ती मनोवृत्ती ओसरताना दिसत नाही.   ( क्रमश:)
भाग  ( ३४ )  १८/९/१२

रविवार, १६ सप्टेंबर, २०१२

डॉ. झाकीर नाईकचा बंदोबस्त कोणी करायचा?


   गेला आठवडाभर जगात अनेक देशांमध्ये मुस्लिम रस्त्यावर उतरले आहेत आणि मिळेल तेवढा धुमाकूळ घालत आहेत. लिबियामध्ये मुस्लिम जमावाने अमेरिकन मुत्सद्यासह तीन कर्मचार्‍यांना जाळून टाकले, वकिलात पेटवून दिली. इजिप्तमधल्या अमेरिकन वकिलातीवर हिंसक जमावाने हल्ला चढवला. त्याचीच पुनरावृत्ती येमेनमध्ये झाली. अन्यत्रही अशीच कमीअधिक प्रतिक्रिया उमटलेली आहे. अगदी आपल्या देशात काश्मिरमध्ये शुक्रवारचा नमाज संपल्यावर मुस्लिमांचा जमाव रस्त्यावर येऊन धुमाकुळ घालत होता हे वाहिन्यांच्या बातम्यांमधून जगाने पाहिले आहे. तामीळनाडूत चेन्नई येथे अमेरिकन वकीलातीवर मुस्लिम जमावाने हल्ला केल्याचे वृत्त आहे. त्याचे कारण एव्हाना सर्वश्रुत आहे. अमेरिकेत कोणीतरी एक माहितीपट काढून त्यात इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित महंमद पैगंबर यांची हेटाळणी व अवहेलना केली अशी बातमी आहे. तो नियमित चित्रपट नसून कोणी तरी एक व्हिडीओ तयार करून युट्यूब या इंटरनेट या संकेतस्थळवर टाकला आहे. काही लोकांनी तो बघितला आणि प्रेषिताची बदनामी म्हणून जगभर धुमाकुळ चालू झाला. मुस्लिमांच्या भावना दुखावणार्‍या त्या व्हिडीओचा निर्माता जीवाला घाबरला असून अज्ञातवासात गेला आहे. याबद्दल कोणी तार्किक चर्चा करायला तयार आहे काय? आणि प्रेषितांच्या बदनामीसाठी संपुर्ण अमेरिकेला व अमेरिकन नागरिकांना दोषी धरायचे काय? निदान त्या वर्तनाला कुठल्या मुस्लिम नेते वा संघटनांनी आक्षेप तरी घेतलेला दिसत नाही. म्हणजेच धर्मभावना किंवा आपल्या श्रद्धास्थानाला धक्का देण्याची कोणी हिंमत केली, तरी त्याला गुन्हा ठरवून थेट शिक्षा देण्याचा सामान्य मुस्लिमांना जन्मदत्त अधिकार आहे, अशीच ही भूमिका नाही काय? मग तोच न्याय व निकष उर्वरित कुठल्याही धर्माच्या अनुयायांनी लावायचा काय? समजा कोणी गणपती या हिंदू दैवताची अशीच हेटाळणी व अवहेलना करत असेल तर त्यावर हिंदूंनी काय करायचे? तो कोणी मुस्लिम असेल तर त्याच्या अशा कृत्यासाठी तमाम मुस्लिमांना गुन्हेगार मानून शिक्षा द्यायला सुरूवात करायची काय?

   याच लेखाच्या शेवटी मी मुद्दाम एक इंटरनेट दुवा दिलेला आहे. तो मुस्लिम वाचकांनी मुद्दाम बघावा. प्रामुख्याने ज्यांनी माझ्या लेखमालेबद्दल शंका उपस्थित केल्या व मला मुस्लिमांचे दोष दाखवणारा म्हणुन पक्षपाती ठरवण्याचा प्रयास केला, त्यांनी तो व्हिडीओ मुद्दाम बघावा. कारण ज्या संकेतस्थळा संबंधाने आज जगात एवढी हिंसा माजलेली आहे, त्याच युट्य़ूब या साईटवर मी दिलेला व्हिडीओ आहे आणि तो तमाम हिंदू धर्मियांच्या भावना दुखावणारा आहे. आणि असे काही केल्याने हिंदूंच्या भावना दुखावतील असे माहित असूनही तो प्रदर्शित करण्यात आलेला आहे. नुसता तो व्हिडीओ हिंदूंच्या भावना दुखावणारा नाही. तर अन्य मुस्लिमांनीही हिंदूंच्या भावना दुखावण्याचे त्यात आग्रहपुर्वक आवाहन करण्यात आलेले आहे. आपल्या कुणा हिंदू मित्र वा ग्राहकाच्या भावना दुखावतील म्हणुन तुम्ही तोंड उघडण्याची हिंमत करत नाही, म्हणजेच मुस्लिम असून तुम्ही अल्लाहवर प्रेम करत नाही; असे त्यात स्पष्ट शब्दात सुचवलेले आहे. म्हणजेच हिंदूंच्या धर्मभावना व श्रद्धा दुखावण्यासाठी प्रोत्साहन नव्हे चिथावणी त्यात दिलेली आहे. आणि ती चिथावणी देणारा माणूस डॉ. झाकीर नाईक नावाचा मुस्लिम विचारवंत आहे. आता त्यातून ज्यांच्या भावना दुखावतील त्या हिंदूंनी काय करावे अशी मुस्लिमांची अपेक्षा आहे? जगभरच्या मुस्लिमांनी प्रेषितांच्या बदनामीच्या व्हिडीओसाठी सर्वच अमेरिकनांना गुन्हेगार ठरवून शिक्षा देण्याचा पवित्रा घेतला, त्याप्रमाणे हिंदूंनी तमाम मुस्लिमांना गुन्हेगार मानायचे काय?

   इथे मी माझा कुठलाही नियम वा निकष लावलेला नाही. जो नियम वा न्याय मुस्लिम सांगतील तो मला मान्य आहे. जर त्यांची जगभरची हिंसा योग्यच असेल तर मग त्याचप्रमाणे जगभरच्या हिंदूंनी वागायचे काय? एका डॉ. झाकीर नाईकसाठी जगभरच्या मुस्लिमांना गुन्हेगार मानायचे काय? कारण उपरोक्त व्हिडीओमध्ये हिंदूंचे सर्वाधिक लोकप्रिय दैवत श्री गणेशाची विटंबना व हेटाळणी करण्यात आलेली आहे. झाकीर नाईक यांनीच ती अवहेलना केलेली नाही तर अन्य मुस्लिम बांधवांनी तशी गणपतीची विटंबना करावी; असे त्यात उघड आवाहन केलेले आहे. कोणा हिंदू मित्राने पूजेला किंवा गणपतीच्या सणाला आमंत्रित केले, तर त्याला कोणते प्रश्न विचारून हेटाळणी करावी, याचे ते नेमक्या शब्दातील आवाहन आहे. आणि ज्या तर्कबुद्धीने झाकीर ते करू बघतात, त्याच तर्कबुद्धीने कोणी श्रद्धावान मुस्लिमाला प्रेषित महंमद, अल्लाह किंवा गॅब्रियल या देवदूताबद्दल शंका विचारल्या तर चालेल काय? पूजेला किंवा गणपतीच्या सणाला जाऊन प्रसाद घेताना, असे प्रश्न हिंदू मित्राला विचारायला झाकीर सांगतात, तेव्हा त्याच्या भावना नेमक्या हळव्या असतानाच त्याची कळ काढायचे आवाहन करीत आहेत. आणि तसेच कोणा हिंदूने उलट प्रसंगी करायचे ठरवले तर? म्हणजे कोणा मुस्लिम मित्राने हिंदूला ईदच्या निमित्ताने आमंत्रित केले असेल तर अल्लाह किंवा धर्मविषयक तर्कशुद्ध प्रश्न विचारले तर? किती मुस्लिम ते प्रश्न तर्कबुद्धीने सहन करू शकतील? कारण हिंदू पुराण, वेद किंवा ख्रिश्चन बायबल जेवढे अनाकलनिय आहे, तेवढ्याच अनाकलनिय गोष्टी व कथा इस्लामी ग्रंथामध्येही शोधून दाखवता येतील. पण धर्मश्रद्धा या तर्क किंवा वैज्ञानिक निकषावर तपासल्या जाणार्‍या गोष्टी नसतात. म्हणुनच कोणी प्रेषितांवर चित्रपट काढला किंवा चित्र काढले तर मुस्लिम संतप्त होतात. अशा टिका किंवा विडंबनाचा तर्कशुद्ध वा वैचारिक मुकाबला केला जात नाही. मग त्याच पद्धतीने हिंदूंच्या दैवत किंवा श्रद्धांची तार्किक तपासणी ही हिंदूंच्या धर्मभावनांची विटंबनाच नाही काय? ती करण्याचा कुठला वैधानिक, घटनात्मक वा कायदेशीर अधिकार झाकीर नाईक यांना मुस्लिम म्हणून मिळाला आहे? आणि त्यांना तसा अधिकार असेल तर तो प्रत्येक भारतीय वा जगातल्या कुठल्याही माणसाला समानच आहे. त्यावर मुस्लिमांनी चिडून प्रतिक्रिया देण्याचे कारण नाही. आणि तसा अधिकार कोणालाच नसेल तर झाकीर नाईकना आवरायचे कोणी? त्याचा बंदोबस्त करायचा कोणी?

   मी धर्माच्या कुठल्याही विषयाला हात न घालता धर्मस्वातंत्र्याचा आधार घेऊन मुस्लिमांचे जगभर चाललेले वर्तन एवढ्याच मर्यादेत लिहितो आहे, आणि त्यात धर्माची कुठलीही अवहेलना होऊ नये, याची काळजी घेतली आहे. तरी काही मुस्लिम कमालीचे विचलित झाले आहेत. मग उघडपणे झाकिर नाईक हिंदूंच्या दैवताची इतकी अवहेलना करतात, तर हिंदूंनी आपल्या श्रद्धा जपण्यासाठी कोणाला शिक्षा द्यावी; तेही जाहिरपणे सांगावे. मला ज्यांनी फ़ोन करून चार खडे बोल ऐकवायचा जागरूकपणा दाखवला, त्यांनी या झाकीर नाईकसाठी हिंदूंनी कोणाला गुन्हेगार ठरवून शिक्षा करावी, तेही सांगायला तेवाढ्याच उत्साहात पुढे यावे. तुमच्या धर्मश्रद्धा नाजूक व प्रिय असतील तर दुसर्‍यांच्या पायदळी तुडवता कामा नयेत. आणि एका कोणा अमेरिकन निर्मात्यासाठी संपुर्ण अमेरिकनांना दोषी मानायचे, तर एका झाकीर नाईकसाठी सर्वच मुस्लिमांना गुन्हेगार मानावे लागेल, त्याचे काय? तर्क किंवा नि्यम हे दुधारी शस्त्र असते. त्याचे फ़ायदे असतात, तसेच तोटेही असतात. सुदैवाने हिंदू समाज तसा अतिरेकी विचार करत नाही, म्हणूनच एका झाकीर नाईकसाठी तो तमाम मुस्लिमाना आरोपीच्या पिंजर्‍यात उभा करत नाही. पण म्हणून मुस्लिमांनी झाकीर नाईकला सोडावे काय? एखादा कोणी नालायक असेल असेच म्हणायचे असेल, तर तो चित्रपट काढून युट्युबवर टाकणारा अमेरिकनही एखादाच आहे ना? त्याचा बंदोबस्त अमेरिकेने करावा नाहीतर अमेरिकेने त्याची कडू फ़ळे चाखावित, अशीच एकूण मुस्लिमांची भूमिका आहे ना? मग झाकीर नाईकचा बंदोबस्त मुस्लिमांनीच करायला नको का? नाही तर त्याची फ़ळे कोणाला भोगायची पाळी येईल?

   गुजरात-मोदी अशी टेप लावून उपयोग नसतो. तिथे कारस्थान करून मुस्लिमांवर हिंसक हल्ले झाले असे म्हणणेही सोयीचे असेल. पण हजारो लाखो हिंदूंचा जमाव त्यात सहभागी झाला, हे विसरता कामा नये. इतका मोठा जमाव मुठभर कारस्थानी लोकांच्या योजनेला बळी पडायला आणि हिंसाचार करायला इतका उतावळा का होता, याचा विचारच केला जाणार नाही काय? ते लाखो हजारो हिंदू दंगलखोर पशूसारखे मुस्लिमांवर तुटून पडले, त्याची कारणे कोणीच तपासणार नाही काय? चित्रकार फ़िदा हुसेन वा झाकीर नाईकसारखी मंडळी कायद्याचा आडोसा घेऊन सामान्य हिंदूंच्या भावनांशी जो खेळ करता असतात, त्यातून जी प्रक्षोभाची भावना निर्माण होत असते, ती लगेच पेट घेणारी नसते. पण ती स्फ़ोटक भावना तयार असते. तेव्हाच मग कोणी कारस्थान करणारा तिचा स्फ़ोट घडवून आणू शकतो. म्हणुन हिंदूंच्या भावनांशी खेळ करणार्‍या झाकीर नाईकसारख्या व्यक्तीचा बंदोबस्त मुस्लिम समाजातील बुजूर्गांनी व संस्थांनी केला पाहिजे. नाहीतर आज जे लिबिया, इजिप्त, येमेनमध्ये घडते आहे, त्याचीच प्रचिती गुजरातसारख्या घटनांमधून येत असते. मोदींना शिव्या मोजून उपयोग नाही. त्यांच्यासारख्याला पेटवता येईल अशी हिंदूंची स्फ़ोटक मानसिकता तयार करून देणार्‍या झाकीरचा बंदोबस्त मुस्लिमांनी करायला हवा आहे. किती मुस्लिम संघटनांनी त्यासाठी आजवर पावले उचलली आहेत?   ( क्रमश:)
व्हिडीओचा इंटरनेट दुवा-

http://www.youtube.com/watch?v=k1Clr_U8gXE&noredirect=1

भाग  ( ३३ )  १७/९/१२