शुक्रवार, २४ ऑगस्ट, २०१२

या छायाचित्रातला आवेश आणि रोख काय सांगतो?



   इथे मी मुद्दाम ११ ऑगस्ट २०१२ रोजी आझाद मैदान परिसरात काय घडले; त्याची दोन सूचक छायाचित्रे दिली आहेत. ती अनेक वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहेत आणि गेले दोन आठवडे ती छायाचित्रे इंटरनेटवर अनेक वेबसाईट वा सोशल नेटवर्कमधून फ़िरत अहेत. त्यातून मोठा संताप भारतीयांच्या मनात उफ़ाळला आहे. म्हणुन मग सरकारी पातळीवर ती छायाचित्रे काढून टाकण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पण ती छायाचित्रे ज्यांनी छापली त्यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ शकलेली नाही. कारण कारवाई करायची तर कुठल्या कायद्याच्या आधारे करायची, हा सरकार समोरचा प्रश्न आहे. कारण त्या छायाचित्रात जे दिसते ते घडलेले आहे, को्णी ते नाकारू शकत नाही. बुधवारी पोलिसांनी त्या चित्रात दिसणार्‍या दोन्ही आरोपींना अटक करून कोर्टासमोर हजरही केले आहे. आता त्यातून भावना भडकतात म्हणून ती चित्रे काढून टाकायची काय? ती काढून टाकली म्हणजे लोकांच्या भावना शांत होणार आहेत काय? उलट अशी चित्रे काढून टाकली तर त्यासंबंधी अफ़वा अधिक पसरतात व अशा अफ़वांना वजन मिळत असते. त्याचे परिणाम अधिक भीषण असतात. त्यापेक्षा भले लोकांच्या भावना प्रक्षुब्ध झाल्या तरी बेहत्तर. त्या भावना लोकांना जागवणार्‍या असतात. कारण त्या भावना राष्ट्रप्रेमाच्या असतात. अशा भावनांना सरकारने भिण्याचे कारण काय? शांतता म्हणजे गुंडांनी हैदोस घालणे व कायदेभिरू लोकांनी भयभीत होऊन शांत बसणे नसते. मुळात सरकारने कायद्याच्या राज्याचा अर्थ समजून घेण्याची गरज आहे. मगच आझाद मैदान परिसरात धुडगुस घालणार्‍यांची पोलिसांवर हात उचलण्याची हिंमत का झाली; ते सरकारच्या लक्षात येऊ शकेल. मगच अशा प्रकारांना पायबंद घालणे शक्य होईल.

   पहिली गोष्ट म्हणजे लोकशाहीत कायदा ही सामान्य लोकांची अर्थात जनतेची अमानत असते. तो कायद्याचा अधिकार लोकांनीच सरकार चालवणार्‍यांकडे सोपवलेला असतो. जसे पालक आपले मुल शाळेत घालतात किंवा आपले मुल कुणाकडे संभाळायला देतात, तेवढीच सरकारची कायदेविषयक जबाबदारी असते. कायदा ही सरकारची मालमत्ता नसते, की विशेष अधिकार नसतो. म्हणुनच जोपर्यंत सामान्य जनता कायद्याचा आदर करते किंवा त्या कायद्याच्या समर्थनार्थ उभी रहाते; तोपर्यंतच कायद्याची हुकूमत चालू शकते. पोलिस हे सरकारचे म्हणजे प्रत्यक्षात कायद्याचेच अंमलदार असतात. त्यांची ताकद गणवेशात किंवा पुस्तकात छापलेल्या कायद्याच्या शब्दात नसते; तर त्यांच्या पाठीशी जनतेच्या ज्या सदिच्छा उभ्या असतात, त्यातच पोलिसांची शक्ती सामावलेली असते. आज त्या सदिच्छा सरकारने गमावल्या आहेत. म्हणूनच आझाद मैदान घटनेत पोलिसांना गुंडानी मारले व महिला पोलिसांचा विनयभंग करण्यापर्यंत मजल मारली आहे. म्हणून तर राज ठाकरे यांचा मोर्चा निघाला, त्याला धमकावणार्‍या पोलिस आयुक्तांना तो मोर्चा निघण्यापुर्वी अडवता आला नाही. कारण ती नैतिक ताकद गृहमंत्री आबा पाटिल असोत, की पोलिस आयुक्त असोत दोघेही गमावून बसले आहेत. म्हणुनच मुठभर गुंड पोलिसांना झोडपुन काढू शकले. हातात हत्यारे असूनही पोलिस काही करू शकले नाहीत. आणि त्यांना फ़ुकाच्या धमक्या देऊन राजचा मोर्चा अडवता आलेला नाही. तो संपल्यावर नोटिसा देण्याला काय अर्थ आहे. त्याला कागदी घोडे नाचवणे म्हणतात.

   मग अशा सरकारने अशी प्रक्षोभक वाटणारी छायाचित्रे बंदी घालून काय साधणार आहे? ती चित्रे इथे मुद्दाम दिली आहेत. ती लोकांच्या भावनांना चिथावणी देण्यासाठी अजिबात नाही. तर त्या दोन्ही चित्रातला आवेश आणि रोख सामान्य लोकांना समजावा म्हणुन दिली आहेत. जे दोन्ही गुंड त्या अमर जवान स्मारकाची मोडतोड करत आहेत किंवा त्याची विटंबना करत आहेत, त्यांच्या अंगात संचारलेला आवेश किंवा जोश आपण स्पष्टपणे बघू शकतो ना? तो आवेश कुठून व कशासाठी आलेला आहे? त्यातून त्या स्मारकाबद्दलचा राग-संताप किंवा तिटकारा बघण्यासाठी कुणाला भिंग घेण्याची गरज आहे काय? या गुंडांना त्या स्मारकाचा इतका तिटकारा कशासाठी आहे? ते स्मारक कुठल्या धर्माचे प्रतिक नाही, की कुठल्या जमातीचे श्रद्धास्थान सुद्धा नाही. ते इस्लामिक भावना दुखावणारे सुद्धा नाही. मग त्यांनी अशा लाथा मारून किंवा आवेशात ते तोडण्याचे कारण काय? कोणी कुठे मंदिर पाडले वा मशीद पाडली; चर्चला आग लावली तर समजू शकते. त्याला धार्मिक उन्माद म्हणता येईल. पण ज्या स्मारकाचा कुठल्याही धार्मिक विषयाशी संबंधच ना्ही त्याची मो्डतोड किंवा विटंबना इतक्या त्वेषाने कशासाठी? ज्या जवानांनी आपल्या मातृभूमीसाठी आपले सर्वस्व अर्पण केले, जे देशासाठी शहिद झाले, त्यांच्या स्मरणार्थ उभे केलेले ते स्मारक आहे ना? त्याच्यावर हल्ला कशासाठी? आणि त्यात इतका द्वेषमूलक आवेश कशासाठी? ते नाटक नाही, की हुल्लड नाही. कुठले तरी महान पराक्रमी कृत्य आपण करीत आहोत; असा एकूण अविर्भाव त्या दोघांमध्ये दिसत नाही काय? तो आवेश आपल्याला काय सांगतो आहे? त्या दोघांना अशा कृतीमधून कोणता संदेश द्यायचा आहे? ते काय सुचवू पहात आहेत?

   ते स्मारक देशाचे प्रतिक आहे. ज्या राज्यघटनेने भारताला सार्वभौम राष्ट्र घोषित केले, त्याच सार्वभौम भारताचे ते प्रतिक आहे. जे त्या देश किंवा राष्ट्रासाठी शहिद झाले, त्यांचे स्मारक म्हणजे संपुर्ण देशाचा अभिमान असतो. आणि त्याची पुर्ण जाणीव त्याची मोडतोड करणार्‍यांना आहे. त्यावर लाथा मारल्या आणि त्याची मोडतोड केली, विटंबना केली तर आपण प्रत्येक भारतीयाच्या भावना एका फ़टक्यात पायदळी तुडवतो; हे त्या दोघांना पुर्णपणे कळते आहे. आणि त्याच हेतूने त्यांनी हे कृत्य केलेले आहे. आणि त्याच चिडीतून लोक परवा राज ठाकरे यांच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी झाले. कुठल्याही भारतीयाला संताप येण्यासारखाच तो प्रकार आहे. त्या संतापाला धर्म नव्हता किंवा असू शकत नाही. तसेच तो संताप कुणा धर्माच्याही विरुद्ध नव्हता. ज्यांनी आमच्या भारतीय असण्यावर लाथ मारली, त्यांच्या विरुद्धचा तो संताप होता. आणि जो कोणी असे करू शकतो, तो मुळात भारतीय असूच शकत नाही. भले मग त्याच्याकडे कुठले रेशनकार्ड असो की पासपोर्ट असो, त्याला भारतीय म्हणताच येत नाही. ज्याला आपल्या भारतीय असण्याचा अभिमान नाही, तोच असे कृत्य करू शकतो. ज्याला आपल्या भारतीय असण्याची लाज वाटते, तोच असे कृत्य करू शकतो. आणि म्हणूनच ती छायाचित्रे मी वाचकांना बारकाईने बघण्याचा आग्रह करतो आहे. नुसता राग येऊन चालणार नाही, तर त्यामागची प्रवृत्ती ओळखली पाहिजे. कारण त्या दोघांनी फ़क्त त्या स्मारकला लाथ मारलेली नाही, त्यांनी त्या स्मारकाची नुसती मोडतोड केलेली नाही, तर त्यांनी आपले जे लाखो जवान सीमेवर थंडीवार्‍यात देशाच्या सुरक्षेसाठी प्राण पणास लावत उभे आहेत, त्यांच्या शौर्यावरच लाथ मारली आहे. या देशाच्या पुरुषार्थावरच लाथ मारली आहे. त्यांनी व त्यांच्यासारख्यांना त्या मैदानावर आणणार्‍यांनी देशाच्या अभिमान, स्वाभिमानालाच लाथ मारली आहे. तुमच्याआमच्या भारतीय असण्यालाच लाथ मारली आहे.

   आजवर त्या घटनेबद्दल खुप काही बोलले गेले आहे, लिहिले गेले आहे. पण कोणी गंभीरपणे हे काय आहे व कशासाठी आहे, त्याचे विवरण केले आहे काय? पोलिस गाड्या जाळणे किंवा वाहिन्यांच्या गाड्यांवरचा हल्ला एकवेळ माफ़ करता येईल. अगदी मंदिर-मशीद फ़ोडण्या पाडण्याचे प्रकारही सोसता येतील. पण अमर जवान स्मारकाची मोडतोड किंवा विटंबना, ही भारतीय अस्मितेला, अस्तित्वाला व पुरूषार्थालाच मारलेली लाथ आहे. ज्यांनी हे पाप केले त्यांना तर आपण फ़ार मोठे पुण्य करीत आहोत, असेच वाटत होते आणि त्यांचा तो आवेश लपत नाही. म्हणुनच तो आवेश किंवा त्यामागची मानसिकता समजून घेण्याची गरज अहे. कारण कालपर्यंत असे प्रकार काश्मिरमध्ये होत आले, आता ते मुंबईपर्यंत येऊन पोहोचले आहेत. स्वातंत्र्यदिनी श्रीनगरमध्ये तिरंगा जाळला अशा बातम्या आपल्याला नव्या नाहीत. आता ते तुमच्याआमच्या दारापर्यंत येऊन पोहोचले आहे. आणि त्याचा सज्जड पुरावा त्या दोघांनी त्या छायाचित्रातून दिलेला आहे. कश्मिरचे हुर्रियतवाले त्यापेक्षा वेगळे काय म्हणतात? त्यांनाही आपण भारतीय नाही, असे सांगण्यात व दाखवण्यात अभिमानच वाटतो. या दोघांचे कृत्य कुठला वेगळा साक्षात्कार आहे काय? काश्मिर सोडाच आम्हाला मुंबईतही भारत नावाचे राष्ट्र मान्य नाही, असेच ते दोघे सांगत नाहीत काय? ( क्रमश:)
  भाग  ( १० ) २५/८/१२

८ टिप्पण्या:

  1. tyanchyavar konatya kayadyane khatala chalavanar? Sarvajanik Malmatteche nuksan ki deshdroha?

    उत्तर द्याहटवा
  2. ह्या छायाचित्रातील रोख आणि आवेश काहीही नवीन संगीत नाही..तो तेच सांगतो जी जगातल्या मुस्लिमांची मानसिकता आहे..... "" "इस्लाम (आणि फक्त इस्लाम) हा त्यांच्या उपकरकर्त्या मातृभूमीहून श्रेष्ठ आहे,.."""" मुस्लिमांच्या कृत्घ्न मानसिकतेचे ते द्योतक आहे.आश्रय देणार्‍य प्रत्येक देशाचे राष्ट्रध्वज जाळ्तांना आणि अल्ला हू अकबर चे नारे देतान्न आपल्याला असे कित्येक देशद्रोहि भेटतील.

    उत्तर द्याहटवा
  3. Ya lokanvar deshdrohacha khatla chalavnyat yava. Jyanni melava ayojit kela tyanchavar khatle chalvavet ani takladu kalme lavu nayet.

    Nishedh vyakt karnyache kaydeshir marg ahet ani lokshahi madhe nemast marganech nishedh nondvaycha asto.

    Police jamati var saglyanchach rag asto. Informer aslelya gundachya pratyek gundgiri kade kanadola karnare ani PUC nasla ki nadnare, Gundachya virudhha compaint deun hi karvai na karnare police kunala awadtil?

    Pan ladies police barobar je kahi zale te nishiddha ahe ani te krutya karnarya pratyekala ani chithavni deryala 302 lava. Dukane fodnyache karan navte, media var halla karayche karan navte, ani shahidanchya smarkavar halle karne tyanchi bandhilki darshavte.

    Ibrahim shaikh sarkhe netyavar karvai honar nahi karan congress ani rashtravadi congress sarkya nakli secular pakshanna tyanchach adhar ahe.


    Bhau jata jata ek sangto, Me Hajj karnyas gele hoto tevachya anubhava varun sangto, Ya makdanni tithe fakt policavar hath uchalla asta na tar kuthe gayab zale aste patta hi lagla nasta. Rajaviruddha ek akhshar hi bollat tar gayab. Mi tithe aikle hote ki ek atyant unch gharanyala mulga pan osama bin laden chya favour madhe ghoshna dili mhanun tyala uchalla gela mag kuthe gela tyacha patta hi nahi lagla.

    उत्तर द्याहटवा
  4. बांगलादेशातील मुसलमानांचे बौद्धांवर आक्रमण
    ‘मुसलमान-बौद्ध भाईभाई’, असा नारा देणार्‍या भारतातील बौद्ध नेत्यांना याविषयी काय म्हणायचे आहे ?
    फेसबूकवरून पैगंबर यांचा अवमान केल्याचे प्रकरण
    कुठे महंमद पैगंबर यांचा फेसबूकवरून अवमान करण्यात आल्यावर कायदा हातात घेणारे धर्मप्रेमी मुसलमान, तर कुठे फेसबूकवरून ऐन गणेशोत्सवात श्री गणेशाचा अवमान करणार्‍या डॉ. झाकीर नाईक यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने तक्रारही दाखल न करणारे धर्मद्रोही जन्महिंदू !
    कोक्स बाझार (बांगलादेश) - एका बौद्धाने इस्लामचा अवमान केल्याचे सांगत १०० हून अधिक बांगलादेशी मुसलमानांनी रस्त्यावर उतरून ४ बुद्ध विहार आणि १५ बौद्धांची घरे जाळली. (मुसलमानांच्या लेखी अन्य धर्मीय काफीरच असल्याने ते असे कृत्य करतात, हे त्यांना उमजेल, तो सुदिन ! - संपादक) या घटनेनंतर तेथे जमावबंदीचे आदेश देण्यात आला आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. https://www.facebook.com/photo.php?fbid=471543512863611&set=a.179230432094922.43874.100000238983096&type=1&theater



    bhau ya khalachya commentt vaacha, dokha bhaNabhaNUn jata, muslim tarun kaay vichar karat ahet te samajatay.

    उत्तर द्याहटवा
  6. ऑस्ट्रेलियन प्रधानमंत्री
    जूलिया गिलार्ड को दुनिया की रानी बना देना चाहिए !!


    इस महिला प्रधानमंत्री ने
    जो कहा है, उस बात को कहने के लिए बड़ा साहस और आत्मविश्वास चाहिए !

    पूरी दुनिया के सब देशों में ऐसे ही लीडर होने चाहिए !!

    वे कहती हैं :-

    "मुस्लिम, जो इस्लामिक शरिया क़ानून चाहते हैं, उन्हें बुधवार तक ऑस्ट्रेलिया से बाहर चले जाना चाहिये।
    क्योंकि, ऑस्ट्रेलिया देश के कट्टर मुसलमानो को आतंकवादी समझता है।

    ऑस्ट्रेलिया के हर एक मस्जिद की जाँच होगी और मुस्लिम इस जाँच में हमे सहयोग दें ।

    जो बाहर से उनके देश मे आए हैं, उन्हें ऑस्ट्रेलिया में रहने के लिए अपने आप को बदलना होगा और ना कि ऑस्ट्रेलियन लोगो को ......

    अगर नहीं होता है तो मुसलमान मुल्क छोड़ सकते हैं । कुछ ऑस्ट्रेलियन चिंतित है ये सोच कर कि क्या हम किसी धर्म का अपमान
    तो नहीं कर रहे ..

    पर मैं ऑस्ट्रेलियन लोगों को विश्वास देती हूँ कि हम जो भी कर रहे है वो सिर्फ़ ऑस्ट्रेलिया के लोगों के हित में कर रहे हैं ।
    हम यहाँ इंग्लिश बोलते है ना कि अरब ..

    इसलिए अगर इस देश में
    रहना होगा तो आपको इंग्लिश सीखनी ही होगी ।

    ऑस्ट्रेलिया में हम JESUS को भगवान मानते हैं, हम भगवान को मानते है ! हम सिर्फ़ हमारे CHRISTIAN-RELIGION को मानते है और किसी धर्म को नहीं, इसका यह मतलब नहीं कि हम सांप्रदायिक है !

    इसलिए हमारे यहां भगवान की तस्वीर और धर्म ग्रंथ सब जगह होते हैं !

    अगर आपको इस बात से
    आपत्ति है तो दुनिया में आप ऑस्ट्रेलिया छोड़ कर,
    कहीं भी जा सकते हैं ।

    ऑस्ट्रेलिया हमारा मुल्क है,
    हमारी धरती है, और हमारी सभ्यता है ।

    हम आपके धर्म को नहीं मानते, पर आपकी भावना को मानते हैं !

    इसलिए अगर आपको नमाज़ पढ़नी है तो ध्वनि प्रदूषण ना करें ....

    हमारे ऑफिस, स्कूल
    या सार्वजनिक जगहों में नमाज़ बिल्कुल ना पढ़ें !

    अपने घरों में या मस्जिद में शांति से नमाज़ पढ़ें । जिस से हमें कोई तकलीफ़ ना हो ।

    अगर आपको हमारे ध्वज से, राष्ट्रीय गीत से, हमारे धर्म से या फिर हमारे रहन-सहन से कोई भी शिकायत है, तो आप अभी इसी वक़्त ऑस्ट्रेलिया छोड़ दें " ।

    जूलिया गिलार्ड -
    प्रधानमंत्री ऑस्ट्रेलिया


    सीखो भारत के नेताओं ..
    कुछ सीखो इनसे....

    मित्रों,
    सच्ची देशभक्ति ये हैं

    🇮🇳भारत माता की जय ।

    उत्तर द्याहटवा
  7. भाऊ उत्तम लेख मी आज प्रथमच वाचला धन्यवाद। शेयर करत आहे

    उत्तर द्याहटवा