बुधवार, ५ सप्टेंबर, २०१२

संघ परिवारामुळे मुस्लिम मुली गुणवत्ता यादीत


   धक्का बसला ना हे शिर्षक वाचून? सतत आपल्यावर सेक्युलर माध्यमांनी इतक्या खोट्या बातम्या व अपप्रचाराचा भडिमार केलेला असतो, की इवल्याशा सत्यावरही विश्वास ठेवणे अशक्य होऊन जाते, तशीच ही घटना आहे आणि ही कुठे दूर अन्य प्रांतातली नाही. आपल्या महाराष्ट्रातली आहे, पुण्यातली आहे. पण तिथेच वास्तव्य करणार्‍या आणि सतत संघ परिवाराच्या मुस्लिम द्वेषाच्या कपोलकल्पित कहाण्या रंगवून सांगणार्‍या डॉ. कुमार सप्तर्षी किंवा डॉ. रत्नाकर महाजन, प्रकाश बाळ अशा वाहिन्यांवरच्या राजकीय अभ्यासकांना त्यांचा थांगपत्ता नसतो. कारण त्यांना जे बघायचे नसते, त्याकडे ते पाठ फ़िरवत असतात आणि अगदी ते सत्य अट्टाहास करून समोर आलेच; तर हे असे सेक्युलर गच्च डोळे मिटून घेत असतात. त्यांची अवस्था प्रोटेस्टंट पंथाचा संस्थापक व पोपचा कट्टर विरोधक मार्टिन ल्युथरसारखी आहे. आपल्या समजूतीमध्ये मशगूल रहाणेच त्यांना सुरक्षित वाटत असते. मग अशी माणसे आपल्या भूमिका किंवा समजूतींना धक्का लागेल या भयाने जगाकडे बघायलाही घाबरत असतात. ल्युथर म्हणतो,

"ख्रिस्ताच्या शिकवणुकीतून जे जग आमच्यासमोर मांडले गेले आहे त्या जगावर माझा इतका दृढ विश्वास आहे, की त्यातील शब्दन शब्दाला आपण घट्ट धरून रहायला हवे असेच मी म्हणेन. त्यामुळे उद्या स्वर्गातील सर्वच्या सर्व देवदूत जरी स्वर्गातून खाली उतरून नव्या कराराच्या विरुद्ध मला काही सांगू लागले तरी मी त्यातील एकाही अक्षराचा विश्वास धरणार नाही. उलट त्यांचे शब्द कानांनी ऐकावे लागू नयेत म्हणून मी कान आणि डोळे बंद करून घेईन."

   आपल्याकडले तमाम तथाकथित सेक्युलर शहाणे, पत्रकार वा राजकारणी नेमके त्याच व्याख्येत बसणारे आढळतील. त्यांना सत्य गवसल्याचा इतका प्रचंड भ्रम झालेला आहे, की ते आपल्या भ्रामक जगातून बाहेर पडून समोर दिसणारे सत्य बघायलाही घाबरतात अशी आजची परिस्थिती आहे. मग मी ज्या घडलेल्या घटना सांगतो, त्याकडे ते डोळसपणे कसे बघू शकती्ल? म्हणुनच ज्या पुण्यात व महाराष्ट्रात सप्तर्षीसारखे सेक्युलर शहाणे वास्तव्य करतात, तिथल्या घटनांना घडामोडींना ते साफ़ पारखे असतात. अन्यथा पुण्याच्या अंग्लो उर्दू हायस्कुलच्या मुस्लिम मुली शालांत परिक्षेच्या गुणवत्ता यादीत कोणाच्या मदतीने पोहोचू शकल्या, त्याची माहिती त्यांनी मिळवली असती आणि अगत्याने इतरांना सांगितली असती. पण तसे त्यांनी कधीच केलेले नाही. मोठ्या अगत्याने गुजरातच्या दंगलीत मुस्लिमांवर अन्याय झाल्याचे, तिथे न जाताच सांगणारे हे लोक; जिथे वास्तव्य करतात तिथेच संघ परिवाराच्या मदतीने मुस्लिम मुलींची झालेली प्रगती का बघू शकले नाहीत? पण त्यांना न दिसलेले व त्या सेक्युलर दिवट्य़ांना अशक्य वाटलेले सत्य; पी. ए. इनामदार हा सुबुद्ध मुस्लिम कार्यकर्ता बघू शकला म्हणून एक चमत्कार शक्य झाला आहे.

   तीन दशकांपुर्वी इनामदार यांनी पुण्यातल्या हाजी गुलाम मोहंमद आझम एजुकेशनल ट्रस्ट या संस्थेची सुत्रे हाती घेतल्यावर, सर्वात आधी मुस्लिमांवर अल्पसंख्यांक म्हणून अन्याय होतो, असली पोपटपंची करण्यापेक्षा मुस्लिमांना शिक्षणातून विकासाकडे घेऊन जाण्याचा चंग बांधला. त्यासाठी त्यांनी आधी आपल्या संस्थेतील विद्यार्थी व विद्यार्थीनी यांच्याशी संवाद साधला. तेवढेच नाही तर एकूणच समाजातील म्हणजे कुठल्याही धर्माशी संबंधित शैक्षणिक कार्यकर्ते, संस्था यांच्याशी संपर्क साधून आपल्या ध्येयपुर्तीसाठी काय मदत मिळु शकते याचेही प्रयत्न केले होते. आणि त्यासाठी आपल्या मुस्लिम समाजातील मुलींच्या बौद्धिक शैक्षणिक यशासाठी त्यांनी त्यांच्यासमोर मांडलेली भूमिका अस्सल भारतीय होती व सलोखा निर्माण करणारी होती. भारतीय समाजाच्या सांस्कृतिक ओळख व वारशाची त्यांनी मुस्लिम विद्यार्थ्यांना जी जाणिव निर्माण करून दिली, त्यातूनच पुढली प्रगती यशस्वी ठरू शकली आहे. भारताकडे खुप जुना ज्ञानाचा वारसा आहे आणि त्याचा आरंभ वेदांच्या अलौकीक ज्ञानापासून होतो. त्याच वारशाचे जतन करून बुद्धीकौशल्य प्राप्त करता येईल, हे त्यांनी मुलांना असे पटवून दिले. मगकेलेल्या प्रयत्नांनी लागोपाठ चार वर्षे त्या शाळेतल्या मुली शालांत परिक्षेत गुणवत्ता यादीत मोठीच बाजी मारू शकल्या. १९८३ सालात इनामदार यांनी संस्थेची सुत्रे हाती घेऊन आपले प्रयत्न सुरू केले आणि त्याची फ़ळे पुढे आठ नऊ वर्षांनी आलेली दिसली. १९९४ सालात झालेल्या शालांत परिक्षेत त्यांच्या शाळेची मुलगी गुणवत्ता यादीत पोहोचली. १९९७ सालात तर याच संस्थेच्या सोलापुर शाखेतील तनवीर मणीयार हा विद्यार्थी संपुर्ण पुणे बोर्डामध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. आपल्याकडे गुणवत्ता असेल तर आपल्याला कोणी अडवू शकत नाही आणि आपल्या प्रगतीमध्ये कोणी अडसर बनू शकत नाही, हा आत्मविश्वास इनामदार यांनी त्या मुस्लिम मुलांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये निर्माण केला. पुढे तर याच तनवीर मणियारने इंजिनियरिंग परिक्षेत सुवर्णपदक मिळवले. आणि नंतरच्या काळात उर्दू भाषिक व मुस्लिम मुले नियमितपणे शालांत परिक्षेसह अन्य स्पर्धात्मक परिक्षेत यश मिळवू लागली. पण हे कोणामुळे शक्य झाले, त्याच्या बातम्या कुठल्याही सेक्युलर माध्यमांनी दिलेल्या नाहीत. सेक्युलर शहाण्यांनी लोकांसमोर येऊ दिलेल्या नाहीत. आणि अशा बातम्या निखिल वा्गळे किंवा प्रकाश बाळ यांच्यासारखे सेक्युलर पत्रकार कायम दडपत असतात. आणि ही बातमी देणारी एकमेव पत्रकार सुद्धा सेक्युलरच आहे. पण ती बातमी देताना तिनेही ती बातमी लोकांचे लक्ष वेधून घेणारी ठरू नये याची पुरेपुर काळजी घेतली होती.

   तिकडे दुर दक्षिण भारतातूनप्रसिद्ध होणार्‍या "द हिंदू" नामक इंग्रजी दैनिकात १३ ऑगस्ट २००३ रोजी ही बातमी प्रसिद्ध झाली होती. ज्योती पुनवानी नामक सेक्युलर गोतावळ्यात कायम घुटमळणार्‍या या पत्रकार आहेत. त्यानीच ही बातमी दिली. त्या निमित्ताने इनामदार यांच्याशी पुनवानी बोलल्या. तर आपल्या प्रयासाची माहिती देताना इनामदारांनी अगत्याने उल्लेख केला तो संघ परिवाराचा. मुस्लिम मुलींच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी इनामदार यांनी चालवलेल्या प्रयत्नात मोलाची मदत कोणी केली, त्याचा उल्लेख त्यांनीच अगत्याने केलेला आहे. हिंदूच्या मोठ्या मदतीशिवाय या मुस्लिम मुलांना एवढा मोठा पल्ला गाठता आला नसता, असेच त्यांनी सांगितले आहे. आणि ते हिंदू म्हणजे सेक्युलर पोपटपंची करणारे वागळे, बाळ, सप्तर्षी किंवा मुलायम लालू इत्यादी नाहीत; तर ते हिंदू म्हणजे ज्यांच्यावर कट्टर हिंदुत्वाचा सातत्याने आक्षेप घेतला जातो, असे हिंदू आहेत. पुनवानी यांना इनामदार सांगतात, या प्रयत्नात संघ परिवारातर्फ़े चालवल्या जाणार्‍या शाळांमधील चांगले शिक्षक आमंत्रण दिले मग अगत्याने पाहुणे शिक्षक म्हणुन त्यांच्या शाळेत आले आणि त्यांनी गुणी विद्यार्थ्यांना मन:पुर्वक शिकवले. म्हणूनच हे शक्य झाले. आणखी एक बाब महत्वाची. जेव्हा जेव्हा या मुस्लिम मुलींनी गुणवत्ता या्दीत मजल मारली, तेव्हा त्यांचा सर्वात पहिला सत्कार तिथल्या शिवसेना शाखेतर्फ़े झाल्याचाही उल्लेख इनामदार अगत्याने करतात. मुद्दा इतकाच, की अशा बातम्या स्वत:ला सेक्युलर म्हणवणार्‍या माध्यमांना का मिळत नाहीत. हिंदू मुस्लिमातील तेढ किंवा भांडण दंगलीच्या बातम्या रंगवून सांगणार्‍या माध्यमांना अशा गोष्टी दिसत नाहीत, असेही म्हणता येत नाही. कारण ही बातमी देणार्‍या ज्योती पुनवानी स्वत:च सेक्युलर गोतावळ्यात कायम बागडत असतात. मग त्यांनी ही महाराष्ट्र पुण्यातली बातमी मुंबईच्या कुठल्या वृत्तपत्रात येण्यासाठी प्रयास का केले नाहीत?

   घटना व बातमी पुणे महाराष्ट्रातली आणि छापून येते दक्षिणेतल्या इंग्रजी वृत्तपत्रात आणि इथे अहोरात्र सेक्युलर टेंभा मिरवणार्‍या पत्रकारांना ती बातमी का द्यावीशी वाटली नाही? मराठीत तर सेक्युलर असणे म्हणजेच पत्रकार अशी एक कडवी अंधश्रद्धा आहे. मग सेक्युलर असणे म्हणजे काय असा प्रश्न पडतो. मुस्लिमांच्या मनात हिंदू किंवा हिंदुत्व मानणार्‍या संस्था संघटनांबद्दल शंका, संशय व द्वेष भावना निर्माण करणे; म्हणजे सेक्युलॅरिझम असतो काय? नसेल तर मग अशी बातमी का लपवली व झाकली जात असते? संघ परिवाराने मुस्लिमांना सहकार्य केले वा मदत केली, तर लपवाछपवी कशाला? की सेक्युलर असणे म्हणजे हिंदूंचा द्वेष करणे आहे? नसेल तर हे तमाम सेक्युलर शहाणे अशी माहिती का मिळवत नाहीत आणि ती लोकांसमोर का मांडत नाहीत? की त्यामुळे हिंदू मुस्लिमातील संशयाचे वातावरण निवळून त्यांच्यात विश्वास, प्रेम, आपुलकी व बंधूभाव निर्माण होण्यास हातभार लागेल आणि त्यांच्यातल्या दंगली हिंसाचार थांबेल, अशा भयाने सेक्युलर मंडळींना पछाडले आहे? आजकाल सेक्युलर म्हणून मिरवतात यांना हिंदू मुस्लिम विश्वासाची भिती का वाटत असते? का भेडसावत असते? संघाचा विद्रुप चेहरा रंगवण्यात धन्यता मानणार्‍या सेक्युलर माध्यमांनी हिंदूत्ववादी संघानेच मुस्लिम मुलींची गुणवत्ता वाढवण्यात सिंहाचा वाटा उचलला हे सत्य लपवायचे कारणच काय?  ( क्रमश:)
भाग  ( २१ )   ५/९/१२

१२ टिप्पण्या:

  1. भाऊ तुम्ही लिहीलेले सत्य असेल पण आझम संस्था तिथे काम करत असतानामी आतून पाहीलेली आहे. हे मी स्वत: अनुभवलेलं आहे की तिथे सगळ्याच विद्यार्थ्यांकडून (मुस्लीम, ख्रिस्ती, हिंदू) प्रवेशाच्या वेळी भरमसाठ डोनेशन (ब्लॅक मधे) घेतले जाते. शैक्षणिक वर्षाच्या शेवटी एक मिटींग घेऊन मार्क्सचं सेटींग केलं जातं आणि रिझल्ट पहीजे तसा लावला जातो. अ‍ॅंग्लो उर्दु शाळा बरी असेल किंवा ठराविक हुशार मुलांना (लातूर पॅटर्न प्रमाणे) ट्रेनींग देत असतील. पण एकूण क्वालीटीची बोंबच आहे. मायनॉरीटी कॉलेज किंवा शाळा म्हणून अनेक गोष्टी (चुकीच्या) दुर्लक्षील्या जातात. ह्याच तथाकथीत सेक्युलर वाल्यांची तिथे भाषणे आयोजित केली जातात. निवडणुका जवळ आल्या की ह्या भाषणांना उधाण येते. गुजरात मधील २००२ च्या दंगलींची सीडी महाविद्यालयांतून दाखवल्या जातात. हिंदू मुस्लीमांवर कसे अत्याचार करतात हे दाखवले जाते. त्यावर भाषणे होतात. जर्मन बेकरी स्फोट प्रकरणात अबेदा बाईंच्या भावाच्या मुलालाच अटक झाली होती. कोंढव्यातील त्याच्या फ्लॅट मधे इंडियन मुजाहिदीन च्या बैठकी होत असत. आझम कॅम्पस म्हणजे मिनी पाकीस्तान आहे.

    उत्तर द्याहटवा
  2. तुमचे मत मी खोडून काढत नाही. कारण तसा पुरावा माझ्याकडे नाही.पण माझ्या लिखाणाचा विषय दोन्ही समाजातील लोकांनी समजूतदारपणे एकत्र आल्यास काय होऊ शकते इतकाच मर्यादित आहे. त्यामुळेच हे सेक्युलर मीडियाने लपवलेले सौहार्द पुढे आणायचा मी प्रयत्न केला. बाकी तुम्ही म्हणता ते संघ किंवा अन्य संघटनांनी पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवावे. माझी त्याला हरकत नाही. मी त्याचेही स्वागतच करीन.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मला तुमच्या हेतू बद्धल शंका आजीबात नाहीये. पुराव्या बद्धल म्हणाल तर ह्या अशा गोष्टींचे पुरावे सहज मिळत नसतात. जेव्हा त्या गोध्रा दंगलीच्या सीडी दाखवत होते त्यावेळी माझ्याकडे कॅमेरा नव्हता. अर्थात मला व्हिडीओ शूटींग किंवा छायाचित्रे काढू दिली नसतीच हा भाग वेगळा.

      हटवा
  3. Bhau aapan jo tapshil dila ahe to barik ahe ani kharach aapan lihitana kiti kholat jaun shodh gheta he disun yete. Inamdarsahebanni jya suvidha uplabdh karun dilya ahet tya mi baghitlya aahet ani tya farach chan ahet. Te muslim ahet ani muslim dharm palnya sathi campus madhe purn suit ahe; Pan jatyandhata varjya ahe. Shivajayani Sajri karnare ani mothya pramanat sajre karnare te campus ahe.

    Hall madhe shahu fule ambedkar yanchi tasbiri aahet. Tase parisanvad hot astat.

    Me tar asehi aikle hote ki tanvir maniyar la boardmadhe yeu dyayche ki nahi yawar board madhe vaad hot astana shivseneche ek aamdaranni vajan takle ki jar tyacha number aala ahe tar toch yeil.

    P A Inamdar, Maualana Gulam vastanvi, Maulana Mehmood Madni he nete kadhi hi Media madhe yenar nahit pan uthal bhashane karnare sawang local nete national news war zalkat rahtil.

    Ani shantisudha tai, Campus madhe kahi asamajik tatve hoti pan tyanna itar students ni kiti pratisad dila he aapan jantach. Gujarat chi ji cd aapan sangat ahat ti hostel var yach simi chya makdanni dakhavli, ti kutuhalapoti pahili geli, mi hi pahili ti eka NGO ne banavli hoti ani tyamadhe releif camp madhle interview hote. it wasnot live. Ani amhi ti CD 5 mint nantar band keli todun takli ani tya murkhanna ti kunala na dakhavnyacha salla dila. That cd was shot by NGO, had an address of them and it wasnot muslim ngo. It was legal.

    उत्तर द्याहटवा
  4. changale kaam karat rahane ani changale kaam karat rahane ani changale kaam karat rahane ... he ekach fakt (the only) uttar aahe tya so called secularist lokana. tyanchya tondala laganyat arth nahi. kadhihi dusaryachi rekha chhoti karanya sathi ti khodu naye. tyapeksha mothi rekha kadhavi. te uttar .. ti chaparak chhan asate.

    उत्तर द्याहटवा
  5. झालय अस कि प्रत्येकजण माझीच लाल कशी हे पटवून देण्यात गुंतला आहे. जर लोकांची वाहवा मिळवण्यासाठीच विकास करायचा असेल तर हे असले वैचारिक हेवेदावे होतच राहणार. परंतु समाजात असे अनेक लोकहि आहेत जे या जातपात, एकाच धर्माचा प्रचार, आम्हीच कसे थोर हे सांगणे व इतरांचे दोष काढत बसणे यासारख्या गोष्टी वगळून समाजातील अविकसित लोकांसाठी आयुष्याचा त्याग करून सतत झटत असतात तेही प्रसिद्धिचा हव्यास न धरता. त्यांना सलाम।।।

    उत्तर द्याहटवा
  6. मला वाटते आपण उल्लेखलेल्या सेक्युलर तोंडाळांना संघाच्या talent ची कल्पना आहे. हे भुंकत रहाणार आहेत. परंतु अपेशी आहेत हे देशाचे सुदैव!!

    उत्तर द्याहटवा
  7. एकुणात एकमेकांन मधील चांगल्या गोष्टींची देवाणघेवाण करणे देशहिताचे होईल. आणि थोतांड निर्माण करणार्यांना चपराक बसेल.
    भाऊ चांगली माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  8. भाऊ, नेहेमी प्रमाणे सोंगं घेतलेल्यांना उघड पाडणारा लेख! कौतुक करावं असा खुलासा दिल्याबद्दल सिराज शेखचे ही अभिनंदन, मीडियाचा मुख्य प्रवाहाची विश्वासार्हता शून्य झालेली आहे, आता लोकांनीच आपापसातल्या सौहार्दाची उदाहरणे सार्वजनिक करत राहणे हा एक सक्षम पर्याय आहे ! आमच्या घरी गणेश पूजनासाठी व आरती करण्यात, आमचे एक मुस्लिम स्नेही आहेत, दिवाळीच्या कार्यक्रमात पण सक्रीय भाग घेतात, श्लोकांची स्पर्धा घ्यावी या साठी प्रोत्साहन देतात , अशांबद्दल मीडियाला काही देण घेण असणार नाही, ते आपणंच करायचंय

    उत्तर द्याहटवा
  9. झालय अस कि प्रत्येकजण माझीच लाल कशी हे पटवून देण्यात गुंतला आहे. जर लोकांची वाहवा मिळवण्यासाठीच विकास करायचा असेल तर हे असले वैचारिक हेवेदावे होतच राहणार. परंतु समाजात असे अनेक लोकहि आहेत जे या जातपात, एकाच धर्माचा प्रचार, आम्हीच कसे थोर हे सांगणे व इतरांचे दोष काढत बसणे यासारख्या गोष्टी वगळून समाजातील अविकसित लोकांसाठी आयुष्याचा त्याग करून सतत झटत असतात तेही प्रसिद्धिचा हव्यास न धरता. त्यांना सलाम।।।

    उत्तर द्याहटवा
  10. मा. भाऊ , माहितीबद्दल मनापासून आभार...
    हीच माहिती मा. इनामदार यांनी समस्त पुणेकरांना सांगितली असती तर अजून मार्मिक वाटली असती... तुम्हीही सत्यच सांगताय... पण इनामदार यांचे सामाजिक आणि राजकीय लागेबांधे लक्षात घेता , त्यांना स्वतःला हे स्थानिक वर्तमान पत्रात छापून आणणे सहजशक्य होते... ते का झाले नाही.... किंवा मुद्दाम टाळले..? सहकार्य हे नेहमीच कौतुकास्पद असते...
    लिहू तेवढे थोडेच आहे. ... शेवटी जाता जाता. ...
    पुण्यातील कोणत्याही शाळा-काॅलेज आणि आझम कॅम्पस यांच्या बाहेर आठवडाभर थांबून अनुभव घ्यावा , तुलना करावी .... मग मत बनवावे....
    भाऊंनी विषद केलेली ही गोष्ट परत परत वाचून ठरवावे कि, सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी कोणी काय केले. ..?

    उत्तर द्याहटवा
  11. भाऊ संघ कट्टरवादी न राहता सेक्युलर झाल्याचेच लक्षण आहे हे. मग त्या बिचार्या सप्तर्षी व वागळे आदी सभ्य गृहस्थांवर का घसरताय. त्यांनाही आनंदच होईल याचा.

    उत्तर द्याहटवा