मे महिन्याच्या अखेरच्या रविवारी सत्यमेव जयते सादर करताना आमिरने औष्ध कंपन्या व वैद्यकीय सेवा देणार्या डॉक्टर मंडळींचे पितळ उघडे पाडण्याचा प्रयास केला. त्याने कोणिही सामान्य माणुस भारावुऊन जाणे स्वाभाविकच आहे. दारात येणारा कुडमुड्या ज्योतिषी कसा बोलत असतो? साहेब तुम्ही खुप कष्ट घेता. चांगले काम करता पण कोणाला तुमची कदर नाही. ऑफ़िसात तुमच्या मेहतीला दाद मिळत नाही, घरच्यांना तुमच्या कष्टाची जाण नाई. सर्वाना तुम्ही मदत करता, पण तुमच्या प्रसंगी कोणी धावून येत नाही. असे शब्द आपल्याला हुप आवडणारे असतात. आपण इतरांआठी खुप काही करतो पण आपल्या कामाचे चीज होत नाही ही मध्यमर्गियाची सुप्त भावना असते. तो ज्योतीषी त्यालाच खतपाणी घालत असतो. त्यातून तो तुमच्या सुप्त इच्छा मनावर कब्जा मिलवतो आणि मग तो सांगेल ते आपल्याला विचार न करताच खरे वाटू लागते. ते खते असतेच असे नाही. तेच आपल्याला ऐकायचे असते आणि तेच नेमके समोरचा माणूस आपल्याला ऐकात असतो. दुकानातला चतुर सेल्समन जसा तुमच्यासाठी म्हणजे खासच काही काढायला हवे असे सह्हज ब्लताना बोलला मग ग्राहक फ़ुह्शारतो. त्याला किंमतीचे प खर्चाचे भान रहात नाही. आणि हे अगदी स्वत:ला बुद्धीमान म्हणवणार्याचेही होत असते.
१९८९ सालात शिवसेनेतर्फ़े मध्यमुंबईतून लोकसभेवर निवडून गेलेले ज्येष्ठ पत्रकार नाटककार विद्याधर गोखले यांनई सांगितलेला किस्सा आठवतो. त्यांना सम्सदेच्या कामाची फ़ारशी माहिती नव्हती. तिथे कार्यालयात कुठले प्रश्न टाईप करायला दिले किंवा पत्र टाईप करायला दिलेले असले मग परत ते आणायला जाण्य़ा आधीच तिथले आकर्षक गणवेशातले शिपाई कुठूनही येऊन त्यांना गाठायचे. साब आपका खत, साब आपका सवाल, असे सांगून टाईप केलेल्या अनेक कागदावर गोखले यांच्या सह्या घ्यायचे. पॅडवर लावलेल्या एकामागुन एका कागदाव गोखले सह्या करायचे. प्रत्येक कागद त्यांनी वाचुअ बघितलेला नसे. संसदेत इतके खासदार आहेत. पण हे शिपाई नेमके आपल्याच मागे धावतात व आपल्याआच ओलखतात याचे गोखल्यांना अप्रुप होते. त्यांचा अहंकार त्यातून सुखावत होता. मग पहिले अधिवेशन संपवून मुंबईत आल्यावर काही शिवसेनेचे कार्यकर्ते त्यांची मदत मागायला गेले. खासदाराला दरमहा काही फ़ोन (तेव्हा मोबाईल आले नव्हते की घरची लॅडलाईन सहजासहजी मिलत नव्हती) किंवा गॅस कनेक्शन देण्याचा अधिकार होता. खासदाराची शिफ़ारस असेल तर विनाविअंब त्या गोष्टी होत. या शिवसैनिकांनी मग आपल्या पक्षाचे खासदार म्हणून त्यांच्या सह्या घेतल्या. तोवर खुद्द गोखले यांनाच हे ठाऊक नव्हते. मग एके दिवशी तेच शिवसैनिक पुन्हा त्यांच्याकडे आले तेव्हा गोखल्यांनी गॅस मिळाला काय ते अगत्याने विचारले. तर वर्षभर थांबावे लागेल असे कंपनीने सांगितल्याचे कार्यकर्ते म्हणाले. कारण गोखले यांच्या वर्षभर पुरतील इतक्या शिफ़ारशी कंपनीकडे धुळ खात पदले होते. ते संपले मग या शिवसैनिकांचा नंबर लागणार होता. ते ऐकून गोखले हैराण झाले. कारन त्यांच्या माहिती प्रमाणे त्यांनी चार महिन्यात पहिल्यांदाच शिफ़ारस केली होती. मग इतक्या शिफ़ारशी त्यांच्या नावे तिकडे पोहोचल्या कश्या? स्वत: गोखले तपास करायला गेले आणि कंपनीकडे जमा असलेल्या शिफ़ारस अर्जाव्रच्या सह्या त्यांच्याच असल्याची खात्री त्यांनी करून घेतली. पण त्यातला एकही अर्जदार त्यांच्याकडे आल्याचे त्यांना आठवत नव्हते. पुढे काही दिवस विचार केल्यावर त्यांच्या लक्षात आले की संसद भवनात ते डोळे झाकून समोर शिपायाने आनलेल्या पॅडवरील कागदाव सह्या करत होते, त्यातून या सह्या होऊन गेल्या होत्या. आपलाच हा बावळटपणा सांगून गोखले मनमुराद हसले. पण त्यांनी त्यामागच्गे रहस्यही स्पष्ट केले. इतक्या खासदारात ते रुबाबदार शिपाई आपल्याकडेच धावत येतात, आपल्याला नेमके ओलखतात, याच्या कौतूकाने भारावल्याने ही चुक त्यांच्याकडून झाली होती. २४
ही जर गोखले यांच्यासारख्या जाणकार पत्रकार व खासदाराची गोष्ट असेल तर सामान्य माणूस व टीव्हीच्या प्रक्षकाची काय कथा? त्याला मोठेअणा दिला किंवा जे नेमके ऐकायचे आहे ते ऐकवले तर तो हुरळून जाणारच ना? औषधे खुप महाग झालीत. डॉक्टरचा खर्च खुप वाढलाय, हॉस्पीटलमध्ये जाण्यची सोयच राहिली नाही. सगळीकडे नुसती लूटमार चालू आहे, अशी जेव्हा मध्यमवर्गियाम्ची मानसिकता झालेली आहे तेव्हा त्याच वैद्यकीय पेशा व औषध कंपन्यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केलेले लोकांना आवडणारच ना? एकदा कुणाच्या मनावर ताबा मिळवला मग त्याला सत्य सांगण्याची गरज उरत नाही, आपण सांगतो तेच त्याच्यासाठी सत्य असते. कारन आपण त्याला आवडणारे बोलत आतो आणि आवडते म्हणून ते सत्य असते. कुठल्याही निकषावर ते सत्य असण्याची गरज नसते. अशा मानसिकतेला कोणीतरी खलनायक हवा असतो. आपल्या रामायन महाभारताअमध्ये त्यांना रावण दु:शासन दुर्योधन हवे असतात. ज्याच्या डोक्यावर आपल्या समस्या किंवा यातनांचे हापर फ़ोदता येईल असा खलनायक हवा असतो. आमिर असे खलनायक आपल्याला पुरवतो आहे. आपन खुश आहोत. म्हणून आपल्या आयुष्यातल्या समस्या प्रश्न, अडचणी, अन्याय , फ़सवणूक संपणार आहे काय? करेच त्या खलनायकाचे ते पाप असेल तर त्याच्या निर्दालनाने त्यापासून मुक्तता मिळू शकते. पण तसे नसेल तर आपल्या हाल अपेष्टा चालुच रहातत आणि आपन कथाप्रवचनात गुंग होऊन त्या सोसू लागतो. त्याच्या वेदना संपत नाहीत तर त्याकडे आपले दुलक्ष होते.
वेदनाशामक हे औषध नाही, हे त्याच्या नावातच आहे. ते वेदना शमवते, संपवत नाही. डोके दुखते, अंग दुखते, अंगात कणकण आहे? अमुक एक गोळी घ्या, विनाविलंब त्यापासून दिलासा मिळेल. वेदनाशामाक असेच असते. ते दुखणे संपवत नाही, तर वेदनेचा विसर पडेल अशी सोय करते. वेदनेच्या संवेदना ज्या मेंदुपर्यंत पोहोचत असतात, तिथेच गुंगी आनली मग वेदनांपासून दिलासा मिलतो. मात्र प्रत्यक्षात वेदना संपलेल्या नसतात. तात्पुरत्या बाजूला सारल्या जात असतात. आपल्यालाही तेच हवे असते. वेदना संपण्यापेक्षा त्यापासून तातडीचा दिलासा हवा असतो. मग दुखणे कायम असते आणि दिलासाही नियमित मिलत असतो. जो डॉक्टर अशी औषधे देतो वा उपचार करतो त्याच्याकडे भरपुअर गर्दी असते. अनेकदा तर कुठला डॉक्टर अधिक पैसे घेतो त्यावर त्याची थोरवी ऐकायला मिलत असते. तेच औषधांचेही आहे. इथे आपल्यातला जो अहंभाव आहे किंवा स्वत:ला अन्यायाचा बळी समजण्याची जी वृत्ती असते तिचाच फ़ायदा घेतला जात असतो. कारण आपल्याला सत्याशी कर्तव्यच नसते. आपल्याला जे ऐकायचे आहे किंवा आवडणारे आहे तेच आपल्यासाठी सत्य असते. चुक असेल तर ती दुसर्याची आहे आणि आपण अकारन त्याचे बळी आहोत हा आपला बचाव असतो. त्यामुळेच डॉक्टर, औशध कंपन्या, खाजगी शाळा, दर्जेदार माआची महागडी दुकाने, श्रीमंत थाटाची हॉटेल्स यांना आरोपीच्या पिंजर्यात उभे केले मग आपण खुश असतो. आपल्याला आपल्या जीवनाच्या कथा कादंबरीतला खलनायक सापदत असतो. आमिरखान सत्यमेव जयतेमधून असे आपल्याला पटणारे व भावणारे खलनायक पुरवतो आहे. आपण खुश आहोत ना? वेदनाशामक गोळी घेतल्याने डोके काहीकाळ शांत झाले तरी आपण खुश असतो ना? पुन्हा दुखू लागेल तेव्हा आणकःइ एक गोळी घेऊ की. पन कायमाही डोकेदुखी संपणार नाही त्याची कोणाला फ़िकीर आहे?
YOU ARE SPECIAL FOR US ! तुम्ही आमच्यासाठी खास आहात असे म्हटले की आपल्या मनोभावना सुखावतात. दिडदोन हजार रुपये खिशात असलेल्या आपल्यासमोर दोनचार कोटी रुपये किंमतीच्या हॉटेलचा मालक अदबीने उभा राहून "बोलिये साब" म्हणतो तेव्हा आअपण किती सुखावतो ना? त्याच्या त्या शब्दांचे आपन भुकेलेले असतो. बाकी त्या हॉटेलमध्ये जे पदार्थ मिलतात, त्यापेक्षा त्या महागड्या हॉटेलात गेलो यानेच आपले पोट भरत असते. मोठा धंदा करणारे नेमक्या त्याच आअपल्या सुप्त भावनांचा अभ्यास करून धंदा करत असतात. हजार रुपये खिशात असताना ते आपल्याला करोडपती असल्याच क्षणभंगूर आभास देतात त्यावर आपण खुप खुश असतो. कायमची डोकेदुखी क्षणभर विसरण्यतले समाधान आपण बाहू पसरून स्विकारतो. हे आपल्या सामान्य जीवनातले सत्य असते. मग सांगा, सत्यमेव जयते ना? ( क्रमश:)
भाग ( २९३ ) १२/६/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा