बुधवार, ३० जानेवारी, २०१३

मुंबईत बारावा स्फ़ोट कोणी घडवला होता?


  गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या त्या वादरस्त विधानानंतर आठवडाभर आलेल्या प्रतिक्रिया मी काळजीपुर्वक बघत व ऐकत होतो, तेव्हा सेक्युलॅरिझमची नशा किती बेभान करणारी व आत्मघातकी असू शकते; त्याचीच मला अनुभूती आली. कारण एक राजकीय हेतूने केलेले बिनबुडाचे विधान, पक्षीय कारणा्ने केले असताना त्याचा इतका मुर्खासारखा बचाव चालला होता, की त्यात आपण देशाला खड्ड्यात घालतो आहोत, याचे बहुतांश जाणत्यांनाही भान उरलेले दिसत नव्हते. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री नारायण सामी यांच्यापासून वाहिन्यांवरचे अर्धवटराव मोठ्या तावातावाने शिंदे यांचा आरोप खरा ठरवायला धडपडत होते. म्हणजेच असा बुद्धीवाद व युक्तीवाद करणारा प्रत्येकजण तोयबा व हफ़िज़ यांच्याच बाजूने साक्ष द्यायला धावत सुटला होता. देशातील पक्षिय राजकारण व हेवेदावे चुकते करण्यासाठी आपण पाकिस्तान व तिथल्या जिहादी संघटनांचे हात मजबूत करतो आहोत; याचेही भान ज्यांना उरत नाही, त्यांच्याकडून कुठल्या देशहीत वा जनहिताची अपेक्षा करता येईल काय? आणि दुसरीकडे शिंदे यांनी जे काही मुद्दे व आरोप केलेत त्यान नवीन काय आहे? गेली पाच सहा वर्षे हेच आरोप नुसते माध्यमातून होत आहेत. पण त्यातल्या कुठल्याही प्रकरणात सरकारने न्यायालयासमोर पुरावे ठेवण्याचे धाडस केलेले नाही. जर पुरावे आहेत असे म्हणता; तर कसाब प्रमाणेच त्या हिंदूत्ववादी दहशतवाद्यांवर खटला क चालवत नाही? कसाब मुंबईत येण्यापुर्वी त्यांची धरपकड झाली आहे. कसाबकडून हेमंत करकरे मारले गेले. त्यांनीच कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञा सिंग यांना अटक केली व सज्जड पुरावे असल्याचा दावा केला होता. मग त्यांना मारणारा कसाब सुप्रिम कोर्टापर्यंत जाऊन दोषी ठरला आणि फ़ाशी सुद्धा गेला. तर पुरोहित व साध्वी यांच्यावरचा खटला कोर्टात उभा कशाला रहात नाही? चार वर्षे सज्जड पुरावे असल्याचे नुसते दावे माध्यमाकडे केले जातात, सभांमधून व वाहिन्यांवरून आरोप केले जातात, तार तेच पुरावे कोर्टात मांडायला काय अडचण आहे? की माध्यमे व सभेच व्यासपिठच कोर्ट आहे असे सरकारला वाटते? की पुरावे नाहीतच, पण आरोपाला निमित्त असावे म्हणून नुसतेच नाटक चालू आहे? नसेल तर कोर्टात जाण्यापासून सरकारला कोणी अडवले आहे?

   हिंदू किंवा भगवा दहशतवाद हे सत्य आहे की निव्वळ सेक्युलर बागुलबुवा आहे? असेल तर चार वर्षे ज्याचा तपास संपून पुरावे गोळा झालेत त्याचा खटला चालू का होत नाही? मी सरळसरळ सरकार व सेक्युलर राजकारणावर खोटेपणाचा आरोप करतोय; असेच कोणाला वाटले तर ते गैर नाही. कारण माझा तसाच आरोप आहे. कारण मला तसा रास्त संशय आहे. त्याचे दोन भाग पडतात. एक म्हणजे पकडलेल्या तथाकथित हिंदू दहशतवाद्यांबद्दल माध्यमात केला जाणारा गवगवा आणि कोर्टात जाण्याचे टाळणे, हे आहे. दुसरा भाग खोटेपणाचा. सरकार किंवा प्रामुख्याने सेक्युलर पक्ष व माध्यमे खोटी बोलू लिहू शकतात का? तर त्यांच्या खोटेपणाचे शेकडो पुरावे आजपर्यंत मी सादर केलेले आहेत. आपल्याला जे योग्य वाटते, तेच सत्य ठरवण्यासाठी अशी बेभान झालेली माणसे बेधडक खोटे बोलू शकत असतात. जर्मन कवी व तत्ववेत्ता हेनरिक हायने म्हणतो, ‘आपल्यालाच सत्य गवसले आहे आणि तेच मानव जातीचे कल्याण करणार आहे, अशी झिंग चढलेला माणूस ते संशयास्पद सत्य सिद्ध करण्यासाठी बिनदिक्कत खोटे बोलू शकतो’

   हायने असे म्हणतो म्हणून त्यावर विश्वास ठेवायचे कारण नाही. तसा काही पुरावा आहे काय? माणसे अशी खरेच बेधडक व बिनदिक्कत खोटे बोलू शकतात का? विशेषत भारताचा गृहमंत्री किंवा एखादा मुख्यमंत्री वा बडा नेता असा धडधडीत खोटे बोलू शकेल? विश्वास नाही बसत ना? कसा बसणार? त्यांचा खरेखोटेपणा तपासणारेच त्या खोटेपणात सहभागी झाले, तर सर्वसामान्य  लोकांसमोर सत्य येणार कसे? त्याची फ़सगतच होणार ना? स्पेक्ट्रम घोटाळ्यात दोन मोठ्या चार्टर्ड अकौंटंटना अटक झालेली आहे, हे विसरता कामा नये. त्याचे कारण अशा लोकांनी हिशोब तपासले, मग त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला जात असतो. पण त्यांनीच खोटेपणावर पांघरूण घातले तर लोकांची फ़सवणूक होते ना? माध्यमांची तिच जबाबदारी असते. इथे धडधडीत खोटे बोललेल्या एका मान्यवर बड्या नेत्याचीच साक्ष मी काढणार आहे. त्यानेही ऐन संकटाच्या काळात आपण कसे लोकांची दिशाभूल केली; त्याची एका मुलाखतीतून कबूली दिलेली आहे. त्याचे नाव शरद पवार असे आहे. १९९३ सालात मुंबईत जे भीषण स्फ़ोट झाले, त्यावेळी पवार मुख्यमंत्री होते आणि एकूण अकरा स्फ़ोट झाले होते. तेही बिगर मुस्लिम वस्तीमध्ये. त्यामुळे मुस्लिमांकडे लोक संशयाने बघतील व गडबड होईल, म्हणुन त्यांनी त्याच संध्याकाळी टिव्हीवर बोलताना मसजीदबंदर या मुस्लिम भागातही बारावा स्फ़ोट झाल्याची थाप ठोकली होती. आणि तेरा वर्षांनी एनडी्टिव्ही या वाहिनीच्या शेखर गुप्ता यांना मुलाखत देताना त्यांनी त्या खोटे बोलण्याची कबूलीही देऊन टाकलेली आहे. मुस्लिमांबद्दल शंका संशय येऊ नये, म्हणून त्यांनी खोटेच सांगितले होते. जनहितासाठी खो्टे बोललो असा त्यांचा दावा होता. म्हणुन सत्य बदलते का? तेवढेच नाही, पाकिस्तानचाही संशय येऊ नये म्हणून त्यांनी तामीळी वाघ वापरतात अशी स्फ़ो्टके असल्याचेही खोटेच सांगितले होते. जेणे करून मुस्लिम व पाकिस्तान यांच्याविषयी मुंबईकरांच्या मनात संशय येऊ नये, असाच त्यांचा प्रयत्न होता. पण प्रत्यक्षात ते सामान्य नागरिकाची शुद्ध फ़सवणूकच करत होते ना? खर्‍या आरोपीला पाठीशी घालण्यात नागरिकांचे कल्याण व सुरक्षा कशी असू शकते? जितका नागरिक गाफ़ील, तेवढा तो दहशतवादाचा सहज बळी होऊ शकतो ना? मग त्याची दिशाभूल करून त्यालाच गाफ़ील ठेवण्यात सुरक्षा असल्याची समजुत सत्य असते का?

   पण तमाम सेक्युलर लोकांना तसे वाटते आणि म्हणून त्यालाच ते सत्य समजतात. मग तेच सत्य ठरवण्यासाठी ते बेधडक खोटेही बोलू लागतात. पवार यांनी त्याची २००६ मध्ये कबूली दिली. तेव्हा त्यांनी साधलेल्या जनहिताचे परिणाम मुंबईकर भोगत होते. कारण त्यावेळी मुंबईत दुसरी बॉम्बस्फ़ोट मालिका घडली होती. पश्चिम रेल्वेच्या लोकलमध्ये लागोपाठ स्फ़ोट होऊन दिडशेहून अधिक निरपराधांचा बळी गेला होता. पवार किंवा सेक्युलर मंडळींना हीच सुरक्षा व सत्य वाटत असते; म्हणून ते बिनधास्त खोटे बोलत असतात. आणि सुशिलकुमार शिंदे किंवा दिग्विजय सिंग सेक्युलर आहेत. आपली प्रसारमाध्यमे सेक्युलर आहेत. तेव्हा ते किती सत्य बोलतात व किती धडधडीत खोटे बोलतात; ते प्रत्येकाने आपले आपले ठरवावे. नजरेस आणून द्यायचे काम जागरुक पत्रकार म्हणून माझे आहे आणि मी ते केले आहे. पण सेक्युलर पत्रकार हे काम करणार नाहीत. त्यांना जनकल्याण साधायचे असते. त्यामुळे त्याना त्यांचे सत्य प्रस्थापित करण्यासाठी निरपराध माणसांचा हकनाक बळी जाउ देण्यात कर्तव्यपुर्तीचा आनंद मिळत असतो.

    आता जरा हिंदू दहशतवादाचे खोटे बघू. ज्या दोन महिन्यात कराचीहून मुंबईला येऊन मोठा जिहादी हल्ला करण्याची जमवाजमव पाकिस्तानमध्ये व त्यांच्या मदतीला इथले काही छुपे हस्तक करत होते, तेव्हा आमचे सेक्युलर सरकार, राजकारणी व पत्रकार कोणते जनहित साधत होते? त्या दोन महिन्यात इथे कर्नल पुरोहित व साध्वी प्रज्ञासिंग यांच्या हिंदू दहशतवादाचा डंका जोरजोरात पिटला जात होता. तो इतका जोरात पिटला जात होता, की कसाबची टोळी येते आहे, तिकडे कोणाचे लक्षही जाऊ नये. याला सेक्युलर सुरक्षा व जनहित म्हणतात. आजही त्याच शिळ्या कढीला शिंदे यांनी जयपुरमध्ये ऊत आणला आहे. त्यामुळे मी खरेच भयभीत आहे. जेव्हा जेव्हा असा हिंदू दहशतवाद व मुस्लिम विरोधी आक्रमकतेचा, किंवा मुस्लिमांवरील अन्यायाचा बागुलबुवा केला जातो, तेव्हा तेव्हा काहीतरी मोठा हल्ला वा घातपात होऊन शेकडो निरपराध माणसे मुंबईत मारली गेली आहेत. २००६ मध्ये भिवंडी येथे कबरस्थानचे खोटेच प्रकरण उकरुन दंगल माजवण्यात आली होती व शिवाजी पार्कवरील मीनाताईंच्या पुतळ्याला शेण फ़ासून गडबड माजवण्यात आली होती. मग मुस्लिमांवर संशय नको अशी हाकाटी झाली आणि रेल्वेत स्फ़ोटांची मालिका घडली होती. २६/११ च्या कसाबच्या हल्ल्यापुर्वी दिडदोन महिने साध्वी व कर्नल यांच्या मालेगाव स्फ़ोटाचा बागुलबुवा करण्यात आला आणि काही दिवसातच मुंबईत हत्याकांड झाले होते. आताही पुन्हा हिंदू दहशतवादाचा बागुलबुवा चालू झाला आहे, मग ही सेक्युलर जनहितार्थ येऊ घातलेल्या कुठल्या भीषण हल्ल्याची चाहुल तर नाही ना? आपल्या अशा खोट्या बोलण्यातून गृहमंत्री भारतीयांना लौकरच जिहादी घातपाती हल्ला होणार असल्याचा संकेत देत आहेत काय? ते खोटेच बोलत आहेत. पण त्या खोट्यातून ते जनतेला सावध करत आहेत की गाफ़ील ठेवत आहेत?( क्रमश:)
भाग   ( ७० )    ३०/१/१३

८ टिप्पण्या:

  1. pan bhau bharatiyana apalya deshavar prem ahe ase tari kuthe vatate jya padhatine deshache janiv purvak (ha arop mi janiv pruvakch karat ahe) vatole kele jat ahe te lokancha lakshat kase yet nahi ki lakshat rahun hi lok gappa ahet kalat nahi

    उत्तर द्याहटवा
  2. भाऊ तुमचे लेख मी वाचत असतो , आजचा लेख हा नेहमीप्रमाणे उत्तम परंतु हा लेख इतका भयानक आहे कि प्रतिक्रिया दिल्याशिवाय राहवत नाही.
    १२वा स्फोटाच्या वेळेस मी लहान होतो त्यामुळे आज जाणत्या वयात त्याचे गांभीर्य लक्षात येत आहे. मला नेहमी वाटायचे कि पवार आणि शिंदे हे मराठी मातीतील रत्ने आहेत, समाजाबद्दल कळवळा आहे. परंतु ज्या वेळेस जातीचे राजकारण ठळक दिसू लागले आणि भगवा दहशतवाद जन्माला आला त्यादिवसापासून ह्या लोकांबद्दल आणि त्यांच्या भवतालच्या गोतावाल्याबद्दल मन कलुषित व्हायला लागली आणि होता होता पार मनातून उतरून गेली. सत्तेपायी माणूस कित्ती खालच्या थराला जातो आणि त्यामुळे समाज आणि देशाची किती हानी होते हे जर माझ्यासारख्या सामान्य नगण्य नागरिकाला कळते तर ह्यांना का कळत नाही ???? देशभक्ती असेल तर धर्मनिरपेक्षता आणि प्रखर राष्ट्रवाद हे प्रकारच संपून जातात हे का कळत नाही???? आज ८ वर्षांनी ध्वनिक्षेपक हातात आला का, खरी कबुली द्यायला ???? तुम्ही सांगितलेल्या अंदाज आणि भाकीत खूपच भयानक आहेत???? ह्यावेळच भाकीत तुमचे खोटे ठरो चुकीचे ठरो हि भगवंताकडे प्रार्थना

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. बाराची मती असलेल्या या माणसाची नियत इतकी खराब आहे की त्याला ९ कोटी मराठी माणसात एक लायक मराठी किंवा विशेषत: मराठा मिळाला नव्हता जो खासदार होऊ शकेल. म्हणून याने जनहितासाठी मुंबई स्फोटांचा मास्तरमाइंड असलेल्या टायगर मेमनच्या वाकीलालाच खासदार केले. इतका हा माणूस देशप्रेमी आहे. (देश कोणता ते विचारू नये)

      हटवा
  3. Ya sampurna secular gangla firing squadsamor ubhe kele pahije

    उत्तर द्याहटवा
  4. भाऊ अतिशय उत्त्तम आणि ज्ञानवर्धक लेख आहे या द्वारे सत्य कळले खुप खुप आभारी

    उत्तर द्याहटवा