बुधवार, २१ मार्च, २०१२

शिवसेनेसाठी शरद पवारांचे बहुमोल योगदान



   कसल्याही मुद्द्यावर भांडत बसणारे व सत्तेचा विचारही न करणारे महाराष्ट्रातील डावे पक्ष व नेते, आपल्याला सत्ता मिळवण्यासाठी उपयोगाचे नाहीत हे शरद पवारांच्या लक्षात आले ते १९८५ च्या निवडणुका संपल्यावर. कारण ते विधानसभेत विरोधी पक्षनेता होते. पुलोद म्हणुन मग अन्य पक्ष त्यावर दावा करू लागले. ते पद सोडून मग पवारांनी विरोधी राजकारणातून मनच काढून घेतले. ते कॉग्रेसमध्ये परतण्याची संधी शोधू लागले. दरम्यान महाराष्ट्रात तीन मुख्यमंत्री बदलले होते. राजीव गांधींशी मतभेद झाल्याने वसंतदादांनी राजीनामा दिल्यावर तिथे बसलेले शिवाजीराव पाटिल निलंगेकर, मुलीचे गुण विद्यापीठ परिक्षेत वाढवल्या प्रकरणी पायउतार झाले. त्यांच्या जागी शंकरराव चव्हाण दहा वर्षांनी पुन्हा मुख्यमंत्रीपदी आले. तोवर राजीव गांधींचे नवखेपण संपले होते. त्यांची लोकप्रियता घसरू लागली होती. मुंबईत व महाराष्ट्रात सेनेचा दबदबा वाढतच चाला होता. अशा वेळी राजीव गांधींचे हात मजबूत करायला कॉग्रेस पक्षात पुन्हा जाण्याची घोषणा पवारांनी केली. ती ऑक्टोबर १९८६ ची गोष्ट. तोवर शिवसेनेचा दबदबा महाराष्ट्रात दिसत नव्हता. थोडक्यात महाराष्ट्रातील जी विरोधी पक्षाची जागा व्यापण्यासाठी सेना पुढे सरसावली होती ती जागा रिकामीच नव्हती. ती शेकाप, जनता दल, समाजवादी, कम्युनिस्ट यांच्याकडून पवारांनी घेऊन व्यापली होती. पवारांनी ती जागा मोकळी करण्यावरच सेनेचे भवितव्य अवलंबून होते. पवार विरोधी पक्षातच राहिले असते, तर ती जागा मिळवायला सेनेला खुप प्रयत्न करावे लागले असते. पवारांच्या कार्यकर्ते व संघटनेशी झुंजावे लागले असते. पण ती वेळच आली नाही. पवारांनी येऊच दिली नाही.

   महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून जे बिगर कॉग्रेस पक्ष इथे कार्यरत होते, त्यांनी कधी कॉग्रेसला मोठे राजकीय आव्हान निर्माण केले नसेल, पण जिथे त्यांची ताकद होती तिथे दुसर्‍या कोणाला आपले प्रभावक्षेत्र निर्माण करता येत नव्हते. त्याला जिल्हा, तालूका, शहर पातळीवरचे अनेक प्रभावी विरोधी नेते कारणीभूत होते. पुलोद व नंतर पवारांच्या विरोधी राजकारणात ते साफ़ निष्क्रिय होऊन गेले. त्यांच्या कार्यकर्ते व पाठीराख्यांना पवारच आपले कॉग्रेस विरोधी राजकारणाचे नेता वाटू लागले. तसेच जे तरूण १९७७ नंतरच्या राजकात्रणात आणीबाणी व कॉग्रेस विरोधात समोर आले होते ते पवार काळात त्यांचेच पाठीराखे होऊन गेले. परिणामी त्याच पवारांनी कॉग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा अशा तरूण व कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. ते पवार
समर्थक नव्हते. ते कॉग्रेस विरोधासाठी पवारांचे पाठीराखे झालेले होते. पवार व त्यांच्या पक्षाचे निवडून आलेले आमदार कॉग्रेसमध्ये गेले तरी त्यांचा गावोगावी पसरलेला पाठीराखा तरूण मात्र सैरभैर झाला. अचानक त्याला कॉग्रेस विरोधात नेतृत्व देणारा कोणी खमक्या नेताच उरला नाही. साताआठ वर्षे ते काम पवारांनी चोख बजावले होते. पण ते बाजूला होताच ती जबाबदारी शेकाप, जनता पक्ष, कम्युनिस्ट, यापैकी कोणीतरी उचलायलया हवी होती. पण मधल्या साताआठ वर्षात या पारंपारिक विरोधी डाव्या नेत्यांची अवस्थासुद्धा त्याच तरूणांसारखी झाली ओती. तेही पवारांना आपला सर्वोच्च नेता समजून बसले होते. स्वत:चे नेतृत्वगुण विसरून गेले होते. मग या सैरभैर झालेल्या कॉग्रेस विरोधी तरूणंना ते नेतृत्व देणार कसे?

     थोडक्यात १९८६ अखेर महाराष्ट्राच्या ग्रामीण विरोधी राजकारणात प्रचंड पोकळी तयार झाली. तिचा अंदाज जसा डाव्या पारंपारिक पक्षांना आला नव्हता तसाच उजव्या म्हटल्या जाणार्‍या भाजपालासुद्धा आला नव्हता. हिंदुत्वाचे आरोप होत असले तरी भाजपा तेव्हा गांधीवादाची जपमाळ ओढत बसला होता. तर एका घटनेमुळे शिवसेनेने मात्र उघडपणे हिंदुत्वाचा झेंडा खांद्यावर घेतला होता. इंग्लंडमधील भारतीय दुतावासातील मराठी अधिकारी म्हात्रे यांची कुणा काश्मिरी मुस्लिमाने हत्या केली. तिच्यावर गदारोळ उठवित सेनेने हिंदुत्वाचा भगवा हाती घेतला. तोच भगवा घेऊन सेनेचे नवे मुंबईकर नगरसेवक राज्याच्या विविध जिल्ह्यात फ़िरू लागले. तसे ठाकरे नावाचे कौतुक महाराष्ट्रात जुनेच होते. पण त्यांनी कधी खेड्यापाड्यात सभा घेतल्या नव्हत्या. आता त्यांचे निष्ठावंत मावळे जिल्हा तालूक्यात फ़िरू लागले. त्यांना पवारांनी कॉग्रेसमध्ये परत जाताना वार्‍यावर सोडलेल्या तरूणांचा उत्तम प्रतिसाद मिळू लागला. याला सेक्युलर नाटकसुद्धा कारणीभूत होते. नेहमी हिंदु विरोधात बोलणे व मुस्लिम धर्मांधतेला पाठीशी घालणे अशी जी सेक्युलर अतिशयोक्ती झाली होती, ती नव्या पिढीला मान्य नव्हती. पण कोणीच त्याविरुद्ध आवाज उठवत नव्हता. बाळासाहेब उघडपणे व उंच आवाजात त्याविरुद्ध बोलत होते, ते त्याच खेडोपाडीच्या तरूणाला भुरळ घालू लागले. तो जय भवानी जय शिवाजी म्हणत सेनेत दाखल होऊ लागला. मजेची गोष्ट म्हणजे त्यात पारंपारिक जुन्या पक्षातल्या पुढारी कार्यकर्त्यांच्या पुढल्या पिढीचाच जास्त भरणा होता. हे काय चालले आहे त्याचा थांगपत्ता डाव्या पक्षांना नव्हता तसाच तो भा
जपाला सुद्धा नव्हता. त्यामुळे हे पक्ष वा त्यांच्याच राजकीय विचारांनी प्रभावित झालेले पत्रकार माध्यमे सेनेच्या घोडदौडीची टवाळी करण्यात धन्यता मानत होते.

     आपल्याला कित्येक वर्षे प्रतिसाद न देणारा हा मराठी र्तरूण इतक्या वर्षानंतर सेनेकडे का ओढला जातो आहे याचा स्वत:ला शहाणे व अभ्यासक म्हणवणार्‍यांनी गंभीरपणे विचार करायला हवा होता. तसे पाहिल्यास सेनेकडे स्व्त:चे राजकीय तत्वज्ञान नाही, आर्थिक कार्यक्रम नाही. मग तो तरूण तिकडे जातो आणि आपल्या प्रभावी विचारांकडे पाठ का फ़िरवतो, असा प्रश्न या शहाण्यांना पडायला हवा होता. पण शहाणा वास्तवाला सामोरा जात न
सतो. आपल्या कोशात बसून भ्रमात वावरणारा सेक्युलर शहाणा नसतो. त्यामुळेच महाराष्ट्रातल्या सेक्युलर शहाण्यांनी, नेत्यांनी पत्रकारांनी सत्य शोधणे वा समजून घेणे बाजूला ठेवून सेनेवर जातीयवादाचा आरोप करीत सत्याकडे पाठ फ़िरवण्य़ात धन्यता मानली. तुम्ही शोळे मिटले म्हणून सुर्य उगवायचा थांबत नाही. इथेही तेच झाले. पवारांच्या कॉग्रेसप्रवेशाने मोकळी केलेली विरोधी राजकारणाची जागा सेना व्यापत गेली. १९८७ साली औरंगाबाद महापालिकेच्या पहिल्याच निवडणूका झाल्या, तेव्हा या शहाण्यांचे डोळे उघडले. कारण तिथे सेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून आला. पाठोपाठ मुंबईत पार्ल्याची विधानसभा पोटनिवडणूक आली. त्यात सेनेचे डॉ. रमेश प्रभू स्वबळाव्रर निवडून आले. जाहिरपणे हिंदुत्वाची भूमिका घेऊन सेनेने लढवलेली ती पहिलीच निवडणूक होती. त्यात सेनेने कॉग्रेसचे प्रभाकर कुंटे व जनता पक्षाचे प्राणलाल व्होरा यांचा पराभव केला. मजेची गोष्ट म्हणजे त्यात भाजपाने गांधीवादाची जपमाळ ओढत जनता पक्षाच्या व्होरांना पाठींबा दिला होता. त्यानंतर भाजपा हिंदुत्वाकडे वळला. पुढे त्याने सेनेशी युतीसुद्धा केली. पण मुद्दा एकच आहे
तो सेनेच्या विस्ताराचा.  

     शिवसेनेची महाराष्ट्रातील वाढ जातियवादी भुमिकेतून झालेली नाही. तो आळशी पत्रकार व राजकीय अभ्यासकांनी जराही कष्ट न घेता घरबसल्या काढलेला निरर्थक निष्कर्ष आहे. मतदार कधीही जातियवादी वा सेक्युलर नसतो. तो उपलब्ध राजकीय पर्यायातून निवड करत असतो. जोवर त्याच्या समोर पारंपारिक डावे पक्ष पर्याय म्हणुन उभे होते त्याने सेनेचा विचारही केला नव्हता. आधी भाजपा (जनसंघ), शेकाप, जनता पक्ष (जुना समाजवादी), कम्युनिस्ट, आणि नंतरच्या कालात शरद पवार यांची समांतर कॉग्रेस यांना प्रतिसाद दिलेला आहे. पुढल्या काळात हे पर्याय मागे पडत गेले वा निकामी होत गेल्यावर तो सेनेकडे व युतीमुळे भाजपाकडे वळत गेला आहे. ते सेना भाजपाचे कर्तृत्व असण्यापेक्षा तो बोलघेवड्या नाकर्त्या डाव्या पक्ष, नेते व त्यांची टिमकी वाजवणार्‍या तोंडाळ बेअक्कल सेक्युलर शहाण्याच्या नालायकीचा परिणाम आहे. म्हणुनच त्याचे जेवढे श्रेय मी ठाकरे यांना देतो त्तेवढेच नाकर्त्या डाव्या बोलघेवड्यांना देतो. मात्र त्यातले मोठे योगदान मोक्याच्या क्षणी विरोधी राजकारण सोडून कॉग्रेसची वाट धरणार्‍या व त्यापुर्वी पारंपारिक विरोधी पक्षांना निकामी करणार्‍या शरद पवारांना द्यावेच लागेल. ऑक्टोबर १९८६ मध्ये पवार कॉग्रेसवासी झाले आणि वर्षभरात सेनेचा वाघ संपुर्ण महाराष्टात गुरगुरू लागला. त्याने व्यापलेली जागा पाहिली तरी पवारांचे योगदान लक्षात येऊ शकते. जिथे जिथे म्हणुन जुन्या विरोधी डाव्या बिगरकॉग्रेस पक्षांचे बल होते तिथेच सेनेचे नवे बालेकिल्ले तयार झालेले दिसतील. कॉग्रेसचे प्रभावक्षेत्र सेना वा भाजपाला व्यापता आलेले नाही. हा कसला पुरावा म्हणायचा? इथेच कशाला? देशभरात तरी काय वेगळे घडले आहे?  जातियवादी व सेक्युलर हे थोतांड कसे आहे ते नेमके समजून घेण्यासाठी ह्या कालखंडातील राजकीय बदल बारकाईने लक्षात घेतलेच पाहिजेत. (क्रमश:)
भाग ( २१२ )     २२/३/१२

1 टिप्पणी:

  1. BHAU MI TUMCHA HA BLOG VACHALA. BHU TUMHI KHARECH CHAN VISHLESHAN KELE. PAN BHAU MALA AAJUN EK GOSHT YETHE NAMUD KARYACHI AAHE TI HI KI. JENVA AAPLY DESHAT MATDARACHE VAY 21 VARSH HOTE TE BADLUN 18 VARSHA PARYANT AANLE. HYA 18 TE 30 VYOG GATATIL TARUNANI MAHARASHTRATIL ANI DILHI TIL SATTA BADDALI. KARN HE 18 TE 21 HYA VOYGATATIL TARUN JASST PRMANAT SHIVSENA ANI BJP KADE ATTRCT ZALA. KARN AATA PARYANT HYA TARUNANA DESHYACHY RAJKARNAT MATDAN KARTA YET NAVTE. ANI ACCHUK GOSHT TYA KALI BALASAHEB THAKARE AANI VOLKHALI MAHARASHTRAT SATTA PARIVARTAN ZALE. MAZI AASHI EK VINANTI AAHE KI BHAU HYA TARUNA BADDAL EK ARTICLE HOUN JAUDY. KARN DESHCHI SATTA BADALNYACHI DHAMAK HYACH TARUNA MADHE AAHE.

    उत्तर द्याहटवा