साधन कधीच वाईट नसते. ते फ़क्त अवजार असते. त्याचा वापर करण्यावर सर्वकाही अवलंबून असते. विचार हे सुद्धा एक साधन आहे. चाकू, सुरी, बंदूक यांच्याप्रमाणेच कायदा, शब्द व विचार हेसुद्धा साधन असते. त्याचा वापर कसाअ व कोणत्या हेतूने होतो त्यावर त्याचे परिणाम अवलंबून असतात. जेव्हा ज्या हेतून त्यांची निर्मिती झाली त्याकडेच पाठ फ़िरवून त्यांचा गैर हेतूने वा वाईट हेतूने वापर केला जातॊ तेव्हा त्याचे वाईट परिणाम संभवतात, मग त्या परिणामांकडे बोट दाखवून त्या साधनाला बदनाम केले जात असते. दोष नसतो तर त्याचा गैरवापर करणारा गुन्हेगार असतो. तेच सेक्युलॅरिझमचे झाले आहे. ज्या हेतूने हा विचार पुढे आला त्याचा काही लोकांनी गैरवापर चालविला आहे. ज्या प्रवृत्तीला पायबंद घालण्याच्या हेतूने त्याला प्राधान्य देण्यात आले त्याच प्रवृत्तीने त्यावर कब्जा करून त्याचे बुमरॅंग केले आहे. सार्वजनिक जीवनात धर्ममार्तंडांचा हस्तक्षेप होऊ नये, राजकीय घडामोडीत व शासनात धर्माची लुडबूड नको म्हणून ह्या संकल्पनेचा उदभव झाला होता. जेणेकरून धर्मांधतेला पायबंद घातला जावा. पण आज आपल्याच देशात नाही तर जगातया अनेक देशात त्याच सेक्युलॅरिझमच्या व उदारमतवादाच्या आडोशाने धर्मांधता जगभर धुमाकूळ घालताना दिसत आहे. आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच अराजकाने आता सामान्य माणसाचे जगणेच असुरक्षित करून टाकले आहे.
परवा राज्यसभेच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण बघण्याचा योग आला. राष्ट्रपतींच्या भाषणाबदाल त्यांचे आभार मानण्यच्या प्रस्तावाव्रर मार्क्सवादी पक्षाचे नेते सीताराम येचुरी बोलत होते. त्यांनी अशाच एका भंफकपणावर नेमके बोट ठेवले. अन्नसुरक्षा, पर्यावरण सुरक्षा, उर्जा सुरक्षा अशा नवनव्या सुराक्षेच्या गपा मारल्या जात असतात. पंतप्रधान सतत त्यावर बोलत असतात. पण भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला जी जगण्याची सुरक्षा बहाल केली आहे तिचे काय, असा सवाल त्यांनी केला. माणूस जगला, जीवंत राहिला तरच या बाकीच्या सुरक्षा कामाच्या आहेत ना? तो सामान्य माणूस आज किती सुरक्षित आहे? रोज नव्हे दर तासाला देशात कुठेरती बलात्कार होत असतो, खुन पाडला जात असतो, अपघातात माणूस मारला जात असतो. याखेरीज घातपात, भेसळ, विषबाधा यांनी माणसे मरतच असतात. म्हणजे स्वातंत्र्य मिळून सहा दशके उलतून गेली तरी साधी जीवन सुरक्षेची हमी सरकार नागरिकाला देऊ शकलेले नाही. मग पुढल्या या बाकीच्या सुरक्षेचे कौतूक चालते ते शुद्ध नाटकच नाही काय? ह्या सर्व सुर्क्षा म्हणजे मेलेल्या मुलीला नवरी म्हणून सजवायचे दागिने नाहीत काय? याला सुरक्षेचे थोतांड नाही तर काय म्हणायचे?
उदारमतवाद किंवा सेक्युलॅरिझम हे असेच थोतांड होऊन बसले आहे. त्याचे अपयश लपवण्यासाठी मग दुसरीकडे लक्ष वेधण्याच लबाडी चालू असते. जसे सामान्य माणसाला जीवन सुरक्षा देण्यात अपेशी ठरलेले सरकार त्यावरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी इतर सुर्क्षेच्या मोठमोठ्याने गप्पा मारते तसाच सेक्युलर थोतांडाचा प्रकार आहे. त्याचे अपयश जेवढे स्पष्ट होत चालले आहे तेवढ्या मोठ्या आवाजात त्याचे समर्थक त्या थोतांडाच्या आरत्या करत असतात. पण आपले कुठे चुकते आहे वा काय चुकते आहे त्याचे आत्मपरिक्षण करायची त्यांना गरज वाटत नाही. अर्थात गरज नाही असे अजिबात नाही. गरज त्यांनाही कळते. पण हे सगळे विद्वान आहेत व असतात. निदान ते स्वत:ला शहाणे समजतात. आणि तिच त्यांची अडचण असते. सामान्य लोकांना आपण चुकलो तर ते स्विकारायला फ़ारसे काही वाटत नाही. पण जे शहाणे वा विद्वान असतात, त्यांना चुक मान्य करणे मेल्याहुन मेल्यासारखे वाटत असते. त्यामुलेच मग ते चुका लपवायचा झाकायचा जीवापाड प्रयास करतात. कोणि चुक दाखवली वा सिद्ध केली तरी तेच खरे व योग्य असल्याचा दावा अधिक तावातावाने करू लागतात. आपल्याकडचे उदारमतवादी व सेक्युलर तसेच शहाणे आहेत. म्हणुनच त्यांना सत्या स्विकारणे अशक्य होऊन बसले आहे. हरलेला जुगारी जसा चिडून व चवताळून अधिकच सर्वस्व पणाला लावतो तशी त्यांची अवस्था आहे. त्यामुळेच त्यांच्या फ़सलेल्या सेक्युलर थोतांदाचा बचाव असे दिवालखोर शहाणे अधिक जोराने करताना दिसतात.
म्हणून सत्य फ़ारकाल दडपता येत नसते. एम. एफ़, हुसेन या चित्रकाराबद्दल या सेक्युलर मंडळींचे प्रेम किती उतू जाते ते मी सांगण्याची गरज नाही. पण मग तो थोर चित्रकार देश सोडून का परागंदा झाला? त्याला कोणी मारले नव्हते. त्याचे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या म्हणून त्याच्यावर खटला भरण्यात आला होता. त्यात अटकेचे वॉरंट असल्याने तो परदेशी जाऊन लपून बसला. त्याला कोणी हाकललेले नाही. तरी त्याला पळूण जाअवे लागते म्हणून गळा काढणारे सेक्युलर पत्रार आपण वाहिन्यांवर अश्रू गाळताना बघितले आहेत. पण त्यांचेच ते सेक्युलर अश्रू तस्लिमा नसरीन या लेखिकेला परागंदा व्हावे लागल्यावर का आटत असतात? या बांगलादेशी लेखिकेला ठार मारण्याचा फ़तवा बांगला मुल्लांनी काढलेला आहे. त्यामुळे जीव वाचवायला इथे भारतात आश्रय घेतलेल्या तस्लिमाला इथेही सेक्युलर सरकार संरक्षण देऊ शकले का? ती हैदराबादच्या पत्रकार भवनात पुस्तक प्रकाशनासाथी आली असताना तिथल्या मुस्लिम आमदाराने आपल्या साथीदारांसह तिथे घुसून तिच्यावर हला चढवला. त्यात तिथले पत्रकार व लेखक, प्रकाशकांनाही जखमा झाल्या. त्याची किती दखल यांनी घेतली? त्यावर कल्लोळ का माजवला जात नाही? सेक्युलर असणे म्हणजे मुस्लीम धर्मवेडाला पाठीशी घालणे असते काय? नसेल तर जेवढा उत्साह हिंदू संघटनांच्या माथेफ़िरूपणावर आघात करताना दिसतो तेवढाच मुस्लिम वा ख्रिश्चन धर्म्वेदाविरुद्ध आवाज उठवतांना का दिसत नाही? मोदी यांनी मुस्लिमांना संरक्षण दिले पाहिजे यासाठी घसाफ़ोड ओरडणारे तस्लिमाला भारतातून पळून जाण्याची वेळ आली तेव्हा दबल्या आवाजात बातम्या का देत होते? तिला संरक्षण व आश्रय नाकारणार्या कॉग्रेस सरकारवर मोदीप्रमाणेच आरोप करतांना कंजूषी का होते? हा निव्वळ दुटप्पीपणा नाही काय?
याचा अर्थ काय घ्यायचा? एक तर त्यांची सेक्युलर भूमिका ही भाजपा विरोधापुरती मर्यादित आहे. त्यातून अन्य वा सेक्युलर पक्षांना सवलत व सुट देण्यात आली आहे काय? भाजपाने मुस्लिमांना संरक्षण दिले नाही तर गुन्हा आहे, पण कॉग्रेस वा डाव्या मर्क्सवादी सरकारने ते संरक्षण नाकारले र्तर चालते असे सेक्युलर विचार सांगतो काय? तस्लिमाला मारणे सेक्युलर कारण मारणारे गुंड मुस्लिम असतात. पण हुसेनवर खटला भरणारे हिंदू असतात म्हणून गुन्हेगार असतात काय? मोजपट्टी कुठली आहे? तस्लिमा मुस्लिम व मारणारेही मुस्लिम म्हणुन गुन्हा माफ़ असेल तर हिंदू लेखकांवर हिंदू गुंडांनी हल्ला केला तर गदारोळ कशाला? सगळिच वैचारिक गल्लत आहे ना? या वैचारिक गोधळालाच आजकाल बुद्धीवाद म्हतले जाते आणि त्यात मग सेक्युलर विचारांचा बट्ट्य़ाअबोळ उडाला आहे. किंबहूना तो करण्यात आला आहे. मग त्यातून निर्माण होणार्या प्रश्नापासून लपायचे कसे तर त्याबद्दल प्रश्न विचारतील त्यांच्यापासून पळ काढायचा. त्याला बुद्धीवाद म्हणत नाहीत तर पलायनवाद म्हणतात.
अर्थात सत्य हे असे मरत नसते आणि संपत नसते. सत्य फ़ार चेंगट असते. ते तुम्ही पळ काढलात तरी तुमचा पाठलाग करत रहाते आणि एक दिवस तुमची कॉल्र पकडते. स्वत:ला मोठा लढवय्या पत्रकार म्हणवणारा निखिल वागळे बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख ’बाळ ठाकरे’ असा करण्यात शौर्य दाखवत होता. त्याचे ते शौर्य खरे असते तर मग परवाच्या महापालिका निवडणुकीपुर्वी त्याच्याच पायावर लोटांगण घालायला का गेला? मातोश्रीवर जाऊन पन्नासवेळा त्यानेच ’बाळासाहेब’ का संबोधले? ती तीआरपीची लाचारी होती. उरलेल्या चॅनेलनी बाजी मारल्यावर टिआरपी टिकवण्यासाठी मातोश्रीच्या पायर्या झिजवाव्या लागल्या. वयाने मोठा असलेल्या माणसाचा आदरार्थी उल्लेख करण्यात कमीपणा नसतो. तो नाकारणार्यला नियतीने असा धडा दिला. ज्या शिवराळ ठाकरी भाषेची टिंगल करण्यात धन्यता मानली होती तिचेच गोडवे गात हाच निखिल ’मला कुठली शिवी द्याल’ असे अगतिक होऊन विचारतो, ते सत्य असते. सेक्युलर थोतांड असेच उघडे पडत चालले आहे. कारण आज जो भंपक सेक्युलॅरिझम आपल्या देशात सांगितला जातो ते त्या मुळ उदात विचाराचे विदंभन व विकृतीकरण आहे. त्याचे थोतांड बनवण्यात आले आहे. आणि आता ते थेट न्यायासनालाही जाणवू लागले आहे. त्याच्या विश्वासार्हतेवर मी एकटाच नव्हे तर सामान्य माणसाप्रमाणेच आता देशातल्या सर्वोच्च न्यायालयानेही शंका घेतली आहे. (क्रमश:)
भाग ( २१६ ) २५/३/१२
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा